Featured

340.00

डायबेसिटी थोपवण्यासाठी


डायबेसिटी + स्थूलता = डायबेसिटी


डॉ. प्रदीप गो. तळवलकर हे गेली तीस वर्षे ‘मधुमेहतज्ज्ञ’ म्हणून मुंबई शहरात व्यवसाय करत आहेत. सुरुवातीची वीस वर्षे इंटर्नल मेडिसिन आणि गेली दहा वर्षे मधुमेहावरील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ते प्राध्यापक म्हणून मार्गदर्शन करत आहेत. विविध परिषदा, परिसंवाद यांत वक्ता म्हणून त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी पश्चिम भारतासह संपूर्ण भारतात विस्तृत प्रमाणावर व्याख्याने दिली आहेत. त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून पन्नासहून अधिक संशोधनपर लेख लिहिले आहेत. तसेच सामान्य जनता, फॅमिली डॉक्टर्स आणि तज्ज्ञांसाठी मधुमेहावर पुस्तके लिहिली आहेत. मधुमेहाबद्दल रुग्णांना शिक्षण देण्याच्या बाबतीत डॉ. तळवलकर अतिशय प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते प्रत्यक्ष आदान-प्रदान कार्यक्रमात, तसेच वृत्तपत्रे-नियतकालिके, रेडियो, दूरचित्रवाणी, वेब कॉन्फरन्सेस इत्यादी माध्यमांमधूनदेखील रुग्णांना आणि त्यांची शुश्रूषा करणाऱ्या नातेवाइकांना मधुमेहाबद्दल अद्ययावत माहिती मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात. ‘एपीआय टेक्स्टबुक ऑफ मेडिसिन'-(सहावी आवृत्ती) या पाठ्यपुस्तकाचे ते ‘साहाय्यक संपादक’ आहेत. हे पुस्तक अतिशय लोकप्रिय असून भारतभर त्याचा फार मोठा वाचकवर्ग आहे. मधुमेहावरील विविध आंतरराष्ट्रीय परिषदांना उपास्थित राहण्याच्या निमित्ताने आणि मधुमेहासंबंधी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांना निरीक्षकाच्या भूमिकेतून भेटी देण्याच्या निमित्ताने डॉ. तळवलकर यांनी जगभर प्रवास केला आहे. १९८८ साली ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे भरलेल्या इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनच्या कॉन्फरन्सपासून या संघटनेच्या जगभर भरणाऱ्या सर्व कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी संशोधन सादर करून सक्रीय सहभाग घेतला आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध एस.एल.रहेजा या फोर्टीस असोसिएट रुग्णालयात, तसेच धन्वंतरी आणि शुश्रूषा या रुग्णालयात ते ‘मानद मधुमेह-तज्ज्ञ’ म्हणून काम पाहतात.

‘डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा….

सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)…

या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन समस्यांच्या नावातून जगभर नवी संज्ञा निर्माण झाली…’डायबेसिटी’! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुंबईस्थित मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी नेमक्या याच आरोग्य समस्यांना केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केली आहे. त्यातूनच पुस्तकाचं नामकरण झालं… डायबेसिटी थोपवण्यासाठी.

पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थूलता व मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. त्याचप्रमाणे पुस्तकात मधुमेहाची सर्वसाधारण माहिती ते ‘लेटेस्ट’ उपलब्ध माहिती दिली असून त्याबरोबर आहार नियोजन, व्यायाम, औषधोपचार आणि इतर सर्व मार्गदर्शनही केलं आहेच.

एक अत्याधुनिक व परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक डायबेसिटी थोपवण्यासाठी.


 


978-3-92374-69-2 Diabesity thopavnyasathi डायबेसिटी थोपवण्यासाठी Dr. Pradeep Talwalkar डॉ. प्रदीप तळवलकर डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा….

सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)…

या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन समस्यांच्या नावातून जगभर नवी संज्ञा निर्माण झाली…’डायबेसिटी’! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुंबईस्थित मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी नेमक्या याच आरोग्य समस्यांना केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केली आहे. त्यातूनच पुस्तकाचं नामकरण झालं… डायबेसिटी थोपवण्यासाठी. पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थूलता व मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. त्याचप्रमाणे पुस्तकात मधुमेहाची सर्वसाधारण माहिती ते ‘लेटेस्ट’ उपलब्ध माहिती दिली असून त्याबरोबर आहार नियोजन, व्यायाम, औषधोपचार आणि इतर सर्व मार्गदर्शनही केलं आहेच.

एक अत्याधुनिक व परिपूर्ण मार्गदर्शक पुस्तक डायबेसिटी थोपवण्यासाठी.

paper back book Rohan Prakashan Marathi 204 Health आरोग्य 340

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.