महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग

आवडते लेखक विश्राम गुप्ते यांच्या कादंबरीच्या या त्रिधारेची मी बरीच वर्षं वाट बघत होते. चेटूक कादंबरीची सुरुवात होते साधारण पन्नासच्या दशकातील काळात. राणी ही इंदोरसारख्या शहरातील एका सीकेपी कुटुंबातील तरुण मुलगी वसंत दिघेच्या प्रेमात पडते. वसंतही राणीसाठी वेडा होतो. राणीचं अवघं सतराचं वय. प्रेमाचा अर्थही न सुधरण्याचं वय. खरंतर नुसतंच आकर्षण. लग्न झाल्यावर स्त्रीपुरुष संबंधातील [...]

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

नवी वेबसाइट, नव्या दिशा…!

फॉन्ट साइज वाढवा 'रोहन प्रकाशन'ने आपली माहिती देणारी पहिली वेबसाइट उभारली ती २००७ साली. त्यानंतर २०१०मध्ये ती काळानुरूप अपग्रेड करून नव्या स्वरूपातील इ-कॉमर्स वेबसाइट सुरू केली. २०१७ साली रोहन प्रकाशनाने आपलं हाऊस मॅगझिन सुरू केलं - 'रोहन साहित्य मैफल'. हे मासिक लोकप्रिय झालं असून, या अंकाचा आस्वाद वाचक गेली चार वर्षं आवर्जून घेत आहेत.  गेल्या काही वर्षांत इ-बुक्स हे वाचनाचं नवं माध्यम लोकांपुढे [...]

सोप्या भाषेत मेंदूचं मन उलगडणारं पुस्तक

फॉन्ट साइज वाढवा मेंदू हा माझा विज्ञान-साहित्याएवढाच आवडता विषय. ह्या विषयात माझ्याप्रमाणे आवडीने लेखन करणारा लेखक म्हणजे सुबोध जावडेकर. त्यामुळेच आमच्या मैत्रीचा धागा जुळला, घट्ट झाला. त्यांच्या दोन पुस्तकांपैकी एका पुस्तकावर मी लिहिणार आहे; ते म्हणजे ‘मेंदूच्या मनात’. त्याचं दुसरं पुस्तक म्हणजे ‘पुढच्या हाका’. सुबोध विज्ञान-साहित्याला इतर साहित्यातून वेगळं करत नाहीत. ते बरोबरच आहे. त्यामुळे [...]

‘क्याप’ : गुणाढ्याचा पेच आणि आधुनिकोत्तर लेखकाची लांब उडी

फॉन्ट साइज वाढवा २३ एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने तरुण ग्रंथप्रेमी, विचक्षण वाचक अभिषेक धनगर यांनी ‘माझी निवड’ स्तंभासाठी लिहिलेला हा मर्मग्राही लेख… ‘कुठल्याही कथेची तीन मुख्य तत्त्वं असतात. पहिलं तत्त्व म्हणजे घटना, दुसरं कथांतर्गत पात्रांची चरित्रं आणि त्यांच्या भूमिका आणि तिसरं तत्त्व म्हणजे अवकाश-काळ. यातील पहिल्या दोन [...]

स्वप्नाळू प्रेमाभोवती गुंफलेलं समाजचित्रण

आघाडीचे लिहिते लेखक असलेल्या आणि बरंच लेखन केलेल्या लेखकाच्या हातून निर्माण झालेली, खिळवून ठेवणारी ही कादंबरी ‘चेटूक’! उत्कंठावर्धक आहे. पुढे काय होईल असा विचार सतत मनात राहतो, त्यामुळे खाली ठेववत नाही. वाचून झाल्यावर आपल्या मनात त्यावर काही विचार उमटणं, प्रश्न निर्माण होणं हे नैसर्गिक आहे. ही कादंबरी, नुकतंच भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे अशा काळातली आहे. [...]

नाद-लय-ध्वनीची जमलेली शब्दमैफल

‘अनुनाद’ हे अरुण खोपकरांचे ‘मॅजेस्टिक’ प्रकाशनाने प्रकाशित केलेले नवे पुस्तक म्हणजे त्यांनीच या पुस्तकातील एका लेखात म्हटल्यांप्रमाणे ‘रूप पाहता लोचनी’ या स्वरूपाचे देखणे ग्रंथरूप आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक विकास गायतोंडे यांनी हे रूप सजवलं आहे. बहुविध कलांवर मनस्वी प्रेम करत मुलगामी लेखन करणाऱ्या खोपकरांचे हे नवे पुस्तक त्यांच्या आधीच्या पुस्तकाच्या मालिकेतला कळसाध्याय आहे.त्यांचे ‘गुरुदत्त : तीन [...]

‘भारत : समाज आणि राजकारण’ – प्रास्ताविक : गोविंद तळवळकर

आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून साकार झालेलं ‘भारत : समाज आणि राजकारण' हे पुस्तक आम्ही नुकतंच प्रसिद्ध केलं आहे. सुप्रसिद्ध अभ्यासक प्रा. जयंत लेले यांनी घेतलेल्या अनेक मुलाखतींचं रचनाबद्ध संकलित व संपादित स्वरूप म्हणजेच हा ग्रंथ होय. या पुस्तकाला दिवंगत विचारवंत गोविंद तळवळकर यांचं प्रास्ताविक लाभलं [...]

‘झुरांगलिंग’ कादंबरीतील निवडक भाग

मोबाइल इंटरनेटमुळे गूगल सर्च असं म्हणताच वाट्टेल ती माहिती तुमच्या डोळ्यापुढे चमकत राहते. झुरांगनं इंटरनेटवरनं लदाखची माहिती मिळवायला सुरुवात केली. ती बरीचशी ‘तिथं कसं जा? काय पाहा? काय त्रास होतो? काय काळजी घ्या?’ अशी पर्यटनयुक्त होती. ‘कसं जा?’ यामध्ये त्याला इंट्रेस्ट होता. तो उत्साहाने ती माहिती वाचायला लागला. जायचे पर्याय असे होते, संपूर्ण आरामदायक पण [...]

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / दीपा देशमुख

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]
1 2