अंक निनाद २०२१

अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.


‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.

‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.

250.00 Add to cart

अंक निनाद २०२३

अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.


‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.

‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.

300.00 Add to cart

विश्वामित्र सिण्ड्रोम

 

पंकज भोसले


विसाव्या शतकाच्या अखेरीला जागतिकीकरण नामक काहीतरी झालं आणि त्याचे पडसाद समाजाच्या सर्व थरात उमटले. जग लहान झालं. इंटरनेटच्या माध्यमातून हव्या नको त्या बऱ्याचशा गोष्टी थेट आपल्या दारात येऊन पोचल्या आणि त्यांनी आपल्या जगण्याचं तंत्रच बदलून टाकलं. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या जोडकथा या अशा मोठ्या बदलाच्या साक्षीदार आहेत. वरवर पाहता त्या मुंबईनजीकच्या एका वस्तीत इंटरनेटवरून अवतरलेल्या पोर्नोग्राफीचा आणि त्यामुळे वरकरणी पापभीरू वाटणाऱ्या  समाजातल्या विविध वृत्तीदर्शनाचा धांडोळा घेतात, पण प्रत्यक्षात तो त्यांचा केवळ एक पैलू आहे. तंत्रज्ञानापासून संगीतापर्यंत आणि राहणीमानापासून नातेसंबंधांपर्यंत आपला भवताल कसा बदलत गेला, याचं हे एकाच वेळी धक्कादायक तरीही गमतीदार असं दर्शन आहे.
पंकज भोसले हा पत्रकार असण्याबरोबर सिनेमा आणि साहित्याचा चाणाक्ष अभ्यासक आहे, एका अस्वस्थ काळाचा निरीक्षक आहे. आणि त्याचं हे टोकदार निरीक्षण ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथांना त्यांच्या साऱ्या विक्षिप्तपणासह जिवंत करतं.
गणेश मतकरी

 

350.00 Add to cart

गोठण्यातल्या गोष्टी

हृषिकेश गुप्ते


गोष्टी सांगण्यापूर्वी…

‘….प्रत्येक गावात काही आख्यायिका आणि दंतकथा असतात . एक लेखक म्हणून या आख्यायिका मला भुरळ पाडतात . कोणताही लेखक त्याच्या कानावर पडलेल्या आख्यायिका निव्वळ कपोलकल्पित प्रदेशात राहू देत नाही . कधी चिमूटभर आशयाच्या सूतावरून कल्पनेचा स्वर्ग गाठत , तर कधी आशयाच्या स्वर्गात कल्पनेचं सूत कातत या आख्यायिकांना लेखक कागदावर उतरवत राहतो . कधी कल्पनेतल्या माणसांना तो खरेखुरे सदरे चढवतो . तर कधी खऱ्या मानवी स्वभावांना लेखक कल्पित नियती देतो . नाव , गाव , देश , वेष बदलत ही माणसं , या आख्यायिका मग सर्वदूर पसरत जातात आणि चिरायू होतात . ” गोठण्यातल्या गोष्टी’तली ही माणसं खरी असली नसली तरीही जन्मापासून ही माणसं माझ्यासोबत आहेत . या माणसांना आदि – अंत नाही.

म्हणूनच ही माणसं स्वयंभू आणि चिरायू आहेत …..’



 

360.00 Add to cart

अंक निनाद २०२२

अमेरिकेतून प्रकाशित होणारा पहिलावहिला जागतिक दिवाळी अंक.


‘आंतरराष्ट्रीय कथास्पर्धा’ हे आमच्या अंकाचे खास वैशिष्ट्य आहे. या कथास्पर्धेसाठी महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्जनशील लेखक कथा पाठवतात. प्रतिभाशाली आणि मान्यवर परीक्षक त्यांमधून छापण्याकरता पहिल्या तीन क्रमांकांसाठी सर्वोत्तम कथा निवडतात.

‘अंक निनाद’ ही लेखनाची आणि वाचनाचीही एक प्रयोगशाळा आहे. साहित्यप्रकार व विषय यांच्यातील वैविध्य हे या अंकाचे बलस्थान! यंदाच्या अंकात वाचा अमेरिकेतील मराठी माणसांच्या वेगळ्या वाटा.

250.00 Add to cart

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू


शोभा भालेकर


एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….

निळ्या रंगाचे राजवर्खी फुलपाखरू !

250.00 Add to cart

बातमीमागची बातमी

खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य

जयप्रकाश प्रधान

 


हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’



200.00 Add to cart

समर्थ मालिका संच


३ पुस्तकांचा संच


नारायण धारप


नारायण धारप यांची ‘समर्थ’ ही एक काल्पनिक व्यक्तिरेखा…

अशोक समर्थ हे एक प्रकारचे ‘पॅरानॉर्मल’ डिटेक्टिव्ह…

सर्वसामान्यांना छळणाऱ्या दुष्ट व अघोरी शक्तींचा आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्याने ते पाडाव करतात.

त्यांच्या डावपेचात ते भौमितिक आकृत्या, रिंगणं, धुपारे अशा सुरक्षासाधनांचाही वापर करतात…


 

1,500.00 Add to cart

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध


अरुण टिकेकर


ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-विभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.


190.00 Add to cart

सहज


धनंजय जोशी


आलेल्या क्षणाला सहज सामोरं जाणं हे तत्त्व झेन तत्त्वज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक मानलं जातं. या तत्त्वाचं आचरण करण्यासाठी शिकागोस्थित लेखक धनंजय जोशी यांनी भारतातून, थायलंडमधून आणि दक्षिण कोरियातून अमेरिकेत आलेल्या बौद्ध गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विपस्सना (विपश्यना) आणि झेन मेडिटेशन या दोन्ही अध्यात्मपरंपरांची प्रदीर्घ काळ साधना केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झेन तत्त्वज्ञान आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालून ललितशैलीत अनुभवकथन लिहिलं. त्याचंच हे पुस्तक म्हणजे ‘सहज’.

रोजच्या जगण्यातल्या नेहमीच्या अनुभवांना झेन कथा, झेन गुरूंच्या आठवणी किंवा प्रसंग यांची जोड देऊन जोशी लीलया झेन तत्त्वज्ञानातली मूलतत्त्वं आपल्याला त्यांच्या या लहानशा लेखांमधून सांगून जातात. विशेष म्हणजे ती सांगत असताना त्यांचा सूर उपदेशकाचा नसतो. तो सहज, पण काहीतरी महत्त्वाचं सांगून जाणारा असतो.

एखाद्या मित्राने किंवा जवळच्या व्यक्तीने त्याला आकळलेली शहाणीव जाता जाता आपल्याला सांगून जावी, असा अनुभव देणारं पुस्तक… ‘सहज’…



250.00 Add to cart
Featured

काम तमाम @ वाघा बॉर्डर


सतीश तांबे


या कथा आपल्याला थेट भिडतात याचे कारणच मुळी त्या आपल्या परिचित परिसरातल्या आहेत. परंतु त्या परिचित वास्तवाला अनपेक्षित छेद देऊन आपल्याला काहीशा गूढ आणि काहीशा रहस्यमय अवास्तवाकडे घेऊन जातात. वाचताना धक्का बसतो, भीतीही वाटते आणि म्हणून उत्कंठाही वाढते. सतत कुठेतरी जाणवत राहते की या ‘अवास्तव वास्तवाला’ आणि त्यातील क्रौर्याला तसेच करुणेला आपल्या मनात खोल स्थान आहे… संशयाने आणि भीतीने, अनिश्चिततेने आणि अस्वस्थतेने आपले दैनंदिन जीवन कसे वेढलेले आहे हे या सर्व कथांमध्ये ठसठसत जाणवत राहते.

कुमार केतकर (प्रस्तावनेतून)

मराठी कथा-साहित्यात सतीश तांबे यांच्या कथेचं स्वतंत्र स्वयंभू घराणं आहे. त्याला महानगरी कथेच्या कोंदणात कोंबू नये. तिचं वळण बौद्धिक आहे. शैली ऐसपैस गजाली सांगणाऱ्या गोष्टींची आहे. तिचं अनुकरण सोपं नाही, कारण ती विशिष्ट विचार प्रक्रियेतून प्रसवलेली असते.

जयंत पवार


 


260.00 Add to cart
SaleFeatured

प्रणव सखदेव कादंबरी संच

२०२१ चा साहित्य अकादेमी युवा पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव लिखित ३ कादंबऱ्यांचा संच


प्रणव सखदेव


प्रणव सखदेव ३ कादंबऱ्या
१) चतुर
२) ९६ मेट्रोमॉल
३)काळेकारडे स्ट्रोक्स


रु. ६६०  ची पुस्तकं सवलतीत रु. ५२० (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

Original price was: ₹660.00.Current price is: ₹520.00. Add to cart

इति आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास


अरुण टिकेकर


‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”



500.00 Add to cart
Featured

नाइन्टीन नाइन्टी


सचिन कुंडलकर


आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक

सचिन कुंडलकर…

या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा

एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !



340.00 Add to cart

वामनाचे चौथे पाउल

विज्ञान कथांच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला वेध


सुबोध जावडेकर


वामनाचे चौथे पाऊल

तीन पावलांत तिन्ही लोक पादाक्रांत करून, चौथे पाऊल कुठे ठेवू, असा प्रश्न वामनाचे बळीराजाला विचारला होता.

नेमका हाच प्रश्न आज विज्ञान माणसाला विचारत आहे. अवघे विश्व व्यापून टाकणाऱ्या विज्ञानाचे पुढचे पाऊल उद्या कुठे पडणार आहे?

या प्रश्नाचे उत्तर शोधायचा हा प्रयत्न . विज्ञानकथेच्या माध्यमातून भविष्याचा घेतलेला हा वेध.

पण या कथा विज्ञानाच्या नाहीत . विज्ञान सोपे करून समजावून सांगावे , यासाठी सांगितलेल्या तर नाहीच नाही.

या आहेत माणसाच्या कथा.

फार तर, उद्याच्या माणसाच्या म्हणा.


 



250.00 Add to cart

हरवलेले स्नेहबंध

नरेंद्र चपळगावकर


परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –
मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’!


200.00 Add to cart
1 2 3