अतुल कहाते यांनी एमबीए केलं असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात ‘सिंटेल’, ‘अमेरिकन एक्स्प्रेस’, ‘डॉयचे बँक’, ‘लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक’, ‘ओरॅकल’ अशा नामांकित कंपन्यांमध्ये सतराहून जास्त वर्षांचा अनुभव आहे.
वयाच्या बाराव्या वर्षापासूनच त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये विविध सदरं लिहायला सुरुवात केली. आजपर्यंत त्यांचे चार हजारच्या वर लेख व सदरं प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र व मासिकांमधून प्रकाशित झाली आहेत. दूरदर्शन व इतर मराठी टीव्ही चॅनेल्सवर अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी विशेषज्ञ म्हणून सहभाग घेतला आहे. आयआयटी, सिंबायोसिस, फर्ग्युसन, इंदिरा, गरवारे, एमआयटी इ. अनेक संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून त्यांनी काम केलं आहे. ‘इंद्रधनू’ - ‘म.टा.’, ‘कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंदिरा एक्सलन्स अॅदवॉर्ड’ व म.सा.प.चा ‘ग्रंथकार पुरस्कार’ असे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !
Papar Back
Book
Rohan Prakashan
Marathi
117
माहितीपर
१८०
Reviews
There are no reviews yet.
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
रवींद्र पांढरे यांचा जन्म खानदेशातील पहूर ह्या गावी मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला. माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत असले, तरी गाव, गावचे लोक, त्यांची बोली, गावाची शेती, शिवार यांच्याशी जन्मतःच जुळलेली नाळ कधी तुटली नाही. त्यामुळे गाव आणि गावाचं शिवार हे लेखनाचे केंद्र , गावाची बोली हे साहित्याचं लेणं.
• प्रकाशित साहित्य :
लव्हाळ्याचे तुरे ( कवितासंग्रह )
मातीतली माणसं ( कथासंग्रह )
अवघाचि संसार ( कादंबरी )
गाण्यात झुलै रान ( किशोर कविता )
कथोकळी ( ललित गद्य )
पोटमारा ( कादंबरी )
प्रकाशनाच्या वाटेवर : पोरकी माणसं ( कथासंग्रह )
• पुरस्कार : →
मातीतली माणसं ह्या कथासंग्रहास दोन पुरस्कार
१ ) रोहमारे ट्रस्टचा उत्कृष्ट ग्रामीण साहित्यनिर्मिती पुरस्कार
२ ) राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ग.ल. ठोकळ कथा पुरस्कार
• सन्मान : 'अवघाचि संसार' कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट 'घुसमट'
कथोकळी ' पहूर ( पेठ ) , ता . जामनेर , जि . जळगाव
प्रत्येक बहराच्या नशिबी पानगळही लिहिलेली असते…
दोन शेतकऱ्यांनी मिळून एकमेकांच्या मदतीने आपल्या शेतांची मशागत करून घेणं म्हणजे ‘सायड’.
शांती आणि यशवंतानं शेतीसाठी केलेली सायड फक्त शिवारापुरती मर्यादित न राहता त्या दोघांच्या मनापर्यंत पोहोचते. शेतीत एकमेकांना मदत करताना, आधार देताना आणि एकमेकांची सुख-दुःखं ऐकून घेताना हि सायड त्या दोघांना प्रेम व जिव्हाळ्याच्या धाग्यांमध्ये गुंफते. त्यातून दोघांचं फक्त शेत-शिवारच फुलून येत नाही तर, दोघांचं शुष्क, कोरडं आयुष्यही नव्याने रुजतं,आणि अंकुरतं आणि बहरून येतं. पण…
प्रगल्भ आणि उत्स्फूर्त अशा सहजीवनाची अनेक पदरी, व्यामिश्र अनुभवांची -‘जामनेरी बोलीतली कादंबरी सायड !
प्रभावी आणि प्रेरक वक्ते म्हणून ख्यातनाम असणाऱ्या झिग झिगलर यांची मार्गदर्शक भाषणं जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी स्फूर्तीदायक ठरली आहेत. त्यांची तीस पुस्तकं आणि भाषणांच्या व्हिडीओजमुळे अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन, माजी राज्य सचिव कॉलिन पॉवेल, जनरल नॉर्मन श्वात्झकॉफ, रुडी जुलियानी, डॉ. नॉर्मन व्हिन्सेंट पील, पॉल हार्वे आणि आर्ट लिंकलेटर अशा दिग्गजांनी झिग झिगलर यांच्या भाषणांना हजेरी लावली आहे. वॉशिंग्टन पोस्ट, न्यू यॉर्क टाइम्स, डलास मॉर्निंग न्यूज अशा वृत्तपत्रांतून त्यांच्या यशोमंत्राचा गौरव झाला आहे. त्यांनी लिहिलेलं 'झिगलर्स एनकरेजिंग वर्ल्ड' हे सदर संपूर्ण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरलं. टाइम, फॉर्म्युन आणि एस्क्वॉयर मॅगझीन यांमध्येही त्यांचा सन्मान करणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. अरुण मांडे हे वैद्यकीय व्यवसायाबरोबरच भरपूर लेखनही करतात. आजवर त्यांचे विज्ञान कथासंग्रह व विज्ञान कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आरोग्यविषयक इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवादही त्यांनी केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे आरोग्यविषयक स्तंभलेखनही चालू असतं. त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार, चिपळोणकर पुरस्कार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विज्ञानकथांसाठी महाराष्ट्र मराठी साहित्य परिषद, पुणे यांच्या ‘ग्रंथकार’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
व्यवसायात यश मिळवायचं आहे?
कार्यक्षेत्रात अग्रस्थान पटकवायचं आहे?
कौटुंबिक आयुष्यात समाधान आणि सुख हवं आहे?
मग असं समजा की, या साऱ्याची गुरुकिल्ली तुम्हाला मिळालीच… अर्थात बॉर्न टु विन!
लाईफ चेंजर अशी ख्याती असणारे प्रेरक वक्ते झिग झिगलर यांनी या पुस्तकात यशाचा जणू मूलमंत्रच दिला आहे. आपल्या व्यक्तिमत्वात लपलेले अनेक गुण हे पुस्तक दाखवून देतं.
जिंकण्यासाठी वृत्ती कशी विकसित करावी? आणि वैयक्तिक विकासासाठी तिचा उपयोग कसा करावा? स्वत:च्या वर्तणुकीत बदल करून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध अधिक निरोगी कसे बनवावे? प्रभावी संवादाचं तंत्र अवगत करून प्रत्येकाला कौटुंबिक, व्यावसायिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या अधिक चांगल्या प्रकारे कशा निभावता येतील? या सर्वाचं मार्गदर्शन झिगलर अनेक उदाहरणं देत करतात. सोबत आकृत्या, तक्ते, टेबल्स यांचा आधारही ते देतात.
आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी वयाच्या कोणत्याही टप्प्यावर वाचलंच पाहिजे असं पुस्तक…बॉर्न टु विन !
Zig Ziglar’s Born to Win is a key to succeed in life. This book talks about the four decades of life-changing tools and practices into one inspiring, easy-to-use format for people who want to grow and improve the whole spectrum of their lives now!It also says that “You were born to win, but to be the winner you were born to be you must plan to win and prepare to win. Only then can you legitimately expect to win.”Born to Win guides the readers through this plan-prepare-expect strategy. You will learn that when you have the hope that things can change, and a plan to make that change possible, you can take action.
Mountains are the source of inspiration for those who brave the bone chilling temperature, endless snowfields, bottomless crevasses, thin layer of oxygen, steep rock walls and unpredictable weather, and make their way to the top of the world.
This journey to the top of the world is next to impossible without the support of Sherpas, sons and daughters of the great Himalayas.. true lifelines of high altitude mountaineering.
Sherpas pave the road in snowfields, bridge the gap on crevasses with ladders, cook the healthiest meals for mountaineers in possibly the harshest weather on the higher altitudes.
They are the rescuers, they are the guides, they are friends, they are the Sherpas!
They know Himalaya better than anyone else.
Nowadays, Sherpas have ventured into several other fields and are triumphing it like never before. Umesh Zirpe, the renowned mountaineer, who has spent significant time with Sherpas, has shed a light on the lives of such Sherpas who have carved their ways from extreme destitute to reaching remarkable heights of glories. Experience the interesting world of Mountain-Men Sherpa.
डॉ. अनिल लांबा हे विख्यात चार्टर्ड अकाउंटंट असून लेखक, कॉर्पोरेट ट्रेनर म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी वाणिज्य व कायदा या विषयात पदवी संपादन केली असून कर विषयात डॉक्टरेटही मिळवली आहे. ते गेली अनेक वर्षं जगभरात अर्थविषयक प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत असून भारत, अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि अति पूर्वेकडील देश येथील २००० पेक्षा अधिक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्या त्यांच्याकडून अर्थविषयिक सल्ला घेत असतात. पुण्यातील `लॅमकॉन स्कूल ऑफ मॅनेजमेंट'चे ते संस्थापक संचालक आहेत.
आपल्या पुस्तकांमधून त्यांनी अर्थविषयक बाबींची अत्यंत सोप्या व सहज शैलीत वाचकांना ओळख करून दिली आहे, तसंच या संकल्पनांमधलं मर्मही उलगडून दाखवलं आहे. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचकप्रिय झाली आहेत.
कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकौटंट' असणारे वीरेंद्र ताटके फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कॉरिट क्षेत्रात वरिष्ठ पदावर तसंच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. गेली पंधरा वर्षं ते विविध वृत्तपत्रांसाठी अर्थ आणि गुंतवणुकीविषयी सातत्याने लेखन करत आहेत. त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरून अर्थविषयक कार्यक्रमही सादर केले आहेत. त्याचप्रमाणे वित्त व्यवस्थापन, शेअरबाजार, म्युच्युअल फंड या विषयांवर पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध होत असतात. म्युच्युअल फंड या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून सध्या ते एका नामवंत एमबीए महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.
या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…
१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?
२. रेशो अॅनालिसिस म्हणजे काय?
३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?
४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?
५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?
६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?
याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!
मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते.
फायकस मोरेसी जातीच्या झाडांचं गूढ जंगल … आणि प्रगती , आधुनिकता व विकासाच्या नावाखाली वाढतच जाणारी माणसाची राक्षसी महत्वाकांक्षा यांच्या द्वंद्वाची ही कथा आहे . एका विकास प्रकल्पावर होणारे अकस्मात अपमृत्यू , आदिवासींचं मूळापासून हादरून जाणारं आयुष्य , बोलणारी झाडं , जमिनीच्या पोटात लपलेलं झाडांच्या मुळांचं जंजाळ , त्यातून परावर्तीत होणारे संदेश , जाडजूड पारंब्यांतून सतत कुणीतरी पाठलाग करत आहे , ही मन पोखरणारी जाणीव … आणि या झाडांशी संवाद साधू शकणारा एकमेव माणूस ‘साठे ‘ ! एक थरारक कादंबरी…
साठे फायकस !
विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
Reviews
There are no reviews yet.