दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष : संपादकीय

फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. कथा-कादंबरी व अनुभवपर लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत गांभीर्याने लेखन करणाऱ्या या लेखकाच्या स्मृतिदिनानिमित्त रोहन प्रकाशनच्या ‘मैफल EXCLUSIVE !’ या वाचन-प्लॅटफॉर्मवर आज आम्ही लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांचा दिबांवरील दीर्घलेख प्रकाशित केला असून, त्याबरोबरच दिबांचे नातू, प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी यांचं स्मरणटिपण प्रकाशित केलं आहे.

परेश मोकाशी यांचं टिपण दिबांच्या धूसर आठवणी व सर्जनशीलता यांभोवती फिरते, तर पंकज भोसले यांचा दीर्घलेख दिबांबद्दलच्या अनेक बाबी आपल्या पोटात घेऊन समोर येतो. पंकज यांचा लेख दीर्घ असल्याने, तो आम्ही चार भागांमध्ये आम्ही प्रकाशित करत असून त्या भागाच्या शेवटी व इथेही त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत. या लेखाच्या पहिल्या भागात पंकज यांनी दिबा लेखक म्हणून त्यांना कसे भेटले, त्यांची दुर्मीळ पुस्तकं त्यांनी कशी मिळवली, दि.बां.च्या कथा कशा आवडत गेल्या यावर प्रकाश टाकला आहे. यातून त्यांचं पुस्तकवेड दिसून येतंच, तसंच ते मराठी वाचनसंस्कृतीवर भाष्यही करतात. दुसऱ्या भागात त्यांनी दिबांनी केलेल्या काही दुर्मीळ व आज सहजी न सापडणाऱ्या अनुवादाबद्दल लिहिलं आहे. जेम्स बॉन्डच्या एका कादंबरीचा त्यांनी अनुवाद केला होता, ही बाब फार कमी वाचकांना माहीत असावी! तिसऱ्या भागात दिबांची लेखकीय भूमिका काय होती आणि त्यामुळे ते त्यांच्या समकालीन लेखकांपेक्षा निराळे कसे ठरतात, हे पंकज सांगतात. तर शेवटच्या चवथ्या भागात, पंकज यांनी ‘आता आमोद सुनासि आले’ या दिबांच्या अजरामर कथेच्या निर्मितीबद्दल दिबांनी लिहून ठेवलेली टिपणं यांचा आधार घेत त्या कथेची निर्मितीप्रक्रिया आपल्यासमोर उभी केली आहे.

वैयक्तिक अनुभव, पुस्तकशोध व पुस्तकप्रेम, संशोधन, भाष्य यांनी युक्त असलेला हा दीर्घलेख वाचकांना दिबांच्या लेखनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देईल, नव्या बाबी समोर आणेल आणि पुन्हा दिबांचं वाचण्यास उद्युक्त करेल असा विश्वास आम्हाला वाटतो!

– संपादक


– पंकज भोसले यांचा दीर्घलेख : मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना…

D.B. Mokashi
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१)

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४)

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

लेख वाचा…


– परेश मोकाशी यांचं स्मरण : रेडियोचे दुकान असलेले आजोबा!

Paresh_Mokashi
रेडियोचे दुकान असलेले आजोबा

मला साहित्यिक दिबा माहीतच नव्हते; माझ्यासाठी दिबा म्हणजे रेडियोचे दुकान असलेले आजोबा!

लेख वाचा…


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to Cart

4 Responses

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *