Amar chitra katha 12 pustakancha Sanch | अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच | रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | amar chitra katha | अमर चित्र कथा | 1307 |
₹1,307.00
Add to cart₹1,307.00
अमर चित्र कथा
रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत
१२ पुस्तकांचा संच
१. पौराणिक व जातक कथा
२. वैज्ञानिक व उद्योजक गाथा
३. प्रेरणादायी व्यक्ती कथा
Amar chitra katha 12 pustakancha Sanch | अमर चित्र कथा १२ पुस्तकांचा संच | रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | amar chitra katha | अमर चित्र कथा | 1307 |
Weight | 300 g |
---|---|
Dimensions | 21.7 × 14.1 × 1.2 cm |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
शाळा व कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यवस्थापन व व्यवसायाचे बाळकडू
सुब्रोतो बागची
अनुवाद :उल्का राऊत
सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!
या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.
बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
राजरप्पाच्या खडकाळ नदी किनार्यावरील एकाकी छिन्नमस्त मंदिराजवळ घडलेल्या घटनेचे पर्यवसान हजारीबाग येथील एका कुटुंबाचे प्रमुख महेश चौधरी यांच्या मृत्यूत होते. सांकेतिक संदेश लिहिलेल्या डायर्या, हरवलेला एक मौल्यवान तिकीटसंग्रह यामुळे रहस्यात भरच पडते. त्या खेरीज हजारीबागेच्या रस्त्यावर सर्कशीतला एक वाघ मोकाट फिरत असतो. त्यामुळे तर रहस्यकथेला एक वेगळा थरारक रंग चढतो. फेलूदाच्या अप्रतिम कौशल्याचे प्रत्यंतर देणारी ही आणखी एक उत्कंठापूर्ण व वाचनीय कादंबरी.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे दहावे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. ‘भारत ऑपेरा’ या नाटक कंपनीत काम करणारे इंद्रनारायण आचार्य एके दिवशी फेलूदाकडे मदत मागायला येतात. इतर कंपन्यांचे मालक आपल्या कंपनीत येण्यासाठी आचार्यांना मोठमोठ्या ऑफर्स देत असतात. त्यामुळे त्यांची मन:स्थिती द्विधा झालेली असते. कारण भारत ऑपेराने त्यांना मानसन्मान दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते. हा दोन गटांचा संघर्ष कोणत्याही थराला जाईल, अशी भीती आचार्य यांना वाटत असते; होतंही तसंच! आणि मग आचार्यांच्या खुनाचं प्रकरण अधिकच गूढ-गहिरं होत जातं…
२. ख्यातनाम चित्रपटकर्ता पुलक घोषाल यांनी लालमोहनबाबूंच्या एका कादंबरीवर चित्रपट तयार करायचं ठरवलेलं असतं. त्यात लालमोहनबाबूंना लहानशी भूमिकाही दिलेली असते. शूटिंग दार्जिलिंगला असल्याने लालमोहनबाबू फेलूदा आणि तपेशलाही सुट्टी घालवण्यासाठी तिथे घेऊन जातात. फेलूदाही एकही काम न स्वीकारता, सुट्टीची मजा लुटायची असं ठरवतो. पण ज्या घरात त्यांचं शूटिंग होणार असतं, त्या घराच्या मालकाचा खून होतो आणि मग फेलूदाला दार्जिलिंगमधील खुनाचं रहस्य सोडवावंच लागतं!
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ची मालिका सर्व वयोगटाच्या वाचकांमध्ये लोकप्रिय झाल्याने ‘रोहन प्रकाशन’ पुन्हा एकदा घेऊन आलं आहे – याच फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या आणखी १२ थरारक कथांचे ४ संग्रह; त्यातल्या या २ कथा…
१. एकदा बाजारात फेलूदाची भेट जुन्या वस्तूंचे संग्राहक पार्वतीचरण यांच्या नातवाशी होते. फेलूदाचा चाहता असल्याने तो त्याला अचानक पिंजर्यातून गायब झालेल्या त्याच्या पोपटाचा शोध घेण्याची विनंती करतो. म्हणून फेलूदा त्याच्या घरी जातो. तेव्हाच पार्वतीचरण यांचा खून होतो, आणि मौल्यवान असलेलं ‘नेपोलियनचं पत्र’ही गायब होतं. फेलूदाला पोपटाच्या पिंजर्यावर रक्ताचे डागही सापडतात…!
२. जगप्रसिध्द चित्रकार टिंटोरेट्टोचं एक चित्र चित्रकार चंद्रशेखर यांना भेट मिळालेलं असतं. त्या चित्राची किंमत काही लाखांमध्ये असते. वारसा हक्काने त्या चित्राचे हक्क चंद्रशेखर यांच्या मुलाकडे असल्याने चित्र पाहण्यासाठी तो चुलतभावाकडे – नवकुमार यांच्याकडे येतो. तेव्हाच घरातल्या एका म्हातार्या कुत्रीचा ‘खून’ होतो. तपासात फेलूदाला कळतं की, ते चित्र बनावट आहे! खर्या चित्राचा शोध घेत फेलूदा पोहोचतो थेट हाँगकाँगला …’टिंटोरेट्टोच्या येशू’च्या शोधात!
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
एका मौल्यवान हस्तलिखिताचा शोध घेत असताना फेलूदा व त्याच्या सोबत्यांना चमत्कारिक व भयंकर माणसं भेटतात आणि फेलूदाला एक रक्त गोठवणारं गूढ व गहन प्रकरण सोडवावं लागतं. हस्तलिखिताचे संग्राहक जी. जी. सेन, त्यांचा चिटणीस निशीथ, वन्यजीवन फोटोग्राफर बिलास मजुमदार व ज्योतिषी लक्ष्मण भट्टाचार्य यांच्यात एक थंड डोक्यानं काम करणारा गुन्हेगार असतो आणि उशीर होण्यापूर्वी त्याला थांबवायचं असतं. जगन्नाथ पुरीच्या सागर किनार्यावर समुद्राइतकीच गूढ, गहिरी व गुंतवून टाकणारी ही थरारक गोष्ट.
सत्यजित रे लिखित किशोरवयीन, तरुण व सर्वच वाचकवर्गाला खिळवून ठेवणार्या ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ रहस्यकथांच्या १२ पुस्तकांपैकी हे अकरावे पुस्तक.
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
Reviews
There are no reviews yet.