महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
आवडते लेखक विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीच्या या त्रिधारेची मी बरीच वर्षं वाट बघत होते. चेटूक कादंबरीची सुरुवात होते साधारण पन्नासच्या दशकातील काळात. राणी ही इंदोरसारख्या शहरातील एका सीकेपी कुटुंबातील तरुण मुलगी वसंत दिघेच्या प्रेमात पडते. वसंतही राणीसाठी वेडा होतो. राणीचं अवघं सतराचं वय. प्रेमाचा अर्थही न सुधरण्याचं वय. खरंतर नुसतंच आकर्षण. लग्न झाल्यावर स्त्रीपुरुष संबंधातील [...]