व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी सर्वसाधारणपणे लोक जरा संवेदनशील असतात, ‘सेन्सिटिव्ह’ असतात. आपल्या स्वातंत्र्यावर कोणाला किती आरूढ होऊ द्यायचं याची मनात जी काही चौकट ठरवली असेल, समजा, ती चौकट कुणी कधी पार केली तर, एखादी व्यक्ती आवेशाने म्हणतेही, ‘‘मी स्वतंत्र वृत्तीचा माणूस आहे. दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणारा नाही. वेळप्रसंगी मी माझ्या स्वातंत्र्याची किंमत मोजायला तयार आहे…’’ परंतु, प्रत्यक्ष जीवन जगणं ही गोष्ट वेगळी असते. हे जाणून सर्वसामान्यांच्या भूमिकेतून काही जण मर्यादांची मांडणी करताना असंही म्हणतील, ‘‘ज्यांची पोटं खाऊन-पिऊन भरली असतात ना, तेच स्वातंत्र्याच्या गोष्टी करू शकतात. दोन वेळच्या खाण्याची ज्यांना भ्रांत असते, ते नाही स्वातंत्र्याच्या गमजा मारू शकणार…’’
व्यक्तिगत आयुष्यात आपण बऱ्यापैकी स्वातंत्र्य मिळवू शकणार का नाही, म्हणजेच आपण आपल्या मनाजोगतं आयुष्य जगू शकणार किंवा नाही, हे ज्याच्या-त्याच्या परिस्थितीनुरूपच ठरतं… आणि परिस्थितीनुरूपच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याच्या व्याख्या वेगळ्या असणार, जीवनाकडून अपेक्षा वेगळ्या असणार. जगण्याच्या मजबुरीतूनच स्वातंत्र्य गमावण्याची ज्यांच्यावर वेळ येते, त्यांना ते गमवावं लागतं आहे, याची खंत असते, मनाला सल असतो. एकंदरीत सांगायचं तर, सर्वसामान्यांच्या चष्म्यातून पहा, नाहीतर विचारवंतांच्या… मनाजोगतं जगता येणं, हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचाच विषय असतो.
या मनोगतात ‘स्वातंत्र्य’ हा विषय उकरून काढायचं कारण सांगायचं तर, एक म्हणजे पंधरा ऑगस्ट… भारताचा त्र्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन आणि या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीला असलेली ‘कोरोनानिर्मित’ आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर कमालीची बंधनं आणणारी ‘लॉकडाउनमय’ परिस्थिती… चार महिने होऊन गेले; कधी हा लॉकडाउन कडक असतो, तर कधी थोडा नरमाईचा, तर कधी शिथिलावस्थेत… अशा या बंधनांच्या विळख्याने सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम केला आहे. या पार्श्वभूमीवर मी काही व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी ‘कोट्स’ निवडले आहेत. हे ‘कोट्स’ काय म्हणतात, आणि आताचं वास्तव काय सांगतं, हे जरा तपासून पाहू या…

‘‘मी काही पक्षी नव्हे, ज्याला तुम्ही जाळ्यात अडकवू शकाल…’’ वास्तव असं सांगतं की, आज तुम्ही स्वत:ला मास्क, सोशल डिस्टस्निंगच्या जाळ्यात अडकवून घेतलं नाही, तर ‘कोरोना’ विषाणूच्या जाळ्यात अडकू शकाल त्याचं काय?

भारताचा त्र्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन आणि या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीला असलेली ‘कोरोनानिर्मित’ आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर कमालीची बंधनं आणणारी ‘लॉकडाउनमय’ परिस्थिती… चार महिने होऊन गेले; कधी हा लॉकडाउन कडक असतो, तर कधी थोडा नरमाईचा, तर कधी शिथिलावस्थेत… अशा या बंधनांच्या विळख्याने सर्वांच्याच आयुष्यावर परिणाम केला आहे.

‘‘मी एक मनुष्यप्राणी आहे, मला स्वतंत्र इच्छा-आकांक्षा आहेत…’’ खरं आहे हे, पण आजच्या परिस्थितीत तुम्ही तुमचे हक्क बजावू शकाल का? नाही म्हटलं तरी आज तुमच्या स्वत:च्या किंवा तुमच्या पाल्याच्या शिक्षण घेण्यावर आच आली आहे. त्यामुळे तुमच्या भवितव्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमच्या काम करण्याच्या हक्कावरही गदा आली आहे. अनेक व्यवसाय बंद आहेत आणि काही ठिकाणी कामं चालू झाली आहेत, पण तिथे पोचायची सोय नाही. अशा परिस्थितीत जिथे उदरनिर्वाहासाठी अर्थार्जन करणं अशक्य झालं आहे, तिथे कसल्या स्वतंत्र आशा-आकांक्षा तुम्ही बाळगू शकणार?
‘‘स्वातंत्र्य तुम्हाला कुणी स्वत:हून बहाल करत नाही, ते मिळवावं लागतं…’’ आताच्या परिस्थितीत आपल्या प्रत्येक गोष्टीवर, हालचालीवर इतक्या मर्यादा आल्या आहेत की, वरील उक्ती निरर्थक ठरते. जिथे अस्तित्वात असलेल्या स्वातंत्र्यावर परिस्थितीने अंकुश निर्माण केले आहेत, तेथे आपल्याला कुणी नव्याने स्वातंत्र्य बहाल करण्याचा किंवा आपण ते प्रयत्नपूर्वक मिळवण्याची शक्यताच उद्भवत नाही.

‘‘मला चुका करायचं स्वातंत्र्य हवं…’’ हो, हे स्वातंत्र्य तुम्ही घेऊ शकता. तुम्ही नियम धाब्यावर बसवून मनाजोगतं काही करू शकता. त्या चुकांचे जे काही बरे-वाईट परिणाम होतील, ते भोगायची, त्याची किंमत चुकवायची तयारी तुम्ही जरूर दाखवू शकता. पण यात एका सावधानतेचं काय? म्हणजेच आपल्या चुकांचा प्रतिकूल परिणाम दुसऱ्यांवर व्हायला नको. अर्थात, आताच्या परिस्थितीत तुमची एक चूक दुसऱ्याच्या जीवावर उठू शकते… तुमच्या चुकीमुळे तुम्ही ओढवून घेतलेला ‘कोरोना’ विषाणू तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता… आणि त्या दुसऱ्याच्या नकळतपणे तो हा विषाणू तिसऱ्याकडे ‘हस्तांतर’ करू शकतो. तेव्हा निश्चिंतपणे असं म्हणता येईल की, चुका करण्याच्या तुमच्या स्वातंत्र्याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही समाजभान ठेवायला हवं.
मी या लेखासाठी निवडलेला शेवटचा ‘कोट’ मात्र आपल्याला सकारात्मकतेकडे नेऊ शकतो…
‘‘तुम्ही माझ्यासाठी ज्ञानाची कवाडं कडी-कुलुपात बंद ठेवू शकता. परंतु माझं मन विचार करायला स्वतंत्र असेल, त्याला कुणी कडी-कुलुपात बंदिस्त नाही करू शकणार…’’ मला वाटतं, ही उक्ती आजच्या परिस्थितीत महत्त्वाची ठरू शकते. आज वाचन-मनन करून, तुम्ही वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ शकता. तुम्ही जी परिस्थिती आज अनुभवत आहात, ती परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सारं जगच अनुभवतं आहे. तेव्हा धीराने, चिकाटीने प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमच्या मनाची नव्याने मशागत करण्याची जणू ही संधीच आहे. अडचणींवर मात करण्यासाठी मनाला विकसित करून आपत्तीचं रूपांतर आपण एक प्रकारच्या संधीत करू शकतो.
यावरून एकंदर असा निष्कर्ष काढता येईल की, ‘कोरोना’ सर्वकाही बदलतो आहे, आणि स्वातंत्र्याची संकल्पनाही या बदलाला अपवाद ठरत नाही.
असो, आपल्या स्वातंत्र्यावर आज निर्बंध आले आहेत, हे जरी खरं असलं, तरी आजची ही परिस्थितीच विलक्षण किंवा असामान्य अशी आहे. तुमचा स्वातंत्र्याचा अधिकार दुसऱ्यासाठी विनाशकारी ठरू नये हेच सूत्र प्रामुख्याने आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. परंतु सर्वसाधारणपणे काम करताना आपल्याला स्वातंत्र्य असल्यास आणि आपण दुसऱ्यालाही ते दिल्यास त्याचे परिणाम सकारात्मकच होतात. मी गेली पंचेचाळीस वर्षं स्वतंत्र व्यवसाय चालवत आहे. या दरम्यान मी आपल्या सहकाऱ्यांना स्वातंत्र्य देण्याचं, त्यांच्या स्वतंत्र बुद्धीला चालना देण्याचं सूत्र बाळगलं आहे. या सूत्राचे काही वेळा प्रतिकूल परिणामही सहन करायला लागतात, पण पुढे माणसं या सकारात्मक वातावरणात घडतातही. एक तर व्यापकदृष्ट्या विचार करता यातून अधिक सक्षम, स्वतंत्र विचारांना पोषक अशी कार्यशैली विकसित होते आणि दुसरं असं की, चार डोक्यांनी स्वतंत्र बुद्धीने कामं केली, तर त्यातून होणारी निर्मिती ही निश्चितच सकस असणार, काळाच्या पुढची असणार.

Pradeep Champanerkar photo

परंतु, स्वातंत्र्याची कशीही मांडणी केली तरी ‘स्वातंत्र्य’ ही तशी ‘रिलेटिव्ह टर्म’ आहे. ‘स्वातंत्र्य’ आणि ‘बेशिस्त’ यांत फरक आहे. आणि जबाबदारीचं भान न राखता उपभोगलेल्या स्वातंत्र्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे बहुतेकांनी आपल्या परिस्थितीला साजेल अशा, झेपेल अशा स्वातंत्र्याच्या चौकटी स्वत:पुरती आखून घेतलेल्या असतात. आणि त्या आखून घेतल्या तरच ‘स्वातंत्र्य’ ही संकल्पना जीवनात खरा आनंद निर्माण करू शकेल. कोरोनामुक्त अशा स्वातंत्र्याच्या पहाटेची आपण सर्वच जण वाट पाहत आहोत. परंतु भारताच्या त्र्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही या अंकात अंतर्भूत केला आहे, आमच्या ‘असा घडला भारत (१९४७-२०१२)’ या पुस्तकातील कुमार केतकर लिखित ‘स्वातंत्र्याची पहाट’ हा लेख… त्र्याहत्तर वर्षांपूर्वीच्या ‘नियतीशी करार’ची आठवण करून देणारा, तेव्हाचे अविस्मरणीय क्षण डोळ्यापुढे आणणारा लेख या अंकाचं आकर्षण ठरावं…

…जाता जाता थोडं रोहन प्रकाशनाच्या नियोजित ‘अनलॉकडाउन’ पुस्तकांविषयी…
‘लॉकडाउन’च्या आजच्या काळात आपण काही प्रमाणात शरीराने बंदिस्त झालो आहोत हे जरी खरं असलं तरी ‘कोरोना’ विषाणूने आपल्याला मानसिकदृष्ट्याही बंदिस्त करून ठेवलं आहे, हे नाकारता येत नाही. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘रोहन प्रकाशना’ने काही ‘अनलॉकडाउन’ संकल्पनेची पुस्तकं नियोजित केली आहेत. सर्वसामान्यांसाठी छापील आणि ई-बुक दोन्ही स्वरूपात लवकरच ही नवी पुस्तकं प्रसिद्ध होणार आहेत.

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


विविध विषयांवरील महत्त्वाचे संच

उद्योग संच

यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली


सुरेश हावरे


कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी…

उद्योग तुमचा…पैसा दुसऱ्याचा

उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ… नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल…

 

उद्योग करावा ऐसा…

अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक…

 

स्टार्टअप मंत्र

तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे…‘स्टार्टअप मंत्र’!


725.00 Add to cart

वाचा जाणा करा

९ पुस्तकांचा संच


कविता महाजन


सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी

नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट

यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी

आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती

इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.

मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून

प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.

मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या

आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!450.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : अशोक जैन


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!1,100.00 Add to cart

मन:स्वास्थ्य संच

निरोगी मानसिक आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या ४ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”392″]


मुलांना घडवताना
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समंजस मार्गदर्शन

मनं उलगडताना
मनातल्या गुंतागुंतीवर मनोविकारांवर टाकलेला प्रकाश

सुखाने जगण्यासाठी
सकारात्मक दृष्टी देणारं मौलिक मार्गदर्शन

गोष्टी मनाच्या
आनंदी जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन900.00 Add to cart

Pradeep Champanerkar photo
लॉकडाउन काळातील प्रयोगांबद्दलचा लेख…

ही फलनिष्पत्तीही नसे थोडकी… (प्रदीप चंपानेरकर)

‘पॉडकास्ट’ म्हणजे आमच्या विविध पुस्तकांची वेगळ्याप्रकारे करून दिलेली ओळख. यात टीम रोहनच्या संपादक, लेखक आणि वाचकांनी विविध पुस्तकांची अनौपचारिकरीत्या ओळख करून दिली…

लेख वाचा…


Shrikant-Bojewar
एका लेखकाच्या नजरेतून ‘गपशप दिलसे’बद्दल…

वाच‘दिलसे’… ‘मन’से ! (श्रीकांत बोजेवार)

या गप्पांना समारंभाचा फील नसल्याने त्या अधिक मोकळेपणी होतात, सहज होतात. त्यात अभिनिवेश नसतो. प्रश्न विचारणारेही तेवढ्याच सहजतेनं सहभागी होतात. अनेकांना समारंभात प्रश्न विचारण्याचं धैर्य नसतं, त्यांच्यासाठी तर हे माध्यम फारच सोयीचं आहे.

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *