आता पुढे काय? पुढे काय काय होणार? मनात असे प्रश्न येणं, जीवाला अशी हुरहुर लागणं हा मनुष्यस्वभाव आहे. बरं, रोजचा दिवस जगताना असे प्रश्न केवळ एखाद-दोन बाबतीत नाही पडत, तर एकाच वेळी अनेक बाबतीतले प्रश्न पडतात आणि मन अस्वस्थ होतं. परंतु प्रत्येक प्रश्नाची तीव्रता कमी-जास्त असते. काही तरी होऊ घातलं आहे, पण ‘अंतिमत: काय होणार?’ अशा अनिश्चिततेची प्रश्नचिन्हं कायम मनावर स्वार असतात. अगदी आत्ताच्या काळातली बहुतेकांच्या मनातली चिंता कोणती असेल, तर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्याला करोनाविषाणूची बाधा होण्याची! या चिंतेची तीव्रता वाढत वाढत कशी जाते पहा… ‘परवाच एकाच्या सान्निध्यात मी बराच वेळ होतो. तो पॉझिटिव्ह निघाला. आता माझं काय?’ यात मला एखादी शिंक आली, खोकल्याची उबळ आली (वास्तविक तो ठसका लागलेला असतो), मग अंगात थोडी कणकण आहे असं वाटलं… माझी चिंता वाढत जाते. मी कोविड टेस्ट करून घेतलेली बरी, असं म्हणून टेस्ट करून घेतो. आता चिंतेची जागा उत्कंठा घेते. टेस्टचा रिपोर्ट काय येणार? संध्याकाळपर्यंत आला नाही. मी लॅबला फोन करतो. ‘बहुतेक पॉझिटिव्ह येणार, म्हणून वेळ लागतो आहे…’ असं वाटत राहतं… रहस्यच जणू जाणून घेण्याची उत्कंठा! बरं, ही उत्कंठा लागून राहण्याचं कारण समजू शकतं, शेवटी आपल्या आरोग्याचा प्रश्न असतो. पण आता या क्षणाला हे संपादकीय मनोगत लिहिताना मला उत्सुकता लागून राहिली आहे ती अमेरिकेची– तिकडे ट्रम्प येणार की बायडन? आताच्या घडीला तरी ट्रम्प मागे आहे, आणि त्यामुळे अनेकांच्या जीवाला घोर लागला आहे. जीवाला दुसरा घोर लागला आहे तो बिहारचा. नितीशचं काय होणार? हे चिराग पासवान प्रकरण काय आहे? ती कोणाची किंवा कोणती चाल आहे? सस्पेन्सच जणू !

रहस्यकथांच्या निर्मितीला गेल्या काही वर्षांत पडलेल्या सीमांचं गेल्या दसऱ्याचं निमित्त साधून सीमोल्लंघन झालं आणि ‘रोहन-मोहर’ मुद्रा घेऊन ‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @ 19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अ‍ॅक्शन’ आला आहे.

तर, असं एक ना अनेक, पण माणसाचं मन प्रश्नांनी, उत्कंठेनी सतत व्यापलेलं असतं. मग त्याचा विषय आपल्याशी, आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे का नाही हा प्रश्न मागे पडतो. जे माहीत नाही, जे वर्तमानात तरी अज्ञात आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता असणं, मनात त्याचा पाठपुरावा करणं हा मनुष्यस्वभाव आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपलं ‘भविष्य पाहणं’ हा अनेकांचा नाद असतो. मग त्यासाठी रस्त्यावरच्या किडूक-मिडूक ज्योतिषापासून ज्योतिषशास्त्राचा गंभीरपणे अभ्यास केलेल्या ‘ज्योतिषी’ म्हणवून घेणाऱ्या शास्त्रीपर्यंत हा अज्ञाताचा शोध, ज्याच्या-त्याच्या ऐपतीप्रमाणे चालू राहतो.

Agasti-Set-Cover

मात्र, ही उत्कंठा, हा शोध केवळ समस्येशीच निगडित असतो असं नव्हे… मनाचं रंजन करून घेण्याचाही तो मार्ग असू शकतो. ‘पुढे काय होणार? निष्कर्ष कोणता…?’ अनेक वेळा मन रिझवलं जातं अशा उत्कंठेने. हे ताण नेहमीच क्लेशकारक असतात असं नव्हे. उलटपक्षी एखादी रहस्यकथा वाचताना, किंवा सस्पेन्स पिक्चर पाहताना उत्कंठा शिगेला पोचावी अशीच आपली अपेक्षा असते. पुढचं पाहायला, वाचायला आपण आतूर झालेलो असतो. कथानकातलं गूढ वाढत जावं, आपण अंदाज करत जावं, अंदाज चुकीचे ठरावेत… रहस्याचा सुगावा लागू देणाऱ्या आणखी गोष्टींचा मागोवा घेत पुन्हा अंदाज घ्यावेत, त्यांनी पुन्हा हुलकावणी दिली की पुन्हा विचारांना चालना द्यावी, मेंदूला ताण द्यावा, असं चक्र चालू राहिलं, तर अशा ताणांनी मन अधिकाधिक टवटवीत होत जातं. मनाची ती अवस्था वेगळ्या तऱ्हेने मनाला उल्हसित करत जाते, त्यातून वेगळ्या तऱ्हेचा आनंद मिळत जातो.
लेखकाने किंवा दिग्दर्शकाने वाचकाला किंवा प्रेक्षकाला सतत गुंगारा देण्याचं कौशल्य आत्मसात करून कथानक पेश केलं; तरच ते परिणामकारक ठरतं. हे जेवढं चाणाक्षपणे होईल तेवढं ते रंजनात्मक होईल. धक्कातंत्र सर्जनशीलतेने वापरलं तरच ते योग्य तो परिणाम साधेल. धक्कातंत्र सरधोपटपणे वापरलं तर तो वाचकांचा अपेक्षाभंग ठरेल. कथेतील रहस्याचा सुरुवातीपासूनच आपण एखादा अंदाज बांधावा, आणि तो बरोबर ठरला, तर दुसऱ्यांना सांगताना ते मिरवायला चांगलं वाटेल. पण ते अंदाज चुकले, आपलं गृहीतक फोल ठरलं, तर त्याचा मनाच्या आतल्या कोपऱ्यात आनंदच होतो. लेखकाकडून खरं म्हटलं तर, आपली तशी अपेक्षा असते आणि जो लेखक हे आपल्या लिखाणातून सातत्याने साधत राहतो, तो त्याच्या पुढील लिखाणासाठी जास्त लक्षवेधक ठरतो.
माझ्या मते चांगल्या रहस्यकथेची मुख्यत: पाच मानकं असावीत. गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे, कोणत्या वादविवादातून तो गुन्हा घडला आहे; त्यावर वाचक सुरुवातीपासूनच त्या कथानकात गुंतला जाणं अवलंबून असेल. नंतर कथानकाची गती कशी राखली गेली आहे; वाचकाला दिलेल्या खाणा-खुणा अंदाज चुकवणाऱ्या कशा ठरतात; वातावरणनिर्मिती कशी केली जाते; आणि एकंदर कथानकातील विविध घटकांची गुंफण कशी केली जाते… ही ती रहस्यकथा परिणामकारकरीत्या रंगवण्याची पाच महत्त्वाची मानकं म्हणावी लागतील.
एके काळी रहस्यकथा हा साहित्यप्रकार लोकप्रिय होता. सातत्याने हे लिखाण करणारे लेखक होते. बाबूराव अर्नाळकर, दिवाकर नेमाडे, नारायण धारप, श्रीकांत सिनकर, सुहास शिरवळकर ही काही नावं. त्याचप्रमाणे याच साहित्यप्रकाराला वाहिलेलं ‘धनंजय’ मासिक होतं. आजही ‘धनंजय’चा दिवाळी अंक निघत असतो, पण अशा लेखनातल्या सातत्यात आज खंड पडलेला दिसतो.
‘रोहन मोहर’ मुद्रेअंतर्गत आपण रहस्यकथा, थ्रिलर्स प्रकाशित कराव्यात असा विचार ‘टीम रोहन’मध्ये वर्ष-दीड वर्षांपूर्वी झाला. अलीकडच्या काळात या साहित्यप्रकारात जास्त पुस्तकं प्रकाशित होत नाहीत. खरं म्हटलं तर रहस्यकथा या सर्व प्रकारच्या, आणि सर्व वयोगटांतील वाचकांना आकर्षून घेत असतात. एका बाजूला आजकाल वाचन कमी होत चाललं आहे असं आपण म्हणतो, पण वाचकांना पुन्हा पुस्तकांकडे जोडून घेण्यासाठी, नवा वाचकवर्ग निर्माण करण्यासाठी या साहित्यप्रकारात नवी पुस्तकं यायला हवीत. मग त्यासाठी चांगलं लेखन व्हायला हवं. लेखात मी म्हटलेली पाच सूत्रं किंवा मानकं गुंफू शकेल अशा ताकदीचा लेखक हवा. ते कोण करू शकेल याचा विचार करता यासाठी श्रीकांत बोजेवार हे नाव चर्चेत पुढे आलं. बोजेवार विविध प्रकारचं लेखन करत असतात. त्यात ‘तंबी दुराई’ या टोपणनावानेही ते परिचित आहेत. बोजेवारांकडे शैली तर आहेच, परंतु त्याचबरोबर चांगल्या रहस्यकथा बांधण्याचं कौशल्य, त्या रंजकपणे मांडण्याचं बुद्धिसामर्थ्य आहे, असा विचार आम्ही केला. ‘टीम रोहन’पैकी रोहनने हा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. बोजेवारांनी थोडा विचार करून हे आव्हान स्वीकारलं. अधून-मधून चर्चा होत राहिल्या… त्यातून जन्म घेतला आजच्या काळातील डिटेक्टीव्हने… अर्थात अगस्तीने!

Pradeep Champanerkar photo

रहस्यकथांच्या निर्मितीला गेल्या काही वर्षांत पडलेल्या सीमांचं गेल्या दसऱ्याचं निमित्त साधून सीमोल्लंघन झालं आणि ‘रोहन-मोहर’ मुद्रा घेऊन ‘हरवलेलं दीड वर्षं’, ‘अंगठी १८२०’ आणि ‘न्यूड पेंटिंग @ 19’ या तीन पुस्तकांमधून बोजेवारांचा डिटेक्टीव्ह अगस्ती ‘इन अ‍ॅक्शन’ आला आहे. या अगस्तीची जीवनशैली पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळलेली असली तरी त्याची विचारपद्धती, मानसिकता निव्वळ भारतीय आहे. त्याच्या स्वतःच्या काही लकबी आहेत, तो आधुनिक आहे, त्याच्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली साधनं आहेत, तो फूडी आहे, सौंदर्याचा भोक्ता आहे आणि तो डॅशिंग आहे… पण या गोष्टी कथानकावर कुरघोडी करत नाहीत व पुस्तकात कथासूत्राचा प्रभाव असलेलं वाचताना जाणवतं. मला वाटतं, या पुस्तकांबाबत थोडं पुढे जाऊन म्हणायचं तर, त्या सस्पेन्स-थ्रिलर्स आहेत असं म्हणावं लागेल… या कथानकांची, त्याच्या मांडणीची गती पाहता…या पुस्तकांमुळे वाचक जोडला जावा, नवा वाचक निर्माण व्हावा, हा जो आमचा उद्देश आहे तो साधला जाईल असा विश्वास आहे. अल्पावधीत ‘अगस्ती’च्या पुढच्या कथाही येतील. यापूर्वी आम्ही जवळपास या प्रकारात मांडणाऱ्या ‘व्योमकेश बक्षी’, ‘फेलूदा’ या मालिका प्रसिद्ध केल्या आहेतच. आता पुढेही रहस्यकथांची आणखी काही पुस्तकं प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. त्यात जुने जाणते लेखक नारायण धारप यांची पूर्वीची काही लोकप्रिय पुस्तकंही आहेत. परंतु त्याचबरोबर असंही वाटतं की, लोकांना वाचनाकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने या साहित्यप्रकारात इतरांकडूनही पुस्तकं लिहिली जावीत व ती प्रसिद्ध होत राहावीत…
…२०२० साल हे करोनामय राहिलं. सुरुवातीला अनिश्चितता जाणवत होती. परंतु पुढे हे साल अडचणींचंच जाणार याची निश्चिती झाली. २०२१मध्ये काय होणार, हा ‘सस्पेन्स’ आहे… पाहू हा ‘अगस्ती’ या सस्पेन्समधून आपल्याला कसा सोडवतो ते!

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०


काळोखी रहस्य उगाजर करणाऱ्या
डिटेक्टिव्ह अगस्तीची खिळवून ठेवणारी ३ थ्रिलर्स!

Agasti-Set-Cover

अगस्ती इन अॅक्शन संच

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि अॅडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

360.00Add to cart


खिळवून ठेवणारी आणखी वाचनीय थ्रिलर्स!

Featured

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा रेड सेट

१२ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

 

० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला
० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य
० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अ‍ॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ
० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर1,140.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा – ‘ब्लॅक’ संच

४ कथासंग्रहात एकूण १२ रहस्यकथा


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी ‘फॅन्टॅस्टिक फेलूदा’ या रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

 

१. अनुबिसचं रहस्य + ३ कथा
२. चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा
३. टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा
४. केदारनाथची किमया + २ कथा560.00 Add to cart

व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच

४ पुस्तकांचा सप्रेमभेट संच


शरदिन्दु बंद्योपाध्याय
अनुवाद : अशोक जैन


दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!1,100.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा ग्रीन सेट

६ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

० दफनभूमितील गूढ ० गणेशाचे गौडबंगाल ० काठमांडूतील कर्दनकाळ
० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर570.00 Add to cart

फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा ब्लू सेट

६ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!570.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *