विस्तारवादी चीन व भारत

325.00

चढती कमान व वाढते तणाव


विजय नाईक यांचा जन्म १ जुलै, १९४५ रोजी अहमदनगर येथे झाला असून १९६७ साला पासून त्यांचे दिल्लीत वास्तव्य आहे. सध्या ते ‘सकाळ पेपर्स’चे सल्लागार-संपादक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी ते ‘दै. गोमंतक’ व त्यानंतर ‘सकाळ’चे दिल्लीतील वार्ताहर व ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत होते. त्यांनी राजकीय व आंतरराष्ट्रीय घटनांचे वार्तांकन करण्यासाठी अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. भारतीय राजकारण, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय घडामोडी व शिष्टाई या विषयासंबंधी त्यांचं विशेष अध्ययन असून त्यावर त्याचं लिखाण सुरू असतं. १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धात ‘युद्धवार्ताहर’ म्हणून त्यांनी वार्तांकन केलं आहे. तसंच, त्यांनी ‘आयपीकेएफ’च्या श्रीलंकेतील तमिळ वाघांविरुद्ध लष्करी मोहिमेचे सात वेळा तेथे जाऊन वार्तांकन केलं आहे. ईशान्य भारतातील सशस्त्र बंडखोरी, पंजाबमधील ब्लू स्टार ऑपरेशन, कारगिलचे युद्ध आदी घडामोडींचं वार्तांकन त्यांनी केलं आहे. गेली चाळीस वर्षं ते संसदेच्या कामकाजाचं वार्तांकन करत आहेत. आफ्रिकेतील वसाहतवादाची सांगता झाल्यावर ‘सकाळ’च्या वतीनं दक्षिण आफ्रिकेला भेट देऊन तेथील घटनांचं वार्तांकन करणारे पहिले ‘मराठी पत्रकार’ म्हणून त्यांना ओळखलं जात. विजय नाईक हे ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'चे माजी सदस्य, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’चे माजी सरचिटणीस, लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकारविषयक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष, ‘इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पॉन्डन्ट्स’ या संस्थेचे विद्यमान निमंत्रक, दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटना व ‘कॉमनवेल्थ जर्नालिस्ट असोसिएशन’चे उपाध्यक्ष, दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेन्टर व हॅबिटॅट सेन्टरचे सदस्य अश्या विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. याशिवाय त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

कॅन ड्रॅगन अँड एलिफन्ट डान्स टुगेदर?
भारत व चीन यांच्या दरम्यानचे संबंध गेली वीसेक वर्षं तसे सलोख्याचे होते. कारण याच काळात देवाण-घेवाण वाढली, व्यापारवृद्धी झाली, सीमावादाबाबत वाटाघाटी चालू राहिल्या. शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या परस्परांच्या देशाला भेटी झाल्या. या पार्श्वभूमीवर चीनचे स्टेट कौन्सेलर व परराष्ट्र मंत्री वांग एका पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, चिनी ड्रॅगन व भारतीय गजराज यांनी एकमेकांबरोबर भांडायला नको, तर नृत्य करायला हवं…
आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते आहे.

डिसेंबर १९७८मध्ये डेंग झाव पिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या पारंपरिक वर्ग संघर्षाच्या वैचारिक बैठकीपासून अलग करून आर्थिक विकासाच्या विचारांकडे वळवलं… जगासाठी अधिक खुलं धोरण अवलंबत चीनने कृषी, उद्योग, लष्कर, विज्ञान व तंत्रज्ञान या चार क्षेत्रांच्या आधुनिकीकरणास प्राधान्य दिलं. विजय नाईक यांच्या पुस्तकात चीनच्या या आर्थिक सुधारणांच्या योजनांची माहिती असून,… चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यवस्था कसा बनला, याची कारणमीमांसा व ऊहापोह केला आहे….
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय?
अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन.
गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी
भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८



Add to wishlist
Share
Share
ISBN:978-93-89458-35-0
Binding Type:Paper Back
Pages :223

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.