डाएट डॉक्टर

तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी परिपूर्ण डाएट प्लॅन देणारा


ईशी खोसला
अनुवाद : डॉ.अरुण मांडे


फक्त फलाहार करणे , फक्त पालेभाजी – भाकरीच खाणे , फक्त एक वेळेसच जेवणे … वजन कमी करण्याचे असे चित्र – विचित्र व अशास्त्रीय उपाय करून तुम्ही कंटाळला आहात का ? तर मग सोप्या , संयमित आणि शास्त्रीयदृष्ट्या योग्य अशा पद्धतीने वजन कमी करण्यासाठी तयार व्हा ! या पुस्तकाच्या लेखिका ईशी खोसला या दिल्लीस्थित विख्यात आहारतज्ज्ञ आहेत . पुस्तकात त्या ‘ ओव्हरवेट’च्या समस्येकडे वळण्याआधी भारतीयांची देहयष्टी , त्यांचा नित्य आहार आणि त्यांचं वजन वाढण्यामागची कारणं अशा मूलभूत घटकांची चर्चा करतात . त्यामुळे वजनासंदर्भातल्या संकल्पनांचं पूर्णपणे निराकरण होतं . या पुस्तकाची वैशिष्ट्य म्हणजे * भारतीयांच्या ठेवणीमुळे वजन कमी करण्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्याप्रमाणे मार्गदर्शन * प्रत्येकाच्या वजनानुसार कोणते अन्नघटक घ्यावेत याचं काटेकोर मार्गदर्शन * नाष्टा , दुपारचं जेवण , मधल्या वेळेचं खाणं आणि रात्रीचं जेवण कसं व काय घ्यावं याचं मार्गदर्शन * सहज – सोप्या व टेस्टी पाककृतींचा समावेश तुमच्या प्रकृतीनुसार वजन कमी करण्यासाठी शास्त्रसिद्ध उपाय सांगणारा असा हा खात्रीशीर ‘ डाएट डॉक्टर ‘ … !


35.00 Read more

गाणी भोंडल्याची


वैजयंती केळकर


भोंडला, हादगा, भुलाबाई हे पोरीबाळींचे खेळण्याचे उत्सवातील प्रकार आहेत. त्याची गाणी ही वरवर अर्थहीन वाटतात. परंतु तसे नाही. त्यामध्ये खोल अर्थ आहे. समाज, संस्कृती यांचे त्यामध्ये प्रतिबिंब पडलेले बघायला मिळते. नवरात्रामध्ये रोज भोंडला होतो. हस्तनक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. १०-१५ मुली एकत्र येऊन हातात हात धरून पाटाभोवती फेर धरतात. ”ऐलोमा पैलोमा गणेश देवा” ह्या गाण्याने ह्यांची सुरुवात होते. ”माझा भोंडला संपला किंवा करा हादग्याची बोळवण” या गाण्याने भोंडल्याची सांगता होते. अशी सर्व गाणी आजच्या पिढीला कळावीत आणि म्हणता यावीत यासाठीच हे पुस्तक! वऱ्हाडात जेव्हा भुलाबाईची पूजा बांधली जाते तेव्हा महाराष्ट्रात हादग्याची पूजा केली जाते. हादग्याची परंपरा कृषी परंपरेतून आली आहे तर भुलाबाईची सृजनशीलतेतून. हादगा व भुलाबाईची पारंपरिक गाणीही या पुस्तकात वाचायला मिळतील.


30.00 Add to cart