स्टॅच्यू… पण वाचायला मुभा आहे!
पैसा, संपत्ती, सत्ता या बळावर आपण सुखं, सोयी, चैन, माणसं काहीही विकत घेऊ शकतो, आपला अहंकार सुखावून घेऊ शकतो, असा एक विश्वास बाळगून असतात काही जण. तर काहींना आपली बुद्धिमत्ता, शिक्षण, प्रतिभा, अंगी असलेलं कला-कौशल्य या बळावर समोरच्याला कस्पटासमान वागणूक देण्याचा हक्कच जणू प्राप्त झाल्यासारखं वाटतं. काहींना तर मेहनत घेण्याची, कष्ट उपसण्याची तयारी, चिकाटीने आणि [...]