मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी

२३ एप्रिल रोजी असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना'निमित्त ‘माझी निवड’ स्तंभात बहुविध वाचन करणारे सोलापूरस्थित वाचक व लेखक नीतीन वैद्य यांनी लेखन केलं आहे. वैद्य सातत्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या ललित तसंच ललितेतर ग्रंथांचं वाचन करत असतात. गुणवत्ता यादी बंद झाली, प्रश्नपत्रिका वाचायला अधिकचा वेळ मिळू लागला, तोंडी परीक्षा आणि कलाक्रीडाकौशल्यांच्या कागदी चवडींमधून अतिरिक्त गुणांची [...]

अद्‍भुत आणि रम्य

‘बाकड्यासमोर एक तरुण मुलगा बसला होता - जाडगेला, डोक्याचे संपूर्ण केस भादरलेले आणि अंगावर फाटक्या चिंध्या. मी त्याला बरेचदा पाहिलं होतं. तो वेडा होता बहुधा. लोक त्याला ‘गूंगा’ म्हणत. चहाच्या दुकानात येणारी गिऱ्हाइकं बरेचदा त्याची चेष्टा करत, टर उडवत, त्याच्या डोक्यावर टपली मारत. पण हे गमतीगमतीत बरं का. गूंगालाही त्याचं काही वाटत नसे. तो त्यांच्याकडे [...]

‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ पुस्तकातील ‘नाकबळी’ कथेतला निवडक अंश

शेअरबाजार आणि इतर बाजार यांतील महत्त्वाचा फरक काय? अंजोरला मुळात कळलंच नाही की, आशु नक्की काय म्हणतो आहे ते.तसं दोघांना सवड मिळाली की, त्यांचं मनमोकळं चॅट चालायचंच. त्यात काहीतरी नेहमीसारखेच उडते विषय सुरू असताना आशुकडून मध्येच हे कुठून आलं : ‘‘मी तुझं नाक आंजारलं-गोंजारलेलं तुला चालेल का?’’ ह्यावर तिने लिहिलं : ‘‘शी, घाणेरडा! त्यात मी [...]

‘क्ष-क्षुल्लक…’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश

चौदावं रत्न पुरस्कार आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो. यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तकं आम्ही चाळली. आम्ही म्हणजे आम्ही चौघांनी. पण त्यात आम्हाला फार रस नव्हता. कारण यशस्वी काय कोणीही होतो. ज्याच्या घरी गाडी आहे, जो शनिवारी आणि रविवारी बायकोला घरी स्वयंपाक करू देत नाही, [...]

‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट…’ ई-बुकमधील निवडक अंश

रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा ते सेमिनार दोन दिवसांचं होतं आणि मला खरंतर ‘मल्हारी पांडव रावण’ वगळता नेहमीच्या यशस्वी अदाकारांमध्ये काडीचाही रस नव्हता. पण त्या बाबतीत मी असं ठरवलं होतं की, पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ‘मल्हारी पांडव रावण’चा वावर फक्त निरखायचा आणि संध्याकाळच्या गप्पांमध्ये आपणहूनच जाऊन ओळख करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र आणखी जवळीक [...]

‘96 मेट्रोमॉल’ कादंबरीतील निवडक भाग

धर मला, धर मला, धर धर धर… मयंकला त्याच्यासमोर मोठ्ठा, आडवातिडवा सिमेंट क्रॉन्क्रीटचा रस्ता निपचित पडलेला दिसला. त्याच्याभोवती ना अंधार होता, ना उजेड. तर त्या दोघांचं मिश्रण असलेलं वेगळंच वातावरण होतं – करडं-पिवळं. त्यामध्ये काचेवरून परावर्तित झालेला निळसर-पांढरा रंग मिसळलेला होता. तो काही पावलं चालत पुढे गेला. त्याने डावीकडे पाहिलं, तर नजर जाईल तिथपर्यंत मोठमोठाल्या [...]

‘काळजुगारी’ कादंबरिकेतील निवडक भाग

ती पाच माणसं होती. पाचही जणांचा पोशाख समान होता. प्रत्येकाने अंगावर पिवळसर रंगाचा कुर्ता घातला होता. अंगाखाली पंजाबी लोक घालतात तसा काळ्या रंगाचा पायजमा होता. गळ्यात मोठाल्या मण्यांच्या माळा होत्या. पोरगेल्याशा दिसणाऱ्या नुकत्याच वयात येऊ पाहणाऱ्या त्यांच्या एका साथीदाराचा अपवाद वगळता चौघांनाही दाढ्या होत्या. अंगापिडाने एखाद्या पूर्ण वाढ झालेल्या घोड्यागत दिसणारा त्यांचा म्होरक्या पुढे झाला [...]

जीवनातील गुंत्याचा वेध घेणाऱ्या कथा

आजच्या मराठी कथेचा विचार करताना तीन प्रवृत्ती दिसून येतात. पहिली; वास्तव जीवनातील घटितांना, प्रश्नांना प्राधान्य देणारी. रचनेकडे तिचं फारसं लक्ष नसतं. दुसरा प्रकार, काहीतरी उच्चभ्रू संस्कृतीतले कृतक प्रश्न घ्यायचे आणि त्यावर कथा बेतायची. नायक किंवा नायिका अतिश्रीमंत, तथाकथित बुद्धिमान, तिला किंवा कथेतल्या एखाद्या पात्राला सतारीचं किंवा संगीताचं अकारण वेड, नायक किंवा नायिका किंवा तिचा मुलगा [...]

‘एक कुत्ते की मौत’ या कथेतील निवडक अंश

सकाळी जाग आली तेव्हा साडेसात वाजून गेले होते. उठल्या उठल्या मनात पहिला विचार आला, तो रात्रीच्या आवाजाचा. मनात एक विचित्र अशी अस्वस्थता भरून राहिली. जणूकाही तो आवाज माझ्या मनात रुतून बसला असावा.मग तोंड धुताना जेव्हा मी शांतपणे विचार केला, तेव्हा मला अगदी नीट आठवलं की रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. आणि त्या स्वप्नामुळेच [...]
1 2