यशवंतरावांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पट
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेली आणि पुढे केंद्रात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ अशी सर्व महत्त्वाची खाती कार्यक्षमतेने सांभाळणारी एकमेव व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण. चव्हाण हे जसे मुरब्बी राजकारणी होते व संवेदनशील आणि जाणकार समाजकारणी होते, तसेच ते साहित्य, कला यांत रमणारे, त्याची जाण असणारे आणि साहित्यिक व कलावंतांविषयी मनात आदर बाळगून असलेले नेते होते.साल [...]