पॉन्झी स्कीम्स

कुख्यात चार्ल्स पॉन्झीची कुकर्म कथा


अतुल कहाते


गुंतवणुकीवर न भूतो न भविष्यती असा परतावा देणाऱ्या पॉन्झी स्कीम्स आजही अनेकांना भुरळ घालतात आणि त्यांना भुलून लोकही फसतात ! या स्कीम्सची सुरुवात कशी झाली ? ही ‘ भन्नाट ‘ आयडिया कुणाची ? लोक तिला भुलले तरी कसे आणि का ? यांसारख्या अनेक प्रश्नांचा शोध घेत गुन्हेगारी मानसिकतेचा वेध घेणारी माहितीरूप गोष्ट .. पॉन्झी स्कीम्स !


 


180.00 Add to cart

डार्क नेट

इंटरनेटवरची गुंग करून सोडणारी तस्करी


अतुल कहाते


सर्चिंग किंवा सर्फिंगसाठी आपण जे इंटरनेट वापरतो , त्यापलीकडे प्रचंड मोठं आणि गूढगहिरं इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे . तिथे अनेक ‘ काळ्या ‘ , ‘ अवैध ‘ घडामोडी घडत असतात . आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा इंटरनेटच्या या भीतिदायक ‘ सीक्रेट ‘ जगाची ‘ डार्क ‘ कहाणी … डार्क नेट !



180.00 Add to cart

थेरॅनॉस

सिलिकॉन व्हॅली’तली साहसी फसवणूक


अतुल कहाते


स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !



 


180.00 Add to cart

वामनाचे चौथे पाउल

विज्ञान कथांच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला वेध


सुबोध जावडेकर


वामनाचे चौथे पाऊल

तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.

नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?

या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.

पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.

या आहेत माणसाच्या कथा.

फार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.


 



250.00 Add to cart

ना. मा. निराळे

आणि इतर सहा कथा


सतीश तांबे


ना. मा. निराळे तुम्हाला सांगतो भाऊ , आपल्या आस्तिक प्रतिमेचा फायदा घेऊन आपण त्या गावचेच नाही , असा आव आणत नामानिराळे राहत अनेक साळसूद आपल्या आसपासच्या दुबळ्या मनांच्या लोकांच्या आयुष्याची फरफट करत असतात….

प्रत्येक आत्महत्या हा एक डबल मर्डर असतो . म्हणजे असं , की एक म्हणजे तो मरणारा स्वतःचा मर्डर करत असतो , आणि दुसरे मर्डर करणारे असतात असे कुणीतरी नामानिराळे ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावा असा कोणताही नसतो . आता माझंच बघा ना , अविनाशच्या आत्महत्येसाठी मला कुणीही पकडू शकत नाही . कारण माझ्या मनात जे मतलबाचे व्यवहार चालतात ना , ते मी एक तर सहसा शब्दबद्धच करत नाही , मग ते कुणाला कसे कळणार?

माझं तर असं म्हणणं आहे की, प्रत्येक उद्ध्वस्त आयुष्याच्या मागील काळोखात नामानिराळ्यांची एक कुमक उभी असते . त्यातील काही नामानिराळे हे कळून सवरून असतील, तर काही नकळत अजाणता असतील. सगळे वरवर संभावित साले… करून सवरून नामानिराळे … ना.मा. निराळे … नालायक मादरचोद निराळे!

250.00 Add to cart

ब्रह्मेघोटाळा

अर्थात ब्रह्मे घराण्यातल्या दोन पिढ्यांची कहाणी


ज्युनियर ब्रम्हे


ब्रह्मेघोटाळा

या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे यात भरपूर फालतूपणा केलेला असतो . शब्दांचे खेळ , गद्य – पद्य विडंबनं , उगाचच केलेल्या कोट्या असतात . काहीवेळा तर कोट्या ‘ करायच्या म्हणून ओढूनताणून केलेल्या असतात . हे सारं करत असताना लेखक आपल्याकडे पाहून डोळा मारून जणू आपल्याला म्हणत असतो , ” बघा मी कसा फालतूपणा केलाय . हा खरा बावळटपणा नसतो . हे लक्षात येण्यासाठी वाचकही तसाच ‘ चतुर ‘ हवा . तसा नसेल तर त्याची चिडचिड होईल . ‘ हा काय आचरटपणा आहे ? ‘ असं तो डोक्यावरचे केस उपटत विचारील अशा विनोदी लेखनाच्या वाट्याला हा वाचक आला तर लेखकानं काशीत जाऊन प्रायश्चित्त घ्यावं.

तेव्हा एक सावधगिरीची सूचना अर्थात वैधानिक इशारा : तुम्ही दुसऱ्या प्रकारातले म्हणजे ‘ असली ‘ वाचक असाल तर आणि तरच या पुस्तकाच्या वाट्याला जा . पहिल्या प्रकारचे वाचक असाल तर त्यांना टोकाचे आत्मक्लेश सोसावे लागतील त्या क्लेशांतून आनुषंगिक मेंदूविषयक आजार उद्भवले तर त्यांना लेखक – प्रकाशक – मुद्रक जबाबदार असणार नाहीत.

मुकुंद टाकसाळे ( प्रस्तावनेतून )


290.00 Add to cart

मुक्काम पोस्ट अमेरिका

ओळख अमेरिकेच्या अंतरंगाची…


डॉ. मोहन द्रविड


कशी आहे बुवा ही अमेरिका?….
कोणत्याही देशात थोड्या दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घ वास्तव्यासाठी… त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतला, तेथील शिस्त, रीतिरिवाज, पद्धती, तेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पण त्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतो. त्या दृष्टीने डॉ. मोहन द्रविड यांनी त्यांच्या ४०-४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशय सहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे.
या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलं, काय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेची सर्वांगीण ओळख करून दिली आहे. अमेरिकेचा संक्षिप्त इतिहास, तिथलं राजकारण, दैनंदिन जीवन, समाज जीवन, लोकांची कामाची पद्धत, कुटुंबव्यवस्था, सणवार सुट्ट्या, भाषा अशा अनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे.
आज भारतातून शिक्षणासाठी, नोकरी-व्यवसायासाठी, पर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांना अथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे . अशा सर्वांसाठी एक सच्चा सोबती…
मुक्काम पोस्ट अमेरिका !

 

275.00 Add to cart

गोठण्यातल्या गोष्टी

हृषिकेश गुप्ते


गोष्टी सांगण्यापूर्वी…

‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.

म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’



 

360.00 Add to cart

अंक निनाद २०२१

अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.


‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.

‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.

250.00 Add to cart

बहर मनाचा

प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कृतिशील विचार


डॉ. विजया फडणीस


आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण खचून जातो …क्वचित प्रसंगी कोलमडून जातो ..रोजच्या आयुष्यातल्या आणि अकल्पितपणे उद्भवणाऱ्या अशा अनेक प्रसंगांना , समस्यांना उमेदीने आणि मनोबळाने कसं सामोरं जावं याचं शास्त्रीय मार्गदर्शन डॉ . विजया फडणीस पुस्तकात समर्पक उदाहरणांद्वारे करतात .

 

  • आशावाद कसा जोपार ? मानसिक ताण कसे हाताळावेत ? आपल्यातील सुप्त शक्ती कशी ओळखावी ?
  •  आपल्या वागण्याचं विश्लेषण कसं करावं ?
  • वाढत्या वयामध्ये व्याधींमुळे किंवा एकटेपणाच्या भावनेमुळे येणाऱ्या नैराश्याच्या भावनेला कसं सामोरं जावं …
अशा व इतर अनेक समस्यांवर त्या आपला अभ्यास, अनुभव व संवादी समुपदेशनाच्या कौशल्यातून वाट दाखवतात. सकारात्मकतेचं खत – पाणी देऊन आयुष्याला आनंदाचं झाड बनवणारं पुस्तक…
बहर मनाचा !

250.00 Add to cart

इन द लॉंग रन

पाळण्याच्या नियोजनबद्ध व्यायामासाठी शास्त्रीय मार्गदर्शन


डॉ. लिली जोशी


दिवाळीत फराळाचं खाऊन वाढलेलं वजन उतरवण्यासाठी,
की प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी
की आपला बेस्ट फ्रेन्ड सांगतोय म्हणून केवळ….नक्की कशासाठी रनिंग सुरु करता आहात तुम्ही? याचं  उत्तर जर, “मला आता पुढच्या आयुष्यात कायमच फिट राहायचं  आहे आणि रनिंग माझ्या जीवनशैलीचा भाग बनवायचा आहे” असं असेल तर…  मिलाओ हाथ!
मग हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उत्तम दिशा दाखवेल. काय आहे पुस्तकात?१. आजच्या काळातला रनिंग फिव्हर
२. रनिंगसाठी लागणारी साधन-सामग्री, आहार आणि गॅजेट्स
३. रनिंग दरम्यान शरीर रचनेत घडणारे बदल
४. रनिंगला सुरुवात कशी करावी? वॉर्म-अप, स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते?
५. रेस किंवा मॅरेथॉनसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी
६. दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचं  मार्गदर्शन
७. अनुभवी रनर्सचे जिवंत अनुभव आणि इतर बरच काही..रनिंगच्या विश्वात A  पासून Z पर्यंत तुमची बाराखडी लखलखित करणारं आणि दस्तूरखुद्द एका नामांकित डॉक्टरने लिहिलेलं इन द लॉन्ग रन उपयोगी पडणारं  पुस्तक…. इन द लॉन्ग रन!


250.00 Add to cart

सायड

 


रवींद्र पांढरे


प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…
दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.
शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…
 प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड !

200.00 Add to cart

‘करोना’ग्रस्त लॉकडाउनचे पहिले आठ दिवस

  • लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य
  • पक्षी-चंक्षूकरोनागस्ती

मिलिंद चंपानेरकर

नीलिमा रवि


दोन भिन्न आकृतिबंधांतील दीर्घकथा

करोना मुळे प्रथम ‘लॉकडाउन’ घोषित केला गेल्यावर पहिल्या आठ दिवसांत शहरातील सामान्य नागरिकांच्या मनाची झालेली घालमेल ते सैरभैर होऊन गावाकडे निघालेल्या विस्थापित श्रमिकांची झालेली परवड अशा विविध घडामोडींची दोन भिन्न आकृतिबंधामधून नोंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन दीर्घकथा .अचानक निर्माण झालेल्या असामान्य स्थितीमुळे परस्परांतील विश्वास वाढतो की , संदेह बाजूला ठेवण्यास माणसं सहजप्रवृत्त होतात, त्याचा वेध घेऊ पाहणारी संदेहकथा …  लॉकडाउन’मधील हत्येचं रहस्य.

पक्ष्यांचे थवे काही एक सामंजस्याने मार्गक्रमण करत असतात. ” त्या आठ दिवसांत जनजीवनात अचानक संभवलेल्या बदलांनी तेही सैरभैर झाले. स्थलांतरित, नागरी, जंगली, निवासी अशा विविध पक्ष्यांनी मिळून लोकशाही पद्धतीने समिती गठित केली आणि त्या बदलांचा धांडोळा’ घेतला ! पक्षीगणाच्या नजरेतून दिसून आलेली स्थिती चितारणारी विहंगावलोकनी रूपककथा …

पक्षी – चंक्षूकरोनागस्ती तून करोनागस्ती .


300.00 Add to cart

फ्लर्टिंग विथ स्टॉक्स

शेअर बाजार समजून घेताना


डॉ. अनिल लांबा
अनुवाद: विरेंद्र ताटके


चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…

१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?

२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?

३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?

४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?

५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?

६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?

याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!



395.00 Add to cart

बॉर्न टु विन

जिंकण्यासाठी जन्म आपुला


झिग झिगलर, टॉम झिगलर
अनुवाद: डॉ. अरुण मांडे


व्यवसायात यश मिळवायचं आहे?
कार्यक्षेत्रात अग्रस्थान पटकवायचं आहे?
कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख हवं आहे?
मग असं समजा की, या साऱ्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळालीच… अर्थात बॉर्न टु विन!
लाईफ चेंजर अशी ख्याती असणारे प्रेरक वक्ते झिग झिगलर यांनी या पुस्तकात यशाचा जणू मूलमंत्रच दिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात लपलेले अनेक गुण हे पुस्तक दाखवून देतं.
जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या, तक्ते, टेबल्स यांचा आधारही ते देतात.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक…बॉर्न टु विन !


Zig Ziglar’s Born to Win is a key to succeed in life. This book talks about the four decades of life-changing tools and practices into one inspiring, easy-to-use format for people who want to grow and improve the whole spectrum of their lives now!It also says that “You were born to win, but to be the winner you were born to be you must plan to win and prepare to win. Only then can you legitimately expect to win.”Born to Win guides the readers through this plan-prepare-expect strategy. You will learn that when you have the hope that things can change, and a plan to make that change possible, you can take action.



225.00 Add to cart

विस्तारवादी चीन व भारत

चढती कमान व वाढते तणाव


[taxonomy_list name=”product_author” include=”487″]


कॅन ड्रॅगन अँड एलिफन्ट डान्स टुगेदर?
भारत व चीन यांच्या दरम्यानचे संबंध गेली वीसेक वर्षं तसे सलोख्याचे होते. कारण याच काळात देवाण-घेवाण वाढली, व्यापारवृद्धी झाली, सीमावादाबाबत वाटाघाटी चालू राहिल्या. शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या परस्परांच्या देशाला भेटी झाल्या. या पार्श्वभूमीवर चीनचे स्टेट कौन्सेलर व परराष्ट्र मंत्री वांग एका पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, चिनी ड्रॅगन व भारतीय गजराज यांनी एकमेकांबरोबर भांडायला नको, तर नृत्य करायला हवं…
आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते आहे.

डिसेंबर १९७८मध्ये डेंग झाव पिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या पारंपरिक वर्ग संघर्षाच्या वैचारिक बैठकीपासून अलग करून आर्थिक विकासाच्या विचारांकडे वळवलं… जगासाठी अधिक खुलं धोरण अवलंबत चीनने कृषी, उद्योग, लष्कर, विज्ञान व तंत्रज्ञान या चार क्षेत्रांच्या आधुनिकीकरणास प्राधान्य दिलं. विजय नाईक यांच्या पुस्तकात चीनच्या या आर्थिक सुधारणांच्या योजनांची माहिती असून,… चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यवस्था कसा बनला, याची कारणमीमांसा व ऊहापोह केला आहे….
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय?
अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन.
गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी
भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८



325.00 Add to cart
1 9 10 11 39