इंटरनेट वापरतील धोके टाळण्यासाठी

200.00

अर्थात सायबर सिक्युरिटी


अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

सध्याच्या ऑनलाइन युगात इंटरनेट हे माध्यम जगण्याचा एक अत्यावश्यक भाग बनलं आहे. संगणक, स्मार्टफोन यांच्यामार्फत हे बहुउपयोगी माध्यम वापरून सहकार्‍यांशी, नातेवाइकांशी तसेच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी करता येते; इतकंच नाही तर इंटरनेट बँकिंग, क्रेडिटडेबिट कार्ड यांचा वापर करून घरबसल्या आपले आर्थिक व्यवहारही एका ‘क्लिक’सरशी करता येतात.
पण या माध्यमाचा वापर करताना अनेक धोकेही संभवतात. ते धोके कोणते आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात याची माहिती फारच थोडया जणांना असते. या पुस्तकात ही उपयुक्त माहिती सहजसोप्या भाषेत उदाहरणांसह सचित्र देण्यात आली आहे :

* इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा?

* सुरक्षित पासवर्ड कसा तयार करावा?

* जंकस्पॅमफिशिंग म्हणजे काय?

* व्हायरससारख्या घातक सॉफ्टवेअर्सचे प्रकार

* इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड यांचा सुरक्षित वापर कसा करावा?

* फेसबुकसारख्या सोशल नेटवगि साइट्सवर वावरताना कोणती काळजी घ्यावी?

* ऑनलाइन फसवणूक किंवा खंडणी म्हणजे काय?

* स्मार्टफोनचा सुरक्षित वापर कसा करावा?

* ईमेल अकौंट, बँक खातं वा क्रेडिट कार्ड यांबाबतीत समस्या निर्माण झाल्यास काय करावं?

सर्व वयोगटातील व्यक्ती, कर्मचारी-व्यावसायिक-उद्योजक आणि बँका, शासकीय व शैक्षणिक संस्था अशा सर्वांनाच हे पुस्तक उपयुक्त ठरावं…
इंटरनेटचा वापर सुरक्षित व ‘स्मार्टपणे’ कसा करावा, याबाबत ‘साक्षर’ करणारं पुस्तक!


Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.