कलेचा आस्वाद कसा घ्यावा? (‘पेन’गोष्टी)

पुण्यात वेगवेगळ्या प्रकारचे वर्ग कायम सुरू असतात. जपानी केशरचनेपासून ते आफ्रिकन वेषभूषेपर्यंत, काश्मिरी खाद्यपदार्थांपासून ते केेरळच्या आरोग्यप्रसाधनापर्यंत आणि गच्चीतल्या बागेपासून ते घोड्यांच्या पागेपर्यंत सगळ्या गोष्टींचे ‘क्लास’ इथं घेतले जातात. मात्र, सध्या ‘कलेचा आस्वाद कसा घ्यावा?’ हा वर्ग घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयांत पुस्तकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत हजारेक सूचना लिहिलेल्या असतात. तरीही पुस्तकांचे कोपरे दुमडणं, [...]

येणे स्वरयज्ञे तोषावें… (‘पेन’गोष्टी)

लता मंगेशकर नावाचं सातअक्षरी स्वरपर्व आपल्या आयुष्यातून संपलं. असं कधी होईल याचा विचारही केला नव्हता. तसा विचार मनात आला तरी तो तातडीनं झटकून टाकला जायचा. लताच्या जाण्यानं आपलं नक्की काय नुकसान झालंय हे समजायला काही काळ जावा लागेल. सध्या तरी केवळ बधिरपणा आलाय. पंचेद्रियांना आत्ता काहीही ऐकायचं नाही, बघायचं नाही, पचवायचं नाही; कारण सोसवायचंच नाही. मन मोठं [...]

लेख झाला का? (‘पेन’गोष्टी)

दिवाळी अंकासाठी लेख लिहिणं हा तुम्ही लेखक आहात, या घटनेच्या असंख्य पुराव्यांपैकी एक महत्त्वाचा पुरावा असतो. दिवाळी अंकात लेख लिहिणं ही लेखक म्हणून ओळख होण्यातली एक कसोटी असेल, तर दिवाळी अंकासाठी तुमच्याकडे प्रकाशकाने लेख मागणं, हा लेखक म्हणून प्रस्थापित होण्यातला महत्त्वाचा मानदंड असतो. साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी [...]

बोल्ड अँड हँडसम (‘पेन’गोष्टी)

मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्या, की पूर्वी इतर सर्व उद्योगांसोबत हवी तेवढी पुस्तकं मनसोक्त वाचण्याचा एक कार्यक्रम असे. लायब्ररीतून सकाळी आणलेलं पुस्तक संध्याकाळी बदलून आणायला जायचो. ग्रंथपालकाका हसून विचारायचे, की अरे, खरंच वाचून झालंय का? पण पुस्तक एवढं आवडीचं असायचं, की ते खरोखर दिवसभरात वाचून व्हायचं. कधी दुसरं पुस्तक आणतो, असं होऊन जायचं. अगदी लहानपणापासून थरारक [...]

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

रात्रीची वेळ आहे... सगळा आसमंत शांत झोपला आहे... आपल्या श्वासाचं संगीत तेवढं ऐकू येतं आहे... आत शांत शांत वाटतं आहे... अशा वेळी शेजारचं आवडतं पुस्तक हाती घ्यावं... आधी त्यावरून हात फिरवून माया करावी... पानं चाळून जरा गुदगुल्या कराव्यात... मग एकदम मधलं कुठलं तरी पान उघडून खोलवर वास घ्यावा... त्या धुंदीत पुस्तक वाचायला सुरुवात करावी... आपल्या [...]

आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’

‘साहित्य क्षेत्र’ हे सर्जनशील जनांचं, मनांचं क्षेत्र. तेव्हा, या क्षेत्रातील संबंधितांच्या कल्पनाविलासाला खाद्य पुरवणं हे प्रत्येक साहित्यसंमेलनाचं जणू आद्य कर्तव्य होय. या खेपेस वादाचं कोणतं निमित्त घडेल, याविषयीचे अंदाज बांधण्यात सर्जनशील मनं कामाला लागली होती. पण एकतर ‘संमेलनाचे अध्यक्ष’ विनानिवडणूक, एकमताने ठरले आणि इतरही सर्व सुरळीतपणे चालू होतं. तेव्हा या खेपेस ‘विकेट’ मिळणं कठीण दिसतंय, [...]

बालवाङ्मयाच्या नाना कळा…

‘काय तो जमाना होता…’ ‘आमच्या वेळी असं नव्हतं हं…’ वगैरे वगैरे म्हणत आजच्या काळाला दुगाण्या देण्याची एक सर्वमान्य पद्धत आहे. पण खरं सांगायचं तर, त्या-त्या काळातलं एक प्रकारचं जगणं असतं. त्या जगण्यात काही अधिक, तर काही उणे असतंच. आता मुलांना पडलेल्या सुट्टीचाच विषय घ्या…. वार्षिक परीक्षेतून मुलं मोकळी झाली की, पूर्वी बैठे खेळ, मैदानी खेळ, [...]