सतीश तांबे

मराठीतील महत्त्वाचे 'लिहिते लेखक' असलेल्या सतीश तांबे यांची कथालेखक व संपादक अशी वाचकांना ओळख आहे. वास्तव व कल्पना यांची सरमिसळ, सूक्ष्म विचार आणि चिंतन-मनन यांची बांधेसूद रचना म्हणजे त्यांच्या कथा असतात. म्हणूनच ज्येष्ठ समीक्षक म.द. हातकणंगलेकर यांनी तांबे यांच्या कथांना ' नव (नव) कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा' असं म्हटलं आहे.
तांबे यांनी बीएस्सी केल्यानंतर एमए केलं. एमएला ते मराठी आणि सौंदर्यशास्त्र या विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्यांच्या लेखनाची सुरुवात कवितांपासून झाली. नंतर त्यांनी वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन व सदरलेखन केलं. त्यांची ' साप्ताहिक दिनांक'मधील 'मोकळीक' , तसेच 'आपलं महानगर' या सायंदैनिकातील 'हळक्षज्ञ' आणि 'लगोरी' ही सदरं विशेष गाजली. कथांसोबतच त्यांनी एकांकिका लेखन केलं आहे. तसेच विचक्षण संपादक म्हणूनही काम केलं आहे. 'आजचा चार्वाक' ( १९८९ ते १९९८) हा दिवाळी अंक आणि ‘अबब! हत्ती' (१९९१ ते १९९६) हे लहान मुलांचं मासिक यांच्या संपादनात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या कथासंग्रहांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले असून इतर महत्त्वाचे पुरस्कारही मिळालेले आहेत.

लेखकाची पुस्तकं

ना. मा. निराळे

आणि इतर सहा कथा


सतीश तांबे


ना. मा. निराळे तुम्हाला सांगतो भाऊ , आपल्या आस्तिक प्रतिमेचा फायदा घेऊन आपण त्या गावचेच नाही , असा आव आणत नामानिराळे राहत अनेक साळसूद आपल्या आसपासच्या दुबळ्या मनांच्या लोकांच्या आयुष्याची फरफट करत असतात….

प्रत्येक आत्महत्या हा एक डबल मर्डर असतो . म्हणजे असं , की एक म्हणजे तो मरणारा स्वतःचा मर्डर करत असतो , आणि दुसरे मर्डर करणारे असतात असे कुणीतरी नामानिराळे ज्यांच्या विरोधात सज्जड पुरावा असा कोणताही नसतो . आता माझंच बघा ना , अविनाशच्या आत्महत्येसाठी मला कुणीही पकडू शकत नाही . कारण माझ्या मनात जे मतलबाचे व्यवहार चालतात ना , ते मी एक तर सहसा शब्दबद्धच करत नाही , मग ते कुणाला कसे कळणार?

माझं तर असं म्हणणं आहे की, प्रत्येक उद्ध्वस्त आयुष्याच्या मागील काळोखात नामानिराळ्यांची एक कुमक उभी असते . त्यातील काही नामानिराळे हे कळून सवरून असतील, तर काही नकळत अजाणता असतील. सगळे वरवर संभावित साले… करून सवरून नामानिराळे … ना.मा. निराळे … नालायक मादरचोद निराळे!

250.00 Add to cart

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट


सतीश तांबे


‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो.

या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच



250.00 Add to cart