978-81-86184-18-9 | Sugranicha Salla | सुगरणीचा सल्ला | स्वयंपाकातील विविध पदार्थ व जिनिसाविषयी १२0१ उपयुक्त टीपा | उषा पुरोहित | हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा संग्रह नव्हे . पाककौशल्यात पुस्तकी ज्ञानापलीकडले बरेच काही असते . आई – आजीकडून मिळणाऱ्या ज्ञानालाही सीमा असणार . म्हणूनच अनेक घरातील ‘ अनुभवांचे सार ‘ जर एकदम हाती पडले तर सोन्याहून पिवळे नाही का ? हेच वैशिष्ट्य असलेले १२०१ उपयुक्त टीपा असलेले हे पुस्तक फावल्या वेळेत वाचत गेल्यास कसे उपयोगी पडेल याची कल्पना येईल . उदाहरणार्थ लोणचे घालायचे तर ‘ साठवणीचे पदार्थ ‘ हा विभाग ‘ सल्लागार ‘ ठरतो . पुरण पोळी बनविण्यापूर्वी ‘ पक्वान्ने ‘ विभागातील सूचना कामी येतात . तसेच ‘ गुलाबजाम कडक झाले ‘ , ‘ भाजीत मीठ जास्त झाले ‘ , अशा संकटसमयी हे पुस्तक तत्परतेने मदतीला धावून येते . – पूर्वतयारी – अल्पोपहार – भाज्या – भात – डाळी – कडधान्ये – फळे – पक्वान्ने । उपवासाचे पदार्थ – साठवणीचे पदार्थ – विविधा , अशा नऊ ‘ सल्लागार ‘ विभागांनी सुसज्ज असे हे ‘ हँडबुक ‘ सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल . | Book | Rohan Prakashan | Marathi | 191 | पाककला | १०० |
संपूर्ण पाककला – शाकाहारी+नॉनव्हेज आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
उषा पुरोहित
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.