…तो म्हणाला, ‘‘बहुसंख्य मराठी लेखक ते ‘जसंच्या तसं’ उतरवण्यातच किंवा ते नुसतं रंगवून सांगण्यातच धन्यता मानताना दिसतात. अर्थात तो त्यांचा प्रश्न झाला, पण मग त्याला ‘फिक्शन’ म्हणावं का, असा प्रश्न मला पडतो. उदाहरण म्हणून याच कथा संग्रहातली ‘निळ्या दाताची दंतकथा’ ही कथा घेऊ यात. त्यात नाझीझमचा आणि त्या काळात झालेल्या हिंसाचाराचा वापर करायचा प्रयत्न केला आहे. त्यातली नाझीची कथाही मीच रचली आहे. ती खरी कोणाची कथा नाही. आणि ती आपल्या इकडच्या हिंसाचाराशी, मूलतत्त्ववादाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आता कितीतरी जण या ज्यूंच्या करुण कहाण्या वाचून रडले असतील. त्यांत मराठी लेखकही असतील. पण त्याचा असा वापर करू यात, असा विचार कितींनी केला असेल? माझं म्हणणं असं नाही की, मी लिहिलेलं सगळंच जमून आलेलं आहे. असं कधी असूच शकत नाही. कुठलाच माणूस परिपूर्ण नसतो, तसा तो असूही शकत नाही. पण त्याचा प्रवास त्या दिशेने सतत चालू असतो. मला कायम वाटतं, लेखकाने असा पठडीबाहेरचा विचार करावा, धडपडावं, मोडतोड करावी, जोडकाम करावं, सतत शोधत राहावं असं मला माझ्यापुरतं तरी वाटतं. आणि मी ते सतत शोधत असतो आणि राहीन. माझ्यासाठी ही तर सुरुवात आहे. आणि प्रभावांचं म्हणशील, तर त्याची मोठ्ठी यादी करावी लागेल.”

फिक्शन लिहिणाऱ्याला जे काही दिसलं, सापडलं आहे ते सांगण्यासाठी एक खोटा रचनाव्यूह किंवा संकेतव्यूह रचावा लागतो आणि त्यामार्फत सापडलेल्या गोष्टीकडे निर्देश करावा लागतो. याचा अर्थ वाचकाला त्या गोष्टीपर्यंत नेणं असा नव्हे, तर ती गोष्ट जिथे आहे, तिथे तुमचं तुम्ही जाऊ शकता हे वाचकाला सांगणं.

मी मनातल्या मनात विचार केला की, ‘फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा. खोटंनाटं सांगणं. तोही नेहमी मला सांगत असतो की, लेखकाला खोटं सांगता यायला हवं. मग मी त्याला विचारलं, ‘‘तू ते श्याम मनोहर फिक्शनच्या बाबतीत जे म्हणतात, ते नेहमी सांगत असतोस, ते काय?’’ तो लगेच म्हणाला, “श्याम मनोहर म्हणतात, ‘खोट्याची रचना करून खऱ्याकडे निर्देशन करणं हे फिक्शनचं काम आहे.’ व ते मला पटतं.”

Nila Dat Cover
निळ्या दाताची दंतकथा – मलपृष्ठ

फिक्शन लिहिणाऱ्याला बेमालूमपणे थापा मारता यायला हव्यात असं वाटतं. म्हणजे त्याला जे काही दिसलं, सापडलं आहे ते सांगण्यासाठी एक खोटा खोटा रचनाव्यूह किंवा संकेतव्यूह रचावा लागतो आणि त्यामार्फत सापडलेल्या गोष्टीकडे निर्देश करावा लागतो. याचा अर्थ वाचकाला त्या गोष्टीपर्यंत नेणं असा नव्हे, तर ती गोष्ट जिथे आहे, तिथे तुमचं तुम्ही जाऊ शकता हे वाचकाला सांगणं. आणि मग यासाठी मगाशी मी जी प्रोसेस करायला हवी असं म्हणत होतो ती करावी लागते. ढोबळपणे सांगायचं तर ही प्रोसेस असते कल्पना-वास्तव यांचं ब्लेंडिंग, सरमिसळ करण्याची. मी एकदा फेसबुकवर एका पोस्टवर कमेंट केली होती. ती इथेही सांगतो : समजा, माझ्याकडे पनीर आहे, कांदे-टोमॅटो आहेत, लसूण-आलं, खडा मसाला आहे, लोणी आहे. जर मी हे सगळं चिरून कच्चंच दिलं खायला तर?… तर ते बेचव लागेल किंवा चविष्ट लागणार नाही. खाता येणार नाही. पण एखादा शेफ, आलं-लसणाची पेस्ट करेल, त्यात तेलावर परतलेल्या कांदा-टोमॅटोची पेस्ट घालेल, मग त्यात लोणी घालून छानपैकी दाटसर ग्रेव्ही करेल. त्यात खडा मसाला, मीठ-मिरची घालेल, म्हणजे त्याची चव वाढेल, त्याला गंध येईल. आणि मग त्यात पनीरचे खरपूस तळलेले तुकडे टाकेल. शेवटी गार्निश करेल. मग ते पनीर खावंसं वाटेल. असंच काहीसं काम लेखकाला करायचं असतं असं मला वाटतं. पनीर खाणं-न खाणं हे आस्वादकाचं काम आहे, पण त्यांनी ते खावं यासाठी ते चविष्ट प्रकारे देणं हे शेफचं काम आहे. लेखकाने प्रक्रिया करून, एका विशिष्ट आकृतिबंधात, त्याला सापडलेलं सत्य वाचकाला दाखवणं, हे त्याचं काम आहे. मग कदाचित वाचक ते खाईल किंवा थुंकून फेकून देईल, कुणाला ते फारच तिखट लागेल, कुणाला मुळमुळीत वाटेल; हा वाचकाच्या रुचीचा प्रश्न असला, तरी अशी ग्रेव्ही करायचा प्रयत्न करणं हे लेखकाचं काम आहे. निदान माझं तरी आहे. याचा अर्थ सगळंच ‘चटकदार’ हवं असं माझं अजिबात म्हणणं नाही. जर आवश्यकता वाटली तर मी कच्चं, बेचवही खायला देईन. पण हा निर्णय मी सजगपणे, मुद्दाम घेतलेला असेल. लेखकाच्या प्रवृत्तीवर, प्रोसेसिंगवर आणि त्याला काय सांगायचं आहे यावर, कशी पाककृती करायची हे ठरवता येईल. पण मुळात प्रोसेसिंग हवंच, ज्याचा अभाव मला जाणवतो. त्यासाठी आवश्यक असणारी कल्पकता, परकायाप्रवेशाची हातोटी व कसबाचा जागरूकपणे केलेला विचार आदी गुण महत्त्वाचे वाटतात. कारण वास्तव हे वरवर जसं दिसतं तसं बरेचदा नसतं. त्यात खूप खाचाखोचा आणि कप्पेकपाऱ्या असतात.
सर्वसामान्य माणूस रोजमर्रात किंवा इतर गोष्टींतच इतका गुंतलेला असतो की, तो याकडे पाहू शकेलच असं नसतं. म्हणून कपाऱ्यांत, खाचाखोचांत घुसायचा प्रयत्न लेखक म्हणून मी केला पाहिजे, निदान त्यात डोकावलं तरी पाहिजे असं मला वाटतं. अर्थातच हे करताना हात-पाय सोलवटतात. एकाअर्थी ते कष्टाचं आणि वेळखाऊ काम असलं तरी मला ते मनापासून आवडतं.’’

मला तो काय सांगत होता हे समजलं होतं, पण उदाहरण दिल्यास पटकन समजेल असं वाटलं म्हणून मी त्याला म्हटलं, ‘‘एखादं उदाहरण देशील?’’ त्याने थोडा विचार केला व मग म्हणाला, ‘‘यातलीच ‘भूत.के.’ ही कथा घेऊ या.” याचा कच्चा माल म्हणून, मे २०१४ साली भारतात झालेलं सत्तांतर, त्यानंतर आलेली नवी राजवट या गोष्टी वापरल्या आहेत. त्यात ‘स्वच्छ भारत अभियान’चा वापर करून, आपल्या मनात रुजलेली जातव्यवस्था दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी कथेचा अर्धा भाग हा विज्ञानकथेतली फॅंटसी वाटावा असा, काळ गोळा करणाऱ्या लहान्या बुटक्यांचा – ‘भूतक्यां’चा घेतला आहे. त्यांची गोष्ट सांगून मग मी भूतलीचे केरवाले – अर्थात ‘भूत.के.’ म्हणजे कचरा गोळा करणारे कामगार यांबद्दल काही सांगू पाहतो. वाचकांनी त्या दोघांची तुलना करून काही गोष्टी समजून घ्यावात, असं मला वाटतं. कारण त्यात त्यांची संगती लावायचा प्रयत्न केला आहे. दोन्ही भूतक्यांचं महत्त्व आणि तरीसुद्धा त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन ही कथा अधोरेखित करते. पण ते सूचकपणे करते. वास्तवा-बरहुकूम मांडण्याबरोबरच कल्पितकथेनेही, असा सटलपणे आणि जरा अधिक अंतर्मुख करणारा विचार मांडता येऊ शकतो, असा माझा प्रयत्न त्या कथेत आहे. त्यामुळेच ती लेख किंवा बातमीपेक्षा वेगळी ठरते. नाहीतर फिक्शनलेखकही बातमीदाराप्रमाणेच गोष्ट सांगणार असतील, तर वाचकांनी पेपरच का वाचू नये? कथा वाचाव्यात तरी का? असा मला प्रश्न पडतो.’’

-प्रणव सखदेव

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०१९


युवा लेखक प्रणव सखदेव यांचं कथा-साहित्य

96 मेट्रोमॉल


प्रणव सखदेव


काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach



170.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा


प्रणव सखदेव


माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’


225.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

प्रणव सखदेव


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

Pranav Sakhadeo Photo
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

स्वतःचा कस लावण्याचं काम

हल्ली माझ्याकडे जेव्हा एखादी संहिता येते, तेव्हा काम सुरू करण्याआधी मी थोडा वेळ तिच्याकडे नुसता पाहत बसतो. कसं असेल हे नवं जग? काय काय निर्माण केलं असेल या जगात लेखकाने? असे कितीतरी प्रश्न मनात फेर धरतात. आणि अचानक मला जाणवतं की, संहिता उष्ण आहे, ती अजिबातच निर्जीव नाही, ती जिवंत आहे माणसासारखी ! ती परीकथेतल्या राक्षसासारखी आहे, ज्यात लेखकाने आपला जीव दडवून ठेवलेला आहे. त्यातले शब्द आपली वाट पाहत आहेत. त्यातले शब्द आपला माग काढत आपल्यापर्यंत आले आहेत किंवा आपण त्यांचा माग काढत त्यांच्यापर्यंत आलो आहोत..

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *