उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा

व्यवसाय करण्यासाठी पैसा नव्हे, वृत्ती हवी!


सुरेश हावरे


आपल्या समाजात उद्योजकांविषयी एक प्रकारचं कुतूहल आणि अनेक प्रकारचे समज-गैरसमज असतात. उद्योगाशी निगडित अशा अनेक समजुतींचा तसंच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देणार्‍या घटनांचा ऊहापोह या पुस्तकात लेखकाने अतिशय रंजकपणे केला आहे.
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत.

जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील.
‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील


195.00 Add to cart

इंटरनेट वापरतील धोके टाळण्यासाठी

अर्थात सायबर सिक्युरिटी


[taxonomy_list name=”product_author” include=”524″]


सध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे माध्यम जगण्याचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. संगणक, स्मार्टफोन यांच्यामार्फत हे बहुउपयोगी माध्यम वापरून सहकार्‍यांशी, नातेवाइकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी करता येते; इतकंच नाही तर इंटरनेट बँकिंग, क्रेडिटडेबिट कार्ड यांचा वापर करून घरबसल्या आपले आर्थिक व्यवहारही एका ‘क्लिक’सरशी करता येतात.
पण या माध्यमाचा वापर करताना अनेक धोकेही संभवतात. ते धोके कोणते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची माहिती फारच थोडया जणांना असते. या पुस्तकात ही उपयुक्त माहिती सहजसोप्या भाषेत उदाहरणांसह सचित्र देण्यात आली आहे :

* इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा?

* सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा?

* जंकस्पॅमफिशिंग म्हणजे काय?

* व्हायरससारख्या घातक सॉफ्टवेअर्सचे प्रकार

* इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड यांचा सुरक्षित वापर कसा करावा?

* फेसबुकसारख्या सोशल नेटवगि साइट्सवर वावरताना कोणती काळजी घ्यावी?

* ऑनलाइन फसवणूक किंवा खंडणी म्हणजे काय?

* स्मार्टफोनचा सुरक्षित वापर कसा करावा?

* ईमेल अकौंट, बँक खातं वा क्रेडिट कार्ड यांबाबतीत समस्या निर्माण झाल्यास काय करावं?

सर्व वयोगटातील व्यक्ती, कर्मचारी-व्यावसायिक-उद्योजक आणि बँका, शासकीय व शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरावं…
इंटरनेटचा वापर सुरक्षित व ‘स्मार्टपणे’ कसा करावा, याबाबत ‘साक्षर’ करणारं पुस्तक!


200.00 Add to cart

सल्ले लाख मोलाचे

५५ नामवंतांचे जीवन बदलून टाकणारे मौलिक सल्ले


बिझनेस टूडे टीम


आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात. बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, पण काही जण हे सल्ले किंवा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात, म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात!
हे जाणूनच विज्ञान-तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ, मनोरंजन, जाहिरात, चित्रपट, वैद्यक, साहित्य आणि उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…
नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन…
…नातेसंबंध सुधारण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील.
यातलं एखादं पान तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन मनोबलही वाढवेल… आणि पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!



75.00 Add to cart

MBA @ वय वर्ष 16

शाळा व कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यवस्थापन व व्यवसायाचे बाळकडू


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”562″]


सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!
या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.
बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…


125.00 Add to cart

आहाराविषयी सारे काही

आपल्या आरोग्यानुसार आपल्या आहाराची काळजी घेणारे पुस्तक


वसुमती धुरू


आहारतज्ज्ञांनी किंवा डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आहार घेण्याची आपली कितीही इच्छा असली, तरी पोषणमूल्यांचे क्लिष्ट ‘गणित’ सोडवून एखादा पदार्थ करताना कॅलरीज, कोलेस्टेरॉल, प्रथिनं आदींचं संतुलन साधणं कठीण जातं. त्यात त्या पदार्थाची चव किंवा वैशिष्टय राखण्याची कसरत करणं म्हणजे महाकठीणच काम!
हे लक्षात घेऊनच ज्येष्ठ आहारतज्ज्ञ वसुमती धुरू यांनी या पुस्तकात पाककला व आहारशास्त्र यांचा सुयोग्य मेळ साधला आहे. सर्व प्रकारच्या विविध पाककृती पध्दतशीरपणे देऊन त्या खाली त्या पदार्थाच्या प्रत्येक वाटपातून प्रत्येकाला किती प्रमाणात प्रथिनं, खनिजं, जीवनसत्त्वं, तंतू, कॅलरीज इ. पोषणमूल्यं लाभतील याचा ‘रेडीमेड’ तक्ताच दिला आहे. तसेच हा पदार्थ कोणत्या आजारासाठी वा व्याधीसाठी पथ्यकारक ठरेल वा कुपथ्यकारक ठरेल, कुणी तो आवर्जून खावा, कुणी तो कमी प्रमाणात खावा, कुणी तो वर्ज्य करावा याचीही माहिती तिथल्यातिथेच दिली आहे. या पुस्तकाची हीच वैशिष्टये आहेत, म्हणूनच हे पुस्तक इतर पाककृती व आहारशास्त्रावरील पुस्तकांपेक्षा संपूर्णपणे आगळंवेगळं ठरावं.
थोडक्यात, गृहिणींना पाककलेसोबतच आहारशास्त्रावरही सहजपणे पकड घेण्यास समर्थ करणारं व भान देणारं पुस्तक आहाराविषयी सारे काही…



225.00 Add to cart

नोबेल कथा

नोबेल’ची पार्श्वभूमी आणि विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय व त्यांच्या असामान्य कार्याचा वेध…


[taxonomy_list name=”product_author” include=”385″]


अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल निरनिराळया क्षेत्रांमधील असामान्य व्यक्तींना गेली ११२ वर्षे नोबेल पुरस्कार दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
या पुस्तकामध्ये डॉ. चोबे यांनी सुरुवातीला आल्फ्रेड नोबेल यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं संशोधन व संशोधनादरम्यान त्यांनी दिलेला लढा हे सर्व उद्बोधकपणे रेखाटलं आहे. या पुरस्काराची पार्श्वभूमी आणि त्यांचा रंजक इतिहासही त्यांनी दिला आहे. त्यानंतर वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, अर्थशास्त्र आणि शांतता अशा विविध क्षेत्रांत नोबेल पारितोषिकप्राप्त निवडक ४७ दिग्गजांचा व्यक्तिपरिचय आणि त्यांच्या संशोधनाची व कार्याची तपशीलवार माहिती सहज सुंदर शैलीत पुस्तकातील प्रकरणांमधून वाचायला मिळते.
‘नोबेल लॉरेट्सचे असामान्य गुण कोणते?’ व ‘भारतामध्ये नोबेल पारितोषिक मिळवण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण निर्माण करता येईल का?’ याबाबतचे विचारही डॉ. चोबे लेखात मांडतात.
‘नोबेल’ विजेत्यांच्या या कथा सर्वच वयोगटातील व्यक्तींचं कुतूहल शमवून त्यांच्या ज्ञानात अनमोल भरही घालतील…



340.00 Add to cart

नावीन्यपूर्ण बदल घडवताना

११ भारतीय उद्योजकांनी अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य करून दाखवल्या… त्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रेरणादायी प्रवास…


पोरस मुंशी
अनुवाद : जॉन कॉलोसो


दुसर्‍यांच्या उत्पादनाची हुबेहूब नक्कल करणं किंवा त्यात थोडे बदल करणं अशा मानसिकतेतून भारतीय उद्योजक आता बाहेर पडले आहेत. स्वत:ची नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणणार्‍या भारतीय उद्योजकांचा उद्योग-क्षितिजावर उदय होऊ लागला आहे. इतकंच नव्हे, तर जागतिक बाजारपेठा काबीज करण्यासाठी नावीन्यपूर्ण बदल घडवतानाही ते दिसत आहेत. भारतीय कंपन्या केवळ जागतिक मापदंडांची पूर्तता करत नाहीत, तर त्या आज स्वत:चे मापदंड निर्माण करू लागल्या आहेत. आज ‘इनोव्हेशन’ हा भारतीय उद्योगाचा परवलीचा शब्द ठरू पाहात आहे. अशक्य कोटीतील वाटाव्या अशा गोष्टी शक्य करून दाखवणार्‍या ११ भारतीय कंपन्यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास या पुस्तकात तपशिलात दिला आहे. या उपक्रमांनी नावीन्यपूर्ण बदल घडवले आणि उद्योगजगतातील संदर्भ बदलून टाकले आहेत… त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख देणारे हे नावीन्यपूर्ण पुस्तक सर्वांना निश्चितच रोचक वाटेल, प्रेरणादायी वाटेल… ‘‘नावीन्यपूर्ण बदलांमागील वैचारिक प्रक्रिया या पुस्तकात अधोरेखित केली आहे हेच या पुस्तकाचं वेगळेपण आहे. लेखनपद्धतही अभिनव असल्यामुळे ते मनाला अधिक भिडतं. हे लिखाण प्रेरक असून या आगळ्या वाटा अनेकांना अनुकरणीय वाटतील.’’ – रतन टाटा


325.00 Add to cart

तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक

प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


सुब्रोतो बागची
अनुवाद : चित्रा वाळिंबे


उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्यं कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे. पुस्तकाचे लेखक सुब्रोतो बागची यांनी MindTree ही त्यांची कंपनी वयाच्या ४२व्या वर्षी सुरू केली. शून्यापासून सुरू केलेली ही कंपनी सहा वर्षांत त्यांनी उच्च स्थानावर पोचवली, ती धडाडी व कार्यक्षमता यांच्या बळावर! त्या अनुभवांतून साकार झालेलं बागची यांचं हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरतं!


250.00 Add to cart

मैत्री व्यावसायिकतेशी

‘प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


सुब्रोतो बागची
अनुवाद : उल्का राऊत


सुप्रसिद्ध व्यावसायिक व MindTree या यशस्वी कंपनीचे प्रवर्तक सुब्रोतो बागची यांच्या गाजलेल्या ‘The PROFESSIONAL’ या पुस्तकाची मराठी आवृत्ती म्हणजे ‘मैत्री व्यावसायिकतेशी’! सुब्रोतो बागची यांच्या अंतर्मनाचा आविष्कार आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांवर आधारित त्यांचे विचार या पुस्तकात अंतर्भूत आहेत. केवळ व्यवसाय करणे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून करणे यात फरक आहे. यशस्वी होण्याच्या वृत्तीबरोबरच व्यावसायिक वृत्ती अंगी बाणावी लागते. व्यावसायिकता म्हणजे त्यात विशिष्ट पद्धती रूढ करणं आलं, सचोटी आली, भविष्याचा वेध घेणं आलं आणि त्यात विकास साधणंही आलं. तसंच उत्तम नियोजन करणं आणि कामाची शिस्त पाळणंही आलं. त्याचप्रमाणे काही मूल्य जोपासणही आलं. व्यावसायिकता म्हणजे केवळ प्रचंड नफा मिळवणं नव्हे, तर उच्च नीतिमूल्यांची जोपासना करून उत्तम नियोजनातून तो मिळविणं. सुब्रोतो बागची या पुस्तकात व्यावसायिकता कशी जोपासावी, हे कधी सूचकपणे तर कधी अनुभवांच्या आधारे सांगतात. सर्व व्यावसायिकांना, उद्योजकांना किंवा तो करू इच्छिणार्‍यांना, तसेच महत्त्वाकांक्षी नोकरदारांनाही हे पुस्तक मौलिक मार्गदर्शन करणारं ठरेल.


250.00 Add to cart

कारेनामा


[taxonomy_list name=”product_author” include=”1728″]


औषधं आपल्या सर्वांनाच कधी ना कधी घ्यावी लागतात. पण औषधं तयार होण्यामागचा खटाटोप आपल्याला माहीत नसतो. सुरेश कारे हे इंडोको रेमेडीज या औषध कंपनीचे प्रमुख. लहानपणापासून घरात औषधांच्या आसपासच ते वाढले. ‘‘आमच्या औषधांमुळे लोकांना बरं वाटू दे’’, अशी प्रार्थना करत लहानाचा मोठा झालेला सुरेश कारे नावाचा मुलगा आज इंडोको या पाचशे कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचा प्रमुख आहे. इंडोको ही भारतातली एक अग्रगण्य औषध कंपनी बनली ती वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत सुरेश कारे यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे आणि कल्पकतेमुळे. सुरेश कारे यांच्या स्वयंस्फूर्त कर्तृत्वाचा आलेख रसिल्या शब्दांमध्ये मांडणारं ‘कारेनामा’ हे पुस्तक उद्योजकता व कल्पकता यांच्या जोरावर भरारी घेणार्‍या एका माणसाची कहाणी सांगतं. गोव्याच्या प्रसन्न आणि निर्मळ संस्कृतीचा वारसा घेऊन आलेल्या सुरेश कारे यांच्या जडणघडणीचा हा प्रवास वाचकांना नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.

 

295.00 Read more

सभेत कसे बोलावे


माधव गडकरी


महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यात श्री. माधव गडकरी यांची भाषणे गाजत आहेत. शिक्षण-संस्था, खासगी-संस्था, राजकीय संघटना आणि इतर संघटनांकडून माधव गडकरी यांना भाषणासाठी सतत बोलावण्यात येते. वयाच्या २१ व्या वर्षापासून श्री. गडकरी हे भाषण करीत आले आहेत. त्यामुळे भाषण-शास्त्राचा त्यांचा दीर्घानुभव आहे. या दीर्घानुभवाच्या साहाय्याने ‘सभेत कसे बोलावे?’
हे पुस्तक सर्वांना उपयोगी पडेल असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विविध प्रसंगी कसे बोलावे हे अनेक नामवंतांची भाषणे या पुस्तकात देऊन त्यांनी पटविले आहे. भाषण करताना येणार्‍या अडचणी, त्यातील दोष यांचे त्यांनी उत्तम तऱ्हेने विवेचन केलेले आहे. थोडक्यात म्हणजे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना, त्याचप्रमाणे वेगवेगळया वर्तुळात कार्य करणार्‍या व्यक्तींना व सभेत समाजसेवकांना समयोचित कसे बोलावे हे श्री. माधव गडकरी यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक भाषणे करणार्‍यांना, ठरविणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते.


100.00 Add to cart

दोन सुयांवरील आधुनिक विणकाम

(तान्ह्या बाळांपासून तरूण-तरूणींपर्यंत सर्वांसाठी विविध आकर्षक व नवनवीन प्रकार)


प्रतिभा काळे


विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं. त्यांचं वैशिष्टय हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत.
या नव्या पुस्तकात प्रतिभा काळे
यांनी विणकामासंबंधी अनेक उपयुक्त सूचना, काही कानमंत्र, टाक्यांची सचित्र माहिती, विणींचे नमुने इ. प्राथमिक माहिती देऊन विविध वयातील लहान मुलांसाठी स्वेटर्स, टोप्या, बूट, फ्रॉक यांचे प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणींसाठीही अनेक आकर्षक प्रकारांचा समावेश केला आहे. मुख्य म्हणजे नव्या पिढीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नवे डिझाइन्स, नव्या फॅशन्स, नवे
प्रकार यांना प्राधान्य दिलं आहे. सर्व प्रकारांची रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रंही दिली आहेत.


250.00 Add to cart

स्वानुभवी शिवणकला


मंगला राजवाडे


४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्‍यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.
या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत.
शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्‍चित!


180.00 Add to cart

लोकरीचे आकर्षक प्राणी व बाहुल्या


मंगला बर्वे


मंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे
या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.


95.00 Add to cart

कापडावरील कलाकुसर


[taxonomy_list name=”product_author” include=”709″]


कापडाचे उपयोग अनेक आणि कलाकुसरीने सुशोभित केलेल्या कापडामुळे तर उपयुक्तता आणि सौंदर्य दोन्ही गोष्टी साध्य होतात.
भरतकाम, विणकाम इ. कलांची जोपासना करणार्‍या सुप्रसिद्ध लेखिका प्रतिभा काळे यांनी नेमके हेच लक्षात घेऊन या पुस्तकात अनेक कलाकुसरींची ओळख करून दिली आहे. यामुळे आपणास कपडयांची आकर्षकता वाढविता येईल, अनेक कलात्मक वस्तूही तयार करता येतील आणि आपले छंद जोपासून जीवनातील आनंद द्विगुणित करता येईल.
या पुस्तकात भरतकामातील विविध टाके, क्रॉस स्टिच, कशिदा यांची सचित्र माहिती व नमुने तर दिले आहेतच, पण स्मॉकिंग, पॅचवर्क, आरसे लावणे इ. अनेक कलातील विविधताही येथे दाखविली आहे. तसेच अशा कलाकुसरीतून बनणार्‍या अनेक वस्तू व अनेक तयार डिझाइन्सही दिली आहेत.


125.00 Add to cart

तुम्हाला ब्युटीपार्लर चालवायचंय?


माया परांजपे


आजचं युग फॅशनचं आहे. सर्वत्र फॅशनचे महत्त्व वाढले आहे. चित्रपट, परदेशांशी वाढता संपर्क अशा अनेक कारणांमुळे वेगवेगळ्या फॅशन्स, सौंदर्य-प्रसाधने इत्यादींचे महत्त्व फारच वाढत चालले आहे. अशा कारणांमुळे स्त्रिया ‘ब्युटीपार्लर’ चालवावयास लागल्या आहेत. काही स्त्रिया आपल्या घरातच ‘ब्युटीपार्लर’ (लहान प्रमाणात) चालवतात व पैसे मिळवतात. अशा परिस्थितीत स्त्रियांना ‘ब्युटीपार्लर’ चालवताना काही अडचणी येऊ नयेत म्हणून हे पुस्तक लिहिले.
ब्युटीपार्लरसाठी जागा, आर्थिक मदत, ब्युटीपार्लरची ठेवण, त्यासाठी लागणार्‍या गोष्टी, ब्युटीपार्लरची आंतररचना इ. सर्व माहिती या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीस उत्तम ब्युटीपार्लर चालविता येईल.


100.00 Add to cart