गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

‘ढग’ कादंबरीतील काही निवडक भाग

संभ्रमिताची डायरी… जाणिवेच्या मागावर मी वयाच्या चाळीशीनंतर जाणं सुरू केलं. हा शोध मी डायरीतून सुरू केला. माझी डायरी मी फक्त माझ्यासाठीच लिहीत नव्हतो; तर त्यातून माझ्यासाठी आणि वीणासाठी, म्हणजे माझ्या बायकोसाठी काही गोष्टी स्पष्ट करणं हा तिचा उद्देश होता. तिची काही पानं मी वीणाला अधूनमधून वाचून दाखवत असे. ह्या डायरीतल्या एका भागाला मी शीर्षक दिलं [...]

‘ऊन’ कादंबरीमधील निवडक भाग

काळाचा महिमा असा की, एकेकाळी ज्या घरात भारतीय स्वातंत्र्यावर चर्चा झडल्या तिथे धाकट्या काकामुळे हिंदी चित्रपटाचे चोरटे स्वर घुमू लागले. छपरीत बसलेल्या आजोबांना हे अजिबात पसंत नसे. त्यांना तसंही संगीताचं वावडंच. आजोबांच्या रामराज्यात, म्हणजेच महात्मा गांधींच्या कल्पनेतल्या देशात हिंदी चित्रपटांवर आणि त्यांच्यातल्या पांचट गाण्यांवर कायम बंदी असणार होती. त्या मोहंमद रफी आणि मुकेशला सक्तमजुरीची शिक्षा [...]

‘करोना’सोबत जगताना… : प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?

करोना नावाच्या इवल्याशा व्हायरसने सगळं जग वेठीला धरलेलं असताना, आपण सगळेच जण या व्हायरसशी लागण होऊ नये म्हणून काळजी घेतो आहे. या व्हायरससह जगायचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच करोनासोबत कसं जगायचं याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या पुस्तकांतील निवडक भाग इथे देत आहोत... ‘कोव्हिड-१९’मुळे ‘पॅन्डेमिक’ हा वैद्यकीय क्षेत्रातला शब्द पुन्हा आता सर्वश्रुत झाला आहे. ‘कोव्हिड -१९’ [...]

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

१५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची पहाट… ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ.स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं [...]

‘क्ष-क्षुल्लक…’ या ई-बुकमधील कथेतील निवडक अंश

चौदावं रत्न पुरस्कार आम्हा चौघांपुढे एकच यक्षप्रश्न होता, आपण फेमस कसं व्हायचं? फेमस होण्याचे शंभर मार्ग आम्ही शोधत होतो. यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करणारी पुस्तकं आम्ही चाळली. आम्ही म्हणजे आम्ही चौघांनी. पण त्यात आम्हाला फार रस नव्हता. कारण यशस्वी काय कोणीही होतो. ज्याच्या घरी गाडी आहे, जो शनिवारी आणि रविवारी बायकोला घरी स्वयंपाक करू देत नाही, [...]

बेगम नूरजहानने तयार केलेलं ‘इत्र-इ-जहांगिरी’

बादशहा जहांगीरची बेगम नूरजहान ही मोठीच हिकमती आणि महत्त्वाकांक्षी होती. आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या बळावर तिने दुबळ्या आणि व्यसनाधीन बादशहाचा कारभार आपल्या हातीच घेतला. नूरजहानची कर्तबगारी बादशहा जहांगीरला साह्यकारक ठरली. दोघांचाही शेवट शोकात्म ठरला, तरी नूरजहानच्या कर्तबगारीची नोंद इतिहासाला घ्यावीच लागली. नूरजहानची राजकीय कर्तबगारी वादग्रस्त ठरली, तरी ती स्वत: सौंदर्यासक्त असल्याने कलात्मक, शिल्पकलात्मक आणि [...]

‘96 मेट्रोमॉल’ कादंबरीतील निवडक भाग

धर मला, धर मला, धर धर धर… मयंकला त्याच्यासमोर मोठ्ठा, आडवातिडवा सिमेंट क्रॉन्क्रीटचा रस्ता निपचित पडलेला दिसला. त्याच्याभोवती ना अंधार होता, ना उजेड. तर त्या दोघांचं मिश्रण असलेलं वेगळंच वातावरण होतं – करडं-पिवळं. त्यामध्ये काचेवरून परावर्तित झालेला निळसर-पांढरा रंग मिसळलेला होता. तो काही पावलं चालत पुढे गेला. त्याने डावीकडे पाहिलं, तर नजर जाईल तिथपर्यंत मोठमोठाल्या [...]

‘इति-आदि’ पुस्तकाच्या प्रस्तावनेतील निवडक अंश

कुतूहलाचा गोष्टीवेल्हाळ धांडोळा ‘इति-आदि’ या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीचा आणि घरगुती वापरातील वस्तूंच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आला आहे. हा विषय टिकेकरांच्या अकॅडमिक अभ्यासाशी संबंधित नाही. ते प्राय: मुंबई शहराच्या इतिहासाचे प्रतिष्ठाप्राप्त तज्ज्ञ. शिवाय महाराष्ट्राच्या प्रबोधनपर्वाचे ख्यातकीर्त अभ्यासक. पण टिकेकरांचा वाचन-वावर इतक्या विविध क्षेत्रांत होता की, ते एकाच वेळेस अनेक विषय वाचू शकत आणि त्यावर लिहू शकत. [...]
1 2 4