95 | Pavachya Vividh Pakakruti | पावाच्या विविध पाककृती | Vaijayanti Kelkar | वैजयंती केळकर | केटरिंग कॉलेजचे कोर्सेस, पाककृती क्लासेस घेणे, स्पर्धात परीक्षकाची भूमिका आणि पाककृतींची विविध प्रकाशित पुस्तके यामुळे या पुस्तकाच्या लेखिका सौ. वैजयंती केळकर यांचा पाककृती क्षेत्रातील अधिकार लक्षात येतो. अंगभुत गुण व कृतीशील स्वभाव यामुळेच त्यांना ‘श्रीमती महाराष्ट्र’ हा पुरस्कारही नुकताच प्राप्त झाला आहे. या पुस्तकात त्यांनी पावाच्या पाककृतींची भरपूर विविधता दिली आहे. ० सँडविचेस ० ब्रेड रोल्स ० टोस्टस् ० पिझ्झा-बर्गर ० गोड पदार्थ ० ब्रेड वापरून केलेले पदार्थ… …अशा सर्व पदार्थांबरोबरच ज्या पदार्थांची रंगत पावाबरोबर खाल्ल्याने वाढते अशा पदार्थांच्या पाककृतींचा समावेशही या पुस्तकात केला आहे. थोडक्यात सांगायचे तर पावाची रंगत वाढविणारे खास नव्या पिढीसाठी हे एक परिपूर्ण पुस्तक होय! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 84 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 | Bread recipes | Recipe | पाककला | 35 | Pavachya Vividh Pakakruti.jpg | Pavachya_pakakrutiBC.jpg |
बटाट्याचे पदार्थ
मंगला बर्वे
बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो.
विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे.
या पुस्तकात पारंपरिक ‘भजी’पासून ‘बर्डस् नेस्ट’ अशा आधुनिक पदार्थापर्यंत स्नॅक्सचे अनेक पदार्थ आहेत, बटाटयाच्या साध्या भाजीपासून ‘पुदिनेवाले आलू’पर्यंत भाजी-रश्यातही विविधता आहे. बटाटयाच्या पराठयाचे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे गोड पदार्थही आहेत.
या पुस्तकामुळे सर्वांच्या आवडीचा बटाटा वेगवेगळ्या रूपात व विविध चवीत रसिकांना एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे.
Reviews
There are no reviews yet.