दीड दमडी : अ-राजकीय


श्रीकांत बोजेवार


मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली
उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या
सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील
विसंगती हुडकून काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या
संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही.
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!


175.00 Add to cart

हरवलेले स्नेहबंध

नरेंद्र चपळगावकर


परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –
मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’!


200.00 Add to cart

ग्रीकपुराण

कथा – महाकाव्य – शोकात्मिका


सुप्रिया सह्स्त्रबुद्धे


ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे
अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण !


370.00 Add to cart

बातमीमागची बातमी

खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य

जयप्रकाश प्रधान

 


हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’



200.00 Add to cart

कालचक्र

सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विश्वावर केलेलं मर्मिक भाष्य


अरुण टिकेकर


गाढे अभ्यासक, संशोधक, संपादक-लेखक आणि ग्रंथप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांचे समाजमानसात घडत असलेल्या बदलांकडे, वृत्ती-प्रवृत्तींकडे किती बारीक लक्ष होते, याची साक्ष हा लेखसंग्रह वाचताना पटते.
सदरलेखनाच्या निमित्ताने केलेल्या स्फुटलेखांमधून डॉ. टिकेकर सामाजिक-राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य करतात. तसंच मर्मज्ञ रसिकतेने जुन्या मौलिक ग्रंथांची ओळख करून देतात. कधी साहित्य, क्रीडा आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील तत्कालीन घटना-प्रसंगांवर उपरोधिक शैलीत भाष्य करतात. एखाद्या ज्येष्ठ आणि अभ्यासू मित्राने सहज गप्पा माराव्यात, आपल्याला उमजलेलं काहीतरी सांगावं अशी या लेखांची ओघवती शैली आहे. हे लेख विचारप्रवृत्त करतात, क्षणाक्षणाला वेगाने फिरत राहणार्‍या ‘कालचक्रा’चं भान देतात!



200.00 Add to cart

कालान्तर

सामाजिक आणि सांस्कृतिक पडझडीचा आलेख


अरुण टिकेकर


गेल्या पन्नास-साठ वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. स्वातंत्र्याच्या कालखंडात महाराष्ट्राने काय गमावले, काय कमावले याचा आलेख काढणारा. त्यात कमावण्याच्या बाजूला थोडेच आणि गमावण्याच्या बाजूला भरपूर असल्याचेच आढळून आले. समाजबदल तर होत होता. तो केवळ बाह्यस्वरूपी होत आहे, का केवळ तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत, की समाजमन वैज्ञानिक विचारांची कास धरून विवेकवादी होत आहे, धर्माचे अवडंबर कमी होत आहे की वाढत आहे, असे प्रश्नही मनात येऊ लागले…
प्रश्नांची उत्तरे शोधू गेल्यास ध्यानात येते की, ज्या प्रकारची पडझड झाली आहे ती स्वागतार्ह बदलापेक्षा कितीतरी अधिक आहे…
या कालखंडात आपण काय मिळवले आणि काय गमावले याची चर्चा तर सुरुवातीला केली पाहिजे. शिक्षणापासून ते वेगवेगळ्या व्यवसायापर्यंत, समाजकारणापासून ते राजकारणापर्यंत, व्यक्तिगत जीवनापासून ते सार्वजनिक जीवनापर्यंत विविध क्षेत्रांतील पडझडीची चर्चा करणे एवढाच या लेखसंग्रहाचा मर्यादित हेतू!


200.00 Add to cart

ते आणि मी


शकुंतला पुंडे


ते’ आणि मी हे शकुंतला पुंडे ह्यांचं एक अनोखा अविष्कार असणारं आगळंवेगळं ललित पुस्तक. या पुस्तकातल्या ‘ते’शी लेखिकेचं एक भावनिक नातं तिच्या नकळत निर्माण होत गेलेलं आहे. ते नातं इतकं उत्कट, मधुर अन् जिवाभावाचं झालेलं आहे की, कोकणातला मुक्त, घनदाट, विस्तीर्ण निसर्ग असो वा शहरातल्या घराच्या गॅलरीतला बंदिस्त मंच किंवा गॅलरीबाहेरचा ‘हिरवा रंगमंच’ असो, हे नातं जणू तिच्या जगण्याचाच एक धागा होऊन जातं. ‘ते’ आणि लेखिका यांचं जगणं एकमेकांत गुंतलेलं, एकमेकांशी बांधलेलं, जणू सलग घट्ट वीण असलेल्या रेशमी वस्त्रासारखंच कसं होऊन जातं याचं एक मनोज्ञ दर्शन या पुस्तकात सर्वत्र, सतत घडत राहतं.
आपल्या बालपणापासून आजपर्यंत ‘ते’शी अलगद जुळत गेलेले भावबंध लेखिकेने सरळसाध्या तरीही वेधक अशा शैलीत मांडलेले आहेत. त्यामुळे वाचकही स्वत:च्या नकळत लेखिकेच्या आनंदविश्वाचा वाटेकरी होतो. ‘ते’ आणि मी हे पुस्तक वाचणं म्हणजे निखळ आनंदाचा अनुभव आहे अन् निखळ अनुभवाचा आनंदही आहे!


200.00 Add to cart

रत्नांचं झाड


पद्मजा फाटक (मजेत)


ताराबाई मोडक यांच्या चरित्रलेखनापासून ते समाजशास्त्रीय, वैज्ञानिक संशोधनपर लेखनाकडून कथालेखन व अनुभवपर लेखन- अशी वळणं घेत पद्मजा फाटक (मजेत) यांच्या ‘रत्नांचं झाड’ या अनोख्या ललित संग्रहाकडे आपण पोहोचतो.
या संग्रहात एकूण चौदा लेखांची वीण अतिशय सुंदरपणे गुंफली आहे. हा संग्रह म्हणजे केवळ तरल भावना आणि शब्दसौंदर्याने नटलेल्या लेखांचा संग्रह नव्हे; तर यामधील प्रत्येक लेखात विषयविविधता, मार्मिक भाष्य, अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी तल्लख विनोदबुध्दी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन अशा सर्वच गोष्टी अनुभवता येतात. त्यामुळे प्रत्येक लेखाचा विषय व धाटणी जरी वेगळी असली तरी त्यात दिलेले अनुभव, संवेदना आणि सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे समान धागे ठरतात.
विविध रत्नांनी डवरलेलं हे झाड वाचकाला निश्चितच एक व्यापक जीवनानुभूती आणि एक वेगळं समाधान देईल!


200.00 Add to cart

असाही पाकिस्तान


अरविंद गोखले


साहित्य, संस्कृती व कलाक्षेत्रातील आगळावेगळा पाकिस्तान…

पाकिस्तानसारखा शेजारी समजायला संवेदना हवी आणि जिज्ञासाही. सांस्कृतिक भान हवं आणि राजकीय जाणही. पाकिस्तानला जाऊन, विविध क्षेत्रांमध्ये फिरून घेतलेला अनुभव हवा आणि अभ्यासही हवा. प्रत्यक्ष भेटी-गाठींमधून वेध घेण्याची दृष्टी हवी आणि उच्चपदस्थ वर्तुळातील लोकांबरोबर चर्चाही व्हायला हवी. पाकिस्तानी साहित्याची ओळख हवी आणि भारत-पाकिस्तानमधील सांस्कृतिक साम्यस्थळांबद्दल आस्था हवी.
अरविंद गोखलेंकडे या सर्व गोष्टींबरोबर आहे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव. त्यातून कसदार झालेली लेखनशैली.

पाकिस्तानच्या रस्त्यांवरून केलेली भटकंती- कधी संशयाच्या छायेत तर कधी अनोळखी माणसांनी केलेल्या आदरातिथ्याच्या मायेत. अनेकांच्या परिचयातून समजलेला पाकिस्तान आणि कितीही वाचन-चिंतन केलं तरी गूढ राहिलेला पाकिस्तान. एकाच वेळेस मित्र असूनही शत्रूच्या रूपात भासणारा आणि तरीही नेहमी अनाकलनीय कारणांसाठी आकर्षित करणारा – असा आहे गोखलेंचा पाकिस्तान अर्थात्‌ ‘असाही पाकिस्तान!’

– कुमार केतकर यांच्या प्रस्तावनेतून


240.00 Read more

मनःपूर्वक खुशवंत

जीवन, मरण आणि त्या दरम्यान…


खुशवंत सिंग
अनुवाद : अभिजित थिटे


* `माझी एकच इच्छा आहे की, मला जेव्हा मृत्यू येईल, तेव्हा तो अगदी सहजतेने यावा. आपण जसं गाढ झोपून जातो ना, तसाच…’

* `मला वाटतं, कामुक विचार करणं, त्याची कल्पना करणं हेही अगदी स्वाभाविक आहे, त्यात गैर काही नाही.’

* `शेवटी जाण्याची वेळ झाली की खेद, दु:ख, कोणावरही राग न ठेवता जावं.’

निधनापूर्वी, वयाच्या ९५व्या वर्षी खुशवंत सिंग यांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकात त्यांनी सहजसोप्या आणि रोखठोक शैलीत त्यांचं खासगी आयुष्य, विवाह, प्रेम, सेक्स आणि त्यांचं लेखन व संपादनाचं काम यांविषयी ‘बिनधास्तपणे’ लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात ते प्रथमच त्यांचं यश आणि अपयश, क्षमता आणि मर्यादा यांबद्दल खुलेपणाने सांगतात.
आनंद, श्रध्दा, मृत्यू आणि धर्म यांसारख्या विषयांबाबत बोलताना ते चिंतनात्मक होतात; तर जातीयवाद, भारताचं राजकारण, दहशतवाद यांबद्दल बोलताना ते थेट आणि रोखठोक होतात. तसंच इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी, लालकृष्ण अडवाणी अशा त्यांच्या स्नेह्यांबद्दलही ते कुठलीही भीडभाड न बाळगता लिहितात.
हे ललितलेखन करताना खुशवंत सिंग यांनी आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे वेगवेगळे कंगोरेही नोंदवले आहेत. त्यामुळेच मनापासून लिहिलेलं मन:पूर्वक खुशवंत वाचकांना नक्कीच भावेल…!


225.00 Add to cart

ऋणानुबंध

भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…


यशवंतराव चव्हाण


मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.
वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.

म्हणूनच…
अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ‌ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही…


300.00 Add to cart

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध


अरुण टिकेकर


ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.


190.00 Add to cart

आऊट ऑफ द बॉक्स

क्रिकेट: भावलेलं, दिसलेलं आणि त्या पलीकडचं


हर्षा भोगले
अनुवाद : चंद्रशेखर कुलकर्णी


स्वतःचं स्वप्न साकार करू पाहणार्‍या काही वाचकांना या पुस्तकातून निश्‍चितच एक दिशा आणि प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहेच, पण आपापल्या क्षेत्रात नेतृत्व कसं करावं आणि व्यावसायिक आयुष्यात आंतरराष्ट्रीय दर्जा कसा अंगी बाणवावा, याचेही काही मंत्र मिळून जातील.
— सचिन तेंडुलकर
टेलिव्हिजनच्या पडद्यावर जे दिसत असतं त्यापेक्षाही खूप काही तो तिथूनच आपल्याला दाखवतो. त्याने लेखणी चालवली तर कॉमेंण्ट्री बॉक्समधून त्याने जे सांगितलं त्याच्या कितीतरी पुढे तो आपल्याला घेऊन जातो. कॅमेर्‍याच्या साक्षीने उलगडणारी गोष्ट त्याच वेळी प्रभावीपणे सांगणं आणि त्याच कथानकावर वृत्तपत्रात लिहिताना चार पावलं पुढे जाऊन वेगळाच दृष्टान्त देणं या दोन्ही क्षमता असणारी माणसं भारतीय माध्यमांमध्ये फारच थोडी आहेत. हर्षा भोगलेचं वेगळेपण नेमकं यातच आहे.
— शेखर गुप्ता
खेळाबाबत प्रेम आणि ज्ञान यांच्या अपूर्व संगमाचे स्पष्ट प्रतिबिंब हर्षाच्या शैलीदार लिखाणात दिसते.


195.00 Add to cart

ऋणानुबंध (डिलक्स आवृत्ती)

भेटलेल्या व्यक्ती, भावलेली स्थळं, घडलेल्या घटना…


[taxonomy_list name=”product_author” include=”456″]


मानवी जीवन हा एक प्रवास मानला तर वडीलधाऱ्यांचे बोट धरून चालणे आले, थोरामोठ्यांना वाट पुसत जाणे आले.
हा प्रवास कधी ’एकला चलो रे’ च्या चालीवर तर कधी मित्रांचा स्नेह आणि सहवास सोबतीला.
प्रवासात कधी चढउतार तर कधी ऊनपाऊस, तर कधी आशा – निराशेचे क्षणही.
सुखदु:खाच्या या संमिश्र वाटचालीत नियतीचा हातही वेळप्रसंगी मार्गदर्शक ठरतो.
सर्जनशील विचार आणि संवेदनक्षम भावना यांचे संगमस्थान वाटेत लागले तर मौलिक असे काही छंद आणि काही श्रध्दा मिळून जातात.
वाटेत भेटलेल्या व्यक्ती, आढळलेली स्थळे, घडलेल्या घटना कधी साध्या तर कधी अविस्मरणीय.

म्हणूनच…
अशा व्यक्ती, असे क्षण, असे प्रसंग, अशा भावना, असे विचार, अशा घटना, अशी स्थळे, असे शब्द यांचा ‌ऋणानुबंध म्हटले तर शब्दातीत, म्हटले तर शब्दबध्दही…


300.00 Add to cart

सहेल्या इथल्या-तिथल्या

आशा दामले


चार पावलं बरोबर चाललं की मैत्री होत नाही . एकमेकांच्या आयुष्यात चौकसपणे न डोकावता , सहजस्फूर्तपणे जे जाणवतं त्यात मैत्रीची बीजं असतात . न विचारता बोलायला , न सांगता ऐकायला कधी सुरुवात होते , एकमेकानां समजून घेताना मैत्री केव्हा जुळते कळतच नाही . दीर्घकाळ सहवासात राहता येतच अस नाही . परंतु सहवासाचे ते क्षण जेव्हा स्मृतीत घर करून राहतात , तेव्हा जीवाभावाची मैत्री जडते . लेखिकेच्या या ‘ सहेल्या तशा सामान्यातील असामान्य . आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर जेव्हा चौकट विस्कटते , तेव्हा चौकटीबाहेरचे निर्णय घेण्याचे धाडस त्या दाखवतात , त्यातील वेगळेपण पेलून आयुष्य जगतात . हे वेगळेपण पेलणं त्यांना सोपं जातं की त्याची खंत वाटते , की त्यातून निर्भेळ आनंद मिळतो ? या सगळ्या सहेल्यांच्या जीवनाने घेतलेले वेगवेगळे आकार विलोभनीय वाटतात . मोडतोड न करता , चौकटीत न बसणाऱ्या या सहेल्या इथल्या – तिथल्या


60.00 Add to cart

घरट्यातल्या चिमण्या

 

[taxonomy_list name=”product_author” include=”4848″]


वसुमती धुरू यांची पाककलानिपुण आहारशास्त्रज्ञ ही ओळख आता जुनी झाली आहे . सजग नजरेने आसपासच्या समाजात वावरणाऱ्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून दादरची माणसे त्यांना ओळखतात …. एका विशिष्ट भौगोलिक परिसरातील काही स्त्रियांच्या जीवनाची ही रेखाटने आहेत . आठवणी आहेत . त्यात स्मरणरंजनाचाही भाग आहे ; पण लेखिका स्मरणरंजनात फार रमणारी नाही . या पुस्तकात भेटणाऱ्या स्त्रिया तशा सामान्य आहेत , तरीही परिस्थितीवर स्वार होणाऱ्या आहेत … लेखिकेला बदलत्या काळाची , बदलत्या मूल्यांची जाणीव आहे . ती निवेदनात व्यक्तही झाली आहे . कधी स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी अपेक्षांमधील विनोदही निवेदिकेला जाणवतो … दादरमध्ये अनेकांच्या परिचयाच्या असलेल्या प्रभावती बापटाचे व्यक्तिचित्र आणि ‘ पूरणसाव ‘ हे वेगळे व्यक्तिचित्र वाचत असताना लेखिकेची स्वत : ला प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात येते . ‘ त्यांच्या शेवटच्या इच्छा’मध्ये अंत्यसंस्कारांविषयीचे पुरोगामी विचार , अनेक व्रतस्थ माणसांचे अखेरच्या दिवसात तोल जाणे याची चिकित्सा हे लेखनातील प्रगल्भ आविष्कार आहेत . तसेच प्रेमलग्ने कशी होतात आकर्षण म्हणजे काय ? हे किशोरवयीन मुलामुलींचे प्रश्नही आले आहेत . ‘ कोणासारखी होशी गं मुली ? ‘ सारख्या नर्मविनोदी कथेतील वटसावित्रिचे व्रत गमतीचे आहे .. दादरमधील त्या काळातल्या जीवनाचे चित्र रेखाटताना स्मरणरंजनाच्या सहजप्रेरणेला आवर घालत हे लेखन केले आहे . त्यातील तपशील मोलाचा आहे , पण त्यापलिकडे लेखिकेचा दृष्टिकोन अधिक मोलाचा आहे . – पुष्पा भावे ( प्रस्तावनेतून


100.00 Add to cart
1 2 3