Dark Net | डार्क नेट | अदृश्य ‘ इंटरनेटवरची गुंग करून सोडणारी तस्करी | Atul Kahate | सर्चिंग किंवा सर्फिंगसाठी आपण जे इंटरनेट वापरतो , त्यापलीकडे प्रचंड मोठं आणि गूढगहिरं इंटरनेटचं जाळं पसरलेलं आहे . तिथे अनेक ‘ काळ्या ‘ , ‘ अवैध ‘ घडामोडी घडत असतात . आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा इंटरनेटच्या या भीतिदायक ‘ सीक्रेट ‘ जगाची ‘ डार्क ‘ कहाणी … डार्क नेट ! | Papar Back | Book | Rohan Prakashan | Marathi | 133 | माहितीपर | १८० |
शौर्यगाथा
युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्या वीरांच्या शौर्यगाथा
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार
या कथा आहेत वीर जवानांच्या…या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन’ कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत… त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत… प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्या वीरांच्या शौर्यगाथा !
Reviews
There are no reviews yet.