मनाची ‘लॉकडाउन’ स्थिती ‘अनलॉक’ करण्यासाठी…
लॉकडाउन केलेली गोष्ट ‘अनलॉक’ करण्यासाठी चावी लागणारच. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक कारणांसाठी, अनेक प्रकारची, अनेक आकारांची कुलुपं वापरावी लागतात. वापरली नाहीत तरी, आपल्या मानसिक समाधानासाठी तरी, त्यांची उपलब्धता आपण ठेवत असतो. या कुलुपांत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावणाऱ्या मोठ्या आणि प्रगत कुलुपापासून प्रवासाला जाण्यासाठीच्या छोट्या एअरबॅगला लावण्याचं छोटं तकलादू कुलूप असू शकतं. या दोन टोकाच्या [...]