250.00

ना. मा. निराळे

आणि इतर सहा कथा


मराठीतील महत्त्वाचे 'लिहिते लेखक' असलेल्या सतीश तांबे यांची कथालेखक व संपादक अशी वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन-मनन यांची बांधेसूद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना ' नव (नव) कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा' असं म्हटलं आहे. तांबे यांनी बीएस्सी केल्यानंतर एमए केलं. एमएला ते मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली. नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं. त्यांची ' साप्ताहिक दिनांक'मधील 'मोकळीक' , तसेच 'आपलं महानगर' या सायंदैनिकातील 'हळक्षज्ञ' आणि 'लगोरी' ही सदरं विशेष गाजली. कथांसोबतच त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे. तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. 'आजचा चार्वाक' ( १९८९ ते १९९८) हा दिवाळी अंक आणि ‘अबब! हत्ती' (१९९१ ते १९९६) हे लहान मुलांचं मासिक यांच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले असून इतर महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

ना. मा. निराळे तुम्हाला सांगतो भाऊ , आपल्या आस्तिक प्रतिमेचा फायदा घेऊन आपण त्या गावचेच नाही , असा आव आणत नामानिराळे राहत अनेक साळसूद आपल्या आसपासच्या दुबळ्या मनांच्या लोकांच्या आयुष्याची फरफट करत असतात….

प्रत्येक आत्महत्या हा एक डबल मर्डर असतो . म्हणजे असं , की एक म्हणजे तो मरणारा स्वतःचा मर्डर करत असतो , आणि दुसरे मर्डर करणारे असतात असे कुणीतरी नामानिराळे ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावा असा कोणताही नसतो . आता माझंच बघा ना , अविनाशच्या आत्महत्येसाठी मला कुणीही पकडू शकत नाही . कारण माझ्या मनात जे मतलबाचे व्यवहार चालतात ना , ते मी एक तर सहसा शब्दबद्धच करत नाही , मग ते कुणाला कसे कळणार?

माझं तर असं म्हणणं आहे की, प्रत्येक उद्ध्वस्त आयुष्याच्या मागील काळोखात नामानिराळ्यांची एक कुमक उभी असते . त्यातील काही नामानिराळे हे कळून सवरून असतील, तर काही नकळत अजाणता असतील. सगळे वरवर संभावित साले… करून सवरून नामानिराळे … ना.मा. निराळे … नालायक मादरचोद निराळे!

978-81-952537-0-8 paper Back 198 , ,

Reading Time: 2 Minutes (181 words)

509 978-81-952537-0-8 Na. Ma Nirale ना. मा. निराळे Satish Tambe सतीश तांबे ना . मा . निराळे तुम्हाला सांगतो भाऊ , आपल्या आस्तिक प्रतिमेचा फायदा घेऊन आपण त्या गावचेच नाही , असा आव आणत नामानिराळे राहत अनेक साळसूद आपल्या आसपासच्या दुबळ्या मनांच्या लोकांच्या आयुष्याची फरफट करत असतात …. प्रत्येक आत्महत्या हा एक डबल मर्डर असतो . म्हणजे असं , की एक म्हणजे तो मरणारा स्वतःचा मर्डर करत असतो , आणि दुसरे मर्डर करणारे असतात असे कुणीतरी नामानिराळे ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावा असा कोणताही नसतो . आता माझंच बघा ना , अविनाशच्या आत्महत्येसाठी मला कुणीही पकडू शकत नाही . कारण माझ्या मनात जे मतलबाचे व्यवहार चालतात ना , ते मी एक तर सहसा शब्दबद्धच करत नाही , मग ते कुणाला कसे कळणार ? माझं तर असं म्हणणं आहे की , प्रत्येक उद्ध्वस्त आयुष्याच्या मागील काळोखात नामानिराळ्यांची एक कुमक उभी असते . त्यातील काही नामानिराळे हे कळून सवरून असतील , तर काही नकळत अजाणता असतील . सगळे वरवर संभावित साले … करून सवरून नामानिराळे … ना.मा. निराळे … नालायक मादरचोद निराळे ! Papar Back Book Rohan Prakashan Marathi १९८ कथासंग्रह २५०

 

Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.