संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती

सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच


उषा पुरोहित


मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन

सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!



295.00 Add to cart

ब्रेकफास्ट, ब्रंच, हाय-टी

नव्या जीवनशैलीसाठी नव्या संकल्पना…नव्या रेसिपीज


उषा पुरोहित


ब्रेकफास्ट
दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला आणि मनाला ऊर्जा देणं, उत्साह देणं गरजेचं असतं. म्हणूनच पौष्टिक व
स्वादिष्ट मेनू असलेला ब्रेकफास्ट महत्त्वाचा ठरतो.

ब्रंच
सुटीच्या दिवशी निवांत उठल्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट आणि दुपारचं जेवण ‘क्लब’ करून ‘ब्रंच’चा मेनू ठरवल्यास
थोडा ‘चेंज’ होतो आणि रोजच्या स्वयंपाकाची धावपळही वाचते! आपल्या कुटुंबासमवेत छान वेळ घालवण्यासाठी किंवा सगेसोयर्‍यांसोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी ‘ब्रंच’ हा उत्तम पर्याय ठरेल!

हाय-टी
साग्र-संगीत जेवणाचा घाट घालायचा नसल्यास २-३ किंवा ४ निवडक स्नॅकचे पदार्थ बनवून छानसं
‘शॉर्ट अँड स्वीट’ असं गेट-टुगेदर करता येतं. दुपारच्या चहा-बिस्कीटांबरोबरच अभिरुचीपूर्ण पदार्थांचा ‘हाय-टी’ मनमुराद आनंद देईल.


250.00 Add to cart

१२ व्या शतकातील खाद्यसंस्कृती

‘मानसोल्लास’ या जगातील पहिल्या ज्ञानकोशातील पाककृतींविषयी रंजकमाहिती व तिचा शास्त्रीय मागोवा


डॉ. वर्षा जोशी, डॉ. हेमा क्षीरसागर


भारतीय पाकविद्येला हजारो वर्षांची परंपरा, इतिहास आहे. हजारो वर्षांपूर्वी भारतवर्ष अत्यंत प्रगत स्थितीत होता. त्यातून अमूल्य अशी ग्रंथसंपदाही निर्माण झाली. बाराव्या शतकात राजा सोमेश्वराने संस्कृतमध्ये लिहिलेला आणि जगातला पहिला ज्ञानकोश म्हणून गणला गेलेला ‘अभिलषितार्थचिंतामणी’ अर्थात् मानसोल्लास हा या ग्रंथसंपदेपैकी एक अमूल्य ठेवा आहे. बाराव्या शतकापर्यंत भारतात अन्न आणि पाणी यांचा कशा प्रकारे विचार केला जात होता आणि अन्न शिजविण्याच्या कोणत्या पध्दती रुढ होत्या तसेच कोणत्या पाककृती केल्या जात असत याबाबत सविस्तर माहिती देऊन त्या वेळचा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनही डॉ.वर्षा जोशी आणि डॉ.हेमा क्षीरसागर यांनी या पुस्तकात सांगितला आहे.
आपल्या खाद्यपरंपरेचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन सांगणारे, आपल्या जुन्या ग्रंथातील ज्ञान सर्वांपर्यंत पोचवणारे पुस्तक… ‘बाराव्या शतकातील खाद्यसंस्कृती’



125.00 Add to cart

अंड खासियत

अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती


उषा पुरोहित


सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात.
चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्‍या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत! 



45.00 Add to cart

कॉर्न खासियत

कणीस व बेबीकॉर्नच्या सर्व प्रकारच्या पाककृती


उषा पुरोहित


कॉर्न खासियत कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही ; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात . तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात . पाककलेत सातत्याने प्रयोग करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स , भाज्या – करीज , पराठे -नान , सूप्स , सॅलडस व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत . ‘ बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे . त्यामुळेच ‘ कॉर्न खासियत ‘ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार है निश्चित !



35.00 Add to cart

लाडू स्पेशल

 


मंगला बर्वे


गोड पदार्थांमध्ये लाडू हा एक सर्वमान्य असा पदार्थ होय . लहान मुलांसाठी तर लाडू म्हणजे पर्वणीच असते . बालपणापासून लाडूविषयी विशेष ममत्व असते आणि ते मोठे होईपर्यंत टिकते . परंतु लाडू म्हटले की नेहमीच्या पाच – दहा प्रकारच्या लाडूंशीच आपली ओळख असते . अग्रगण्य पाककृती लेखिका मंगला बर्वे यांनी लाडू प्रकारात किती वैविध्य असू शकते हे या पुस्तकात दाखवून दिले आहे . अबालवृद्धांसाठी खास लिहिलेले मंगला बर्वे यांचे पुस्तक



35.00 Read more

सुगरणीचा सल्ला

स्वयंपाकातील विविध पदार्यव जिनिसाविषयी १२0१ उपयुक्त टीपा


उषा पुरोहित


हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा संग्रह नव्हे . पाककौशल्यात पुस्तकी ज्ञानापलीकडले बरेच काही असते . आई – आजीकडून मिळणाऱ्या ज्ञानालाही सीमा असणार . म्हणूनच अनेक घरातील ‘ अनुभवांचे सार ‘ जर एकदम हाती पडले तर सोन्याहून पिवळे नाही का ? हेच वैशिष्ट्य असलेले १२०१ उपयुक्त टीपा असलेले हे पुस्तक फावल्या वेळेत वाचत गेल्यास कसे उपयोगी पडेल याची कल्पना येईल . उदाहरणार्थ लोणचे घालायचे तर ‘ साठवणीचे पदार्थ ‘ हा विभाग ‘ सल्लागार ‘ ठरतो . पुरण पोळी बनविण्यापूर्वी ‘ पक्वान्ने ‘ विभागातील सूचना कामी येतात . तसेच ‘ गुलाबजाम कडक झाले ‘ , ‘ भाजीत मीठ जास्त झाले ‘ , अशा संकटसमयी हे पुस्तक तत्परतेने मदतीला धावून येते . – पूर्वतयारी – अल्पोपहार – भाज्या – भात – डाळी – कडधान्ये – फळे – पक्वान्ने । उपवासाचे पदार्थ – साठवणीचे पदार्थ – विविधा , अशा नऊ ‘ सल्लागार ‘ विभागांनी सुसज्ज असे हे ‘ हँडबुक ‘ सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल .



250.00 Add to cart

असे करा साठवणीचे पदार्थ


वैजयंती केळकर


नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!


45.00 Read more

आइस्क्रीम्स व डेझर्टस्

फ्रिजच्या साहाय्याने


सुजाता चंपानेरकर


लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्‍या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत.



100.00 Add to cart

आजीच्या विविध कोशिंबिरी


प्रमिला पटवर्धन


खास आजीच्या हातच्या चटपटीत व पौष्टिक, जुन्या-नव्या जमान्याच्या व जेवणाची रंगत वाढवणार्‍या १०६ कोशिंबिरी या पुस्तकात दिल्या आहेत. विविध भाज्यांच्या, कंद-मुळांच्या, फळांच्या कोशिंबिरी उपयुक्त टीप्ससह या पुस्तकात वाचायला मिळतील.



25.00 Add to cart

आजीच्या विविध चटण्या


प्रमिला पटवर्धन


महाराष्ट्रीयन जेवणात भाजी, कोशिंबीर व आमटी बरोबर ताटामध्ये विशिष्ट जागा असलेला पदार्थ म्हणजे ‘चटणी’. मिक्सरमधून ५ मिनिटात होणार्‍या आजीच्या पद्धतीच्या ८४ खमंग चटण्या योग्य प्रमाणासहित या पुस्तकात दिल्या आहेत.



35.00 Add to cart

आजीच्या विशेष चवीच्या पाककृती

…व्हेज-नॉनव्हेज


मीना चंपानेरकर


रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या ‘आजीच्या विशेष चवीच्या पाककृती’…!


45.00 Add to cart

उपवासाचे पदार्थ


मंगला बर्वे


जितके सणांचे, व्रतांचे वैविध्य, तितकेच उपवासाच्या पदार्थांचेही… फराळाचे पदार्थ, बेगमीचे पदार्थ, अल्पोपहार, गोड पदार्थ, भात-भाज्या-आमटी यांचे प्रकार, पोळ्या, पराठे… जोडीला नेम-नियम पाळून करता येण्यासारखी लोणची, चटण्या, कोशिंबिरी… एक ना दोन अशा जवळजवळ १७५ पाककृतींचा या पुस्तकात समावेश आहे.
सोबतच या फराळात वापरले जाणारे विविध जिन्नस, म्हणजे साबुदाणा, शेंगदाणे, वरईचे तांदूळ, राजगिरा आदींचीही वैशिष्टय, गुणधर्म, उपयुक्तता याबद्दलही माहिती करून दिली आहे. तसेच नेम-नियम, सण, व्रत-वैकल्य आदींच्याही इत्थंभूत माहितीचा या पुस्तकात अंतर्भाव आहे.


35.00 Add to cart

एक सायंकाळ एक पदार्थ

रात्रीच्या जेवणाचे ‘शॉर्टकट’ पर्याय


मंगला बर्वे


काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख…इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.


50.00 Add to cart

केक्स व कुकीज्


वसुमती धुरू


तुमच्याकडे ओव्हन-मिक्सर असो वा नसो, रुचकर व खमंग केक घरी बनवा! या पुस्तकात केक्स, आयसिंग, ब्रेडस, बिस्किट्स, नानकटाई इ. तसेच खास डाएटसाठी विशिष्ट केक्स व कुकीजच्या साध्या सोप्या रेसिपीज!


80.00 Add to cart

खमंग फराळ

चकली, शेव, चिवडा, थालीपीठ इ.


प्रमिला पटवर्धन


शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल!
खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.


30.00 Add to cart
1 2 5