News1

‘रोहन’च्या निर्मितिमूल्याला विशेष दाद

एखाद्या चांगल्या कामाला मिळालेले पुरस्कार अनेक अर्थाने मोलाचे असतात. विशेषत: जेव्हा पुस्तकाला पुरस्कार मिळतो त्यात लेखकाची लेखनप्रक्रिया जशी महत्त्वाची असते, तशीच प्रकाशकाची निर्मितिप्रक्रियाही महत्त्वाची असते. संपादकापासून आर्टिस्टपर्यंत आणि मुद्रितशोधनापासून छपाई-बांधणीपर्यंत एक मोठी टीम पुस्तकाला रूप आणि आकार देत असते. म्हणूनच लेखकाला किंवा पुस्तकाला मिळणाऱ्या पुरस्कारांत या टीमचाही हातभार असतो, असं आम्ही मानतो.

२०२१ सालची सुरुवात रोहन प्रकाशनासाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ‘रोहन प्रकाशन’ला चार पुरस्कार जाहीर झाले. पुस्तकाचं नाव व साहित्यप्रकार पुढीलप्रमाणे : 

  • वा ! म्हणताना… (उत्कृष्ट निर्मिती – ललितेतर  / लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर)
  • वा ! म्हणताना… (मुखपृष्ठ, प्रौढ – ललितेतर   / चित्रकार : अन्वर हुसेन )
  • अंधाराचं गाव (मुखपृष्ठ, बाल / चित्रकार : राजेश भावसार)
  • बबडू बँकेत (उत्कृष्ट निर्मिती / लेखक : विजय तांबे)

या पुरस्कारांपाठोपाठ ‘रोहन’ला आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाला तो ‘तू माझी चुटकी आहेस’ या पुस्तकासाठी लेखक फारूक काझी यांना. ‘चंद्रपूर, सूर्यांश साहित्य संस्थे’तर्फे हा पुरस्कार दिला जातो. लहान मुलांचं भावविश्व उलगडणाऱ्या या पुस्तकाची ही यथोचित दखल आहे.


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *