Reading Time: 3 Minutes (280 words)
460 | 978-93-82591-44-3 | South Block Delhi | साऊथ ब्लॉक दिल्ली | शिष्टाईचे अंतरंग- परराष्ट्र व्यवहार आणि मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा वेध | Vijay Naik | विजय नाईक | देशा-देशांतील संबंध जोपासण्यासाठी, वाद मिटवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी, व्यापार-वृध्दीसाठी, जटिल प्रश्नांची उकल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘डिप्लोमसी’ला अर्थात शिष्टाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याला अनुसरून अनेक भारतीय राजदूत, अधिकारी, नेते आणि मंत्री आपलं कसब पणाला लावत असतात. मात्र, याबाबतचे तपशील गोपनीयतेच्या आवरणामुळे सामान्यजनांपर्यंत पोहोचत नाहीत. ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं राजधानी दिल्लीत गेली पंचेचाळीस वर्षं वास्तव्य आहे. अनेक अधिकृत परदेशी दौर्यामध्ये पत्रकार म्हणून केलेलं प्रतिनिधित्व व या वर्तुळातील वावर यांतून आलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अभ्यास या सर्वांतून त्यांनी साकार केलेल्या या पुस्तकाद्वारे ही कसर भरून निघत आहे. नाईक यांनी या पुस्तकात दिल्लीतील ‘चाणक्यपुरी’, ‘शांतिपथ’ येथील विविध देशांच्या वकिलाती, दूतावास यांबद्दल ‘क्लोज-अप’ साधणारी माहिती दिली असून पं. नेहरूंनी घातलेल्या परराष्ट्र धोरणाचा पाया, यशवंतराव चव्हाण यांचं योगदान, गुजराल सिध्दान्त यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेतला आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरीच्या नाना तऱ्हांची सविस्तर माहिती दिली असून या क्षेत्रात मराठी व्यक्तींनी केलेल्या भरीव कामगिरीचाही आढावा घेतला आहे. राजदूत, सचिव, राजकीय नेते व मंत्री आदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, भारत-अमेरिका, भारत-रशिया व इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधांवर अनुभवी नेते व राजदूत यांनी केलेलं भाष्य या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. तसंच या क्षेत्रातले काही गंभीर, तर काही हलके-फुलके मजेशीर प्रसंगही सांगितले आहेत. थोडक्यात सांगायचं तर, स्वातंत्र्योत्तर काळातील मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा विविधांगी मागोवा घेणारं मराठीतील किंबहुना हे पहिलंच पुस्तक – साउथ ब्लॉक, दिल्ली – वाचकांना एका वेगळया विश्वाचं अंतरंग उलगडून दाखवेल, हे निश्चित! |
Paperback | Book | Rohan Prakashan | Marathi | 360 | 18.5 | 12 | 2 | 430 |
The book is an elaborate account of how the External Affairs Ministry works.
The functioning of the South Block is eye-opening for the common reader |
Informative | माहितीपर | Political | राजकीय | 390 | South Block_RGB.jpg | South Block_BC.jpg |
Reviews
There are no reviews yet.