कलेचा आस्वाद कसा घ्यावा? (‘पेन’गोष्टी)

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, [...]

येणे स्वरयज्ञे तोषावें… (‘पेन’गोष्टी)

लता मंगेशकर नावाचं सातअक्षरी स्वरपर्व आपल्या आयुष्यातून संपलं. असं कधी होईल याचा विचारही केला नव्हता. तसा विचार मनात आला तरी तो तातडीनं झटकून टाकला जायचा. लताच्या जाण्यानं आपलं नक्की काय नुकसान झालंय हे समजायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी केवळ बधिरपणा आलाय. पंचेद्रियांना आत्ता काहीही ऐकायचं नाही, बघायचं नाही, पचवायचं नाही; कारण सोसवायचंच नाही. मन मोठं [...]

लेख झाला का? (‘पेन’गोष्टी)

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी [...]

बोल्ड अँड हँडसम (‘पेन’गोष्टी)

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक [...]

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या [...]

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(१)

फॉन्ट साइज वाढवा कठीण समयांत सगळ्याच काळात माणसांना कथांनी, गोष्टींनी तारले असल्याची अनेक उदाहरणे आहेत. शतकांची, संस्कृतींची, भाषेची, प्रकृतीची आणि माणसांची भिन्नता असूनही अनेक घटकांचे मूलभूत साधर्म्य असणारे ‘डेकॅमेरॉन’ आणि ‘चांदण्यांतील गप्पा’ हे दोन ग्रंथ मासले या लेखाचा मुख्य विषय असले, तरी त्यानिमित्ताने बरीच पुस्तकांच्या आतील फिरस्तीही आहे. हे ग्रंथ वाचणे अलीकडच्या परिस्थितीने अनिवार्य केले. [...]

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(२)

फॉन्ट साइज वाढवा कठीण समयांतील सभ्यकथा... गेल्या तीनेक वर्षांपासून करोनाची हजेरी लागून टाळेबंदी लागेपर्यंत आठवडी दोन दिवसांच्या सुट्टीतील माझी रविवारची सकाळ ही बहुतांश पुण्यातील बाजीराव रोडवरील पुस्तक खरेदीने सुरू होत होती. मार्च २०२०च्या पहिल्या आठवड्यात मी रहस्यकथेसाठी व्याख्यानानिमित्ताने नाशिकला गेलो. त्यानंतरचे दोन आठवडे रहस्यकथांच्या संदर्भाने वाचन-लेखनावर उपडी तापडी पडलो. पुढल्या आठवड्यात रविवारी पुण्याकडे निघण्याआधीच टाळेबंदी [...]

बकाचिओचा डेकॅमेरॉन आणि काशीबाईंचा कथाबटवा….(३)

फॉन्ट साइज वाढवा चावटी आणि सभ्यटी... बकाचिओच्या डेकॅमेरॉनमधील चावटी कथा वाचून झाल्यानंतर आणि त्यानंतर काशीबाई कानिटकरांच्या सभ्य आणि नीतीकथांनी भरलेल्या चांदण्यांतील गप्पा अनुभवल्यानंतर एक विचित्र कल्पना डोक्यात आली. जर हे दोन्ही लेखक आजच्या करोना काळात असते, तर त्यांनी लिहिलेल्या कशा उतरल्या असत्या हे पडताळून पाहण्याचा एक प्रयत्न म्हणून या दोहोंच्या शैलींचा वापर करून एकच कथा [...]

दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष : संपादकीय

फॉन्ट साइज वाढवा २९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. कथा-कादंबरी व अनुभवपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत गांभीर्याने लेखन करणाऱ्या या लेखकाच्या स्मृतिदिनानिमित्त रोहन प्रकाशनच्या 'मैफल EXCLUSIVE !' या वाचन-प्लॅटफॉर्मवर आज आम्ही लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांचा दिबांवरील दीर्घलेख प्रकाशित केला असून, त्याबरोबरच दिबांचे नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक [...]

मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)

फॉन्ट साइज वाढवा २९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्यांच्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख... वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक शेवटी दिलेली आहे. १. एक [...]
1 2 4