वर्ष २०१८ सरलं आणि आता नववर्ष २०१९ उजाडलं आहे. अंगवळणी पडलेलं ‘२०१८’ सुरुवातीचे काही आठवडे आपली पाठ सोडणार नाही. याचं साधं-सोपं उदाहरण म्हणजे कुठेही तारीख लिहिताना नकळतपणे ‘२०१८’ असंच काही वेळा लिहिलं जाणार. मग आली खाडाखोड किंवा चूक तशीच राहून जाण्याची शक्यता. पडलेल्या सवयींचं, त्यांच्या उपद्रवमूल्यांचं हे झालं अगदी अनुल्लेखनीय उदाहरण. पण उलटलेलं वर्ष आपली पाठ इतक्या सहजतेने सोडत नाही. मागील वर्षातल्या घडामोडींचे, निर्णयांचे, आपल्या कामगिरीचे चांगले-वाईट पडसाद पुढील वर्षावर पडतच असतात. नववर्ष, आधीच्या वर्षाचं ओझं घेऊनच उगवतं. हे ओझं अनेक प्रकारचं, अनेक अर्थाचं असू शकतं. वर्षभरात मनाजोगत्या झालेल्या गोष्टी; पुढील वर्षी त्यांच्या पुनरावृत्तीची ग्वाही मागत असतात, तर मनाजोगत्या न झालेल्या गोष्टी; झालेल्या चुकांची उजळणी न करण्यासाठी, सावधतेचे इशारे देत असतात. एकंदरीत सांगायचं तर, नववर्ष कितीही साजरं केलं तरी, ते अपेक्षांचं गाठोडं शिरावर घेऊनच येतं.

सध्याचा काळ हा बदलाचा काळ आहे. बदल होत राहणारच. त्यावर उपाय सावधतेने तरीही नेटाने करायला हवेत. ‘टीम रोहन’ हे भान बाळगून आहे.

मनावर अपेक्षांचं दडपण असणं ही एकप्रकारे सकारात्मक बाब म्हणूनच बघितली पाहिजे. आपल्याकडून आपल्याला अपेक्षा असणं ही ऊर्जा देणारीच बाब आहे. गतवर्ष उजाडताना; याच ‘रोहन साहित्य मैफल’च्या मनोगतात आम्ही वाचकांना आणि मराठी साहित्यविश्वाला, सर्जनशील साहित्याला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली होती. त्यासाठी आम्ही ‘रोहन-मोहर’ या मुद्रेची संकल्पना रुजवली होती. रोहन प्रकाशनातर्फे ‘मोहर’ अंतर्गत सर्जनशील लेखन प्रसिद्ध करताना ते लिखाण जुन्या मळलेल्या वाटेवरचं नसेल, तर साहित्याची नवी क्षितिजं धुंडाळणारं असेल, जास्त करून साहित्याच्या नव्या संकल्पना रुजवणारं असेल, अशीही ग्वाही आम्ही दिली होती. त्यानुसार, या संकल्पनेत बसणारी, अर्थात नावीन्याचा अंगभूत स्पर्श असणारी काही पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केली. त्यात ह्रषीकेश गुप्ते यांचा कथासंग्रह ‘घनगर्द’, प्रणव सखदेवची पहिली कादंबरी ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या पुस्तकांचा समावेश होतो. २०१७च्या अखेरीस ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’ हा प्रणवचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर अल्पावधीत प्रणवचं कादंबरी फॉर्ममध्ये जाणं, ही निश्चितच कुतुहलजनक बाब आहे. ‘तंबी दुराई’ अर्थात, श्रीकांत बोजेवार यांच्या विविध शैलीतील उपहासात्मक लेखनाची ‘दीड-दमडी : राजकीय’ आणि ‘दीड-दमडी : अ-राजकीय’ ही ‘मोहर’ अंतर्गत प्रसिद्ध झालेली दोन पुस्तकंही साहित्याचे वेगळे आयाम निर्माण करणारी ठरावीत. ‘मोहर’विषयी जाहीर करण्याजोगी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे, विश्राम गुप्ते यांची त्रिग्रंथधारा आम्ही योजली आहे. या त्रिग्रंथधारेतील पहिली कादंबरी ‘चेटूक’ या वर्षअखेरीस आम्ही प्रसिद्ध केली आहे. ‘मोहर’ अंतर्गत नरेंद्र चपळगावकरांचे ‘हरवलेले स्नेहबंध’, प्रदीप कुलकर्णी लिखित ‘यांनी केलं विनोदविश्व समृद्ध’, डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धेंचं ‘ग्रीक पुराण’, सुप्रसिद्ध लेखक शिन्ईची होशी यांच्या मूळ जपानी कथांवरून निसीम बेडेकर यांनी अनुवादित केलेला कथासंग्रह ‘शिन्झेन किस’ अशा काही पुस्तकांचा समावेश होतो.

Pradeep Champanerkar photo

मागे जाऊन थोडा विचार केला, तर जाणवतं की, उदारीकरणाचे, जागतिकीकरणाचे जगभर पसरणारे वारे भारतातही येऊन थडकले आणि मध्यंतरीची २५-३० वर्षं ही माहितीयुग म्हणून गणली गेली. माहितीपर पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आलं. त्यामुळे सर्जनशील लेखनाला एकंदरच मरगळ आली, त्यामुळे म्हणावं तसं लिखाणंही झालं नाही. १९५०-६०-७० या दशकांत एकाहून एक प्रतिभावान साहित्यिक निर्माण झाले. कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, नाटकं व ललित-लेख अशा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये लिहून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. त्यात दलित साहित्याचीही भर पडली आणि एकंदर मराठी साहित्य-विश्व संपन्न होत गेलं. मात्र नंतर विज्ञान-तंत्रज्ञानाने समाजावर भुरळ घातली. आर्थिक सुबत्ता येऊ लागली, तसा सर्जनशील लेखनाचा भर ओसरायला लागला. दोन्ही टोकांवर त्याचा परिणाम दिसू लागला. मागणीही ओसरली व आधीच्या प्रतिभासंपन्न लेखकांच्या तुलनेने सकस साहित्याची निर्मितीही खुंटली. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांत इंटरनेटचं जाळं अकल्पित वेगाने व विशालतेने पसरलं आणि सर्वच गणितं पार बदलली. माहितीपर पुस्तकांचं महत्त्व पुष्कळच कमी झालं. वास्तविक इंटरनेटवरची माहिती व विचारपूर्वक रचना केलेली पुस्तकं, यांत खूप फरक असतो. परंतु, वास्तव परिस्थितीच्या रेट्यापुढे अशा तर्कशुद्ध चर्चेला काही स्थान उरत नाही. मात्र एकापरीने ही गोष्ट उपकारकच ठरावी. कारण साहित्य क्षेत्रात जो असमतोल निर्माण झाला होता, तो दूर करू शकणारी नव्या दमाची लेखक मंडळीही तयार झाली आहेत आणि होत आहेत.

साहित्यातून समाजजीवनाचं प्रतिबिंब उमटतं. ३०-४० वर्षांपूर्वीचं जीवन आणि आजचं जीवन; विशेषत: गेल्या पंधरा एक वर्षांपासूनचं जीवन, यांत खूप मोठा फरक झालेला दिसून येतो. राहणीमानापासून ते सामाजिक ताणतणावांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल होत गेले आहेत. गरजेच्या वस्तूंच्या व चैनीच्या वस्तूंच्या व्याख्यांमध्ये बदल झाले आहेत. त्यानुसार आज प्रत्येक व्यक्तीला विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अशा परिस्थितीत समाजाच्या समस्यांचे व भावभावनांचे विविध पैलू साहित्यातून प्रतिबिंबित होणं आवश्यक आहे. तसे लेखकही आज लेखणी (किंवा लॅपटॉप!) सरसावून बसले आहेत. त्यामुळे येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे. गतवर्ष उजाडताना आम्ही वाचकांना आणखी एक ग्वाही दिली होती आणि ती म्हणजे, काही अभ्यासपूर्ण पुस्तकं प्रकाशित करण्याची. रामचंद्र गुहा यांच्या ‘आधुनिक भारताचे विचारस्तंभ’ (अनुवाद : शारदा साठे) आणि प्रपुल्ल बिडवई यांचं ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ (अनुवाद : मिलिंद चंपानेरकर) या दोन अनुवादित पुस्तकांचा इथे विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे डॉ. मृदुला दाढे-जोशी यांच्या ‘रहें ना रहें हम’ या मूळ मराठी पुस्तकाचाही या अभ्यासपूर्ण पुस्तकांत आवर्जून उल्लेख करावा लागेल.

गेल्या वर्षी आणखी एक संकल्पना आम्ही रुजवली. ती म्हणजे, ‘रोहन व्यक्तिरंग’ या मुद्रेची. ‘व्यक्तिरंग’ अंतर्गत आमची वैशिष्ट्यपूर्ण चरित्र-आत्मचरित्र किंवा व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकं प्रकाशित होतील. ही मुद्रा धारण करून पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं ते म्हणजे, करण जोहर यांचं ‘खरं सांगायचं तर…’ (अनुवाद : नीता कुलकर्णी). त्याचप्रमाणे ‘मायक्रो-सॉफ्टचा बदलता चेहरा – सत्य नडेला’ व ‘गुगलचं भविष्य – सुंदर पिचई’ ही दोन पुस्तकं प्रकाशित करून आजच्या काळाचे ‘गेम-चेंजर’ कसे आहेत, हेही आम्ही वाचकांपुढे आणलं आहे.
२०१७ प्रमाणेच २०१८ सालही पुस्तकांच्या विक्रीच्या दृष्टीने उत्साहवर्धक नाही गेलं. मात्र, अशा वातावरणाकडे दुर्लक्ष करत, विचलित न होता ‘टीम रोहन’ने ठरवलेली उद्दिष्टं गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मला वाटतं, ‘टीम रोहन’ने साकारलेले; वर नमूद केलेले प्रकल्प लक्षात घेता, असं निश्चितपणे म्हणता येईल. सध्याचा काळ हा बदलाचा – Transitionचा काळ आहे. बदल होत राहणारच. त्यावर उपाय सावधतेने तरीही नेटाने करायला हवेत. ‘टीम रोहन’ हे भान बाळगून आहे.
…यशाचं मोजमाप नेहमीच आकडेवारीने करता येणार नाही. कधी कधी दिसून न येणारं मूलभूत प्रकारचं काम जर ठरवल्याप्रमाणे होत असेल, तर त्याला यशच म्हणावं लागेल.

– प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९


रोहन शिफारस

ग्रीक पुराण

कथा – महाकाव्य – शोकात्मिका

ग्रीस आणि भारत या देशांना अतिशय प्राचीन संस्कृतीचा उज्ज्वल वारसा लाभला आहे. मौखिक आणि चिरंतन महाकाव्यांची निर्मिती करणारे हे दोनच देश आहेत. दोन्ही देशांतील महाकाव्यांत आणि पुराणकथांमध्ये विलक्षण साम्यही दिसून येतं. या महाकाव्यांचा विषय संहारक युद्ध हा असून त्यातून प्रकट झालेलं तत्त्वज्ञान, डोकावणारा इतिहास, मानवी प्रवृत्ती, धर्माच्या संकल्पना या सर्व घटकांमुळे ही महाकाव्यं विविध पातळ्यांवर समृद्ध ठरतात. या पुस्तकात सुरुवातीला लेखिकेने ग्रीक वाङमयाची पार्श्वभूमी दिली आहे. पुढे ग्रीक पुराणकथांची वैशिष्ट्यं सांगून अभिजात साहित्यमूल्य असलेल्या रोचक ग्रीक पुराणकथा लेखिकेने पुस्तकासाठी वेचल्या आहेत. त्यात झ्यूस, हेरा, अथिना यांसारख्या देवतांच्या कथा आणि ऑर्फीयस व पॅन्डोरा सारख्या इतर कथांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे ओडिसी व इलियड ही महाकवी होमरने साकारलेली महाकाव्यं, एस्किलस-सॉफोक्लिस-युरिपिडीस लिखित शोकांतिका यांचाही आढावा घेऊन लेखिकेने एक व्यापक वाङ्मयीन पट या पुस्तकाला प्राप्त करून दिला आहे. प्राचीन ग्रीक माणसाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा, आकांक्षा, तत्त्वज्ञान, स्वप्न, कल्पना प्रतिबिंबित करणारं असं हे अभिजात वाङमय मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन अंतर्मुख करतं. सर्जक कलावंताला आविष्काराची प्रेरणा देणाऱ्या, मानसशास्त्रज्ञाला मनाच्या कानाकोपऱ्याकडे बघायला प्रवृत्त करणाऱ्या आणि साहित्याच्या व इतिहासाच्या विद्यार्थ्याला माहितीचा नवा खजिना उघडून देणारं रंजक असं…ग्रीकपुराण!

Greekpuran Cover

300.00Add to cart


‘रोहन-मोहर’ मुद्रेतलं लक्षणीय साहित्य

दीड दमडी संच


[taxonomy_list name=”product_author” include=”496″]


मनमोहन सिंग यांच्या काळातला ‘कोळसा-घोटाळा’ असो, की मोदींच्या जनधन-योजना, स्वच्छता मोहिमा, परदेशवाऱ्या असोत, किंवा संघाची खिल्ली
उडवणाऱ्या शरद पवार यांची भाजपशी अधूनमधून केलेली सलगी असो… गणेशोत्सवाचं बदलणारं स्वरूप असो की संजय दत्तला कारावासात मिळणाऱ्या
सवलती असोत… तंबी दुराई त्याचा तिरकस नजरेचा चष्मा लावणारचं ! मग त्याचा तल्लख मेंदू कामाला लागणार आणि त्या चष्म्यातून अशा प्रसंगांतील
विसंगती हुडकून काढणार. त्या विसंगतींवर बुद्धिनिष्ठ विनोदाचं आवरण चढवून आपल्यापर्यंत त्या ‘दीड-दमडी’तून पोचवणार !
या दीड-दमडीत कल्पनाविलासाचं माध्यम विविधप्रकारे वापरलं जातं… काल्पनिक प्रसंग निर्माण करून त्यात विनोदनिर्मितीची अजोड ताकद असलेल्या
संवादांची चपखल पेरणी होते, विविध भाषा, विविध बोली दावणीला बांधल्या जातात, तर कधी काव्य-अभंग-ओवी-वग असे साहित्यप्रकार ढंगदारपणे पेश होतात, तर कधी ‘पत्र-व्यवहारा’तून तिरकस बाण सोडले जातात. तंबी दुराईचं ‘मोनोटनी’शी वावडं असल्यामुळे तो विविध प्रयोग करतो…एकाचएक शैलीत अडकत नाही.
राजकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती क्षेत्रांत घडणाऱ्या प्रसंगांतील विसंगतींना उघडं पाडत नकळतपणे उपरोधिक भाष्य करायचं आणि तेही उच्च दर्जाची विनोदनिर्मिती साधून… ही या तंबी दुराईची खासियत !
हे लिखाण हसवत हसवत अंतर्मुख कधी करतं, विचारप्रवृत्त कधी करतं, नव्या जाणीवा कधी करून देतं हे कळतही नाही आणि म्हणूनच ही आहे रंजन करणारी, प्रबोधन करणारी आणि त्यासोबत बौद्धिक आनंद देणारी… अर्थात श्रीमंत करणारी दीड-दमडी!


350.00 Add to cart

हरवलेले स्नेहबंध


[taxonomy_list name=”product_author” include=”529″]


परस्परांच्या वैचारिक आकर्षणामुळे आणि आदरामुळे दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये एक बंध निर्माण होतो. हळूहळू त्याचं स्निग्ध स्नेहात रूपांतर होतं. पण काळाच्या पंजातून कोणीच सुटत नाही हे समजल्यावर मागे उरतं ते एक कोरडं व ठोक सत्य –
मनुष्यप्राणी मर्त्य आहे! तरी या स्नेहबंधांच्या स्मृती जिवंत राहतातच. एकीकडे या स्मृतींचा ओलावा डोळ्यांत हलकेच पाणी आणतो, तर दुसरीकडे या स्मृतींच्या उजेडाने जीवन संपन्न झाल्याची जाणीवही समाधान देत राहते. ज्येष्ठ लेखक नरेंद्र चपळगावकर यांनी लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. पु. भागवत, बा. भ. बोरकर, य. दि. फडके, न. र. फाटक, ग. प्र. प्रधान, अरुण टिकेकर, विंदा करंदीकर, नरसिंह राव, पी. सी. अलेक्झांडर, मंगेश पाडगावकर, शांताबाई किर्लोस्कर यांसारख्या जनमानसावर ठसा उमटवणाऱ्या काही प्रतिभावंतांच्या स्मृतींना उजाळा देणारे स्मरणलेख या संग्रहात समाविष्ट केले आहेत. या लेखांची शैली अनलंकृत, तरीही लालित्यपूर्ण असून त्यांतून या व्यक्तींचा सहवास लाभलेल्या चपळगावकरांनी मौलिक अनुभवकथन केलं आहे. लेखांमधल्या स्मृतींच्या हिरव्याकंच पानांखालून ही माणसं आपल्याला सोडून गेल्याच्या जाणिवेचा एक दुखरा झराही सतत वाहत राहतो. अनुभव समृद्ध करता करता कातर करणारा स्मरणलेखांचा संग्रह…‘हरवलेले स्नेहबंध’!


200.00 Add to cart

घनगर्द


[taxonomy_list name=”product_author” include=”515″]


हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.

ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.

त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी

मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.

हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.

तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.

महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.

म्हणूनच त्याच्या कथांमध्ये

एक चैतन्य सळसळताना जाणवतं.

‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून

हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.

ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे

भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.

मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.

त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.

पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.

याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.

– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)



300.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *