लोककवी साहिर लुधियानवी

जनाभिमुख काव्य, गीतं व जीवनाचा मागोवा


अक्षय मनवानी
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है…’, ‘जिन्हे ना़ज है हिंद पर वो कहाँ है…’, ‘वो सुबह कभी तो आएगी…’, `तुम न जाने किस जहाँ मे…’, `मांग के साथ तुम्हारा… , `औरत ने जनम दिया मर्दों को…, `फैली हुई है…’, `आसमाँ पे है खुदा…’, `मन रे तू काहे ना धीर धरे…’, `संसार से भागे फिरते हो…’, ‘अल्ला तेरो नाम…’, ‘अभी न जाओ छोडकर…’, यासारखी चित्रपट-गीतं असोत किंवा ‘परछाइयाँ’, ‘ताज महल’, ‘तरहे-नौ’ यांसारख्या कविता आणि ‘तल्खियाँ’, ‘आओ कि कोई ख्वाब बुनें’ यांसारखे कवितासंग्रह असोत, साहिर आपल्या कवितांमधून गीतांचं सर्जन करत राहिले आणि आपल्या गीतांमधून कवितांची प्रतिभा प्रसवत राहिले. कधी त्यांनी सामाजिक वास्तवावर कठोर भाष्य केलं, कधी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगितलं, तर कधी स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधले विविध पदर हळुवारपणे उलगडून दाखवले.
या प्रतिभासंपन्न कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या जीवननिष्ठांचा, गीत-कवितांचा आणि लेखन प्रेरणांचा सूक्ष्म वेध लेखक अक्षय मनवानी यांनी या पुस्तकात घेतला आहे. तसंच अमृता प्रीतमसह अनेकांचा साहिर यांच्यावर कसा प्रभाव पडला याचा शोधही घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या प्रेरणास्रोतांचाही वेध घेतला आहे. अनेक संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन मनवानी यांनी विपुल संशोधन केलं आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक मिलिंद चंपानेरकर यांनी या पुस्तकाचा तितक्याच समर्थपणे मराठी अनुवाद साकारला आहे.
आपल्या काव्यप्रतिभेने रसिकांच्या मनात कायमचं घर केलेल्या एका मनस्वी कवीची ही जीवनगाथा… लोककवी साहिर लुधियानवी


400.00 Add to cart

नायरण धारप- संच एक

खिळवून ठेवणारी ३ पुस्तकं


नारायण धारप


विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणाऱ्या कथा – कादंबऱ्या

१. स्वप्न्मोहिनी 

२. बहुमनी

३. गोग्रमचा चितार 

400.00 Add to cart

समर्थांची ओळख


नारायण धारप


‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप

समर्थ मालिका

समर्थ कथा नव्या स्वरुपात !


 

400.00 Add to cart
Featured

सून मेरे बंधु रे

एस.डी. बर्मन यांचं जीवन-संगीत


सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगातील अग्रणी संगीतकार सचिन देव बर्मन यांना चित्रपटमाध्यमाची चांगली जाण होती;
गानदृश्य व्हिज्युअलाइज करण्याची आणि प्रसंगानुरूप गाणी स्वरबद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात होती.
त्यांच्या अशा वैशिष्ट्यांमुळेच ते इतर समकालीन संगीतकारांपेक्षा खचितच अधिक चतुरस्र व सदाबहार संगीतकार ठरू शकले.
अशा त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांचा शोधक नजरेने मागोवा घेणा‌र्‍या सत्या सरन लिखित मूळ इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी
केलेला हा अनुवाद– `सुन मेरे बंधु रे’.
`ये रात ये चाँदनी तू कहाँ’, `जलते है जिसके लिए’, `गाता रहे मेरा दिल’ ते `कोरा कागज था ये मन मेरा’ यांसारखी
असंख्य आनंददायी प्रणयगीतं… `वक्त ने किया क्या हंसी सितम’, `जाये तो जाये कहाँ’ यांसारखी अविस्मरणीय विरहगीतं…
`ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है’ सारखी सामाजिक रोष व्यक्त करणारी गीतं ते `वहाँ कौन है तेरा’, `सुन मेरे बंधु रे’ सारखी
त्यांनी स्वत: गायलेली या मातीतली व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली गाणी…
त्यांच्या संगीतातील वैविध्याची साक्ष देणारी अगणित गीतं आहेत, परंतु अशा त्यांच्या गीतांची निर्मितीप्रक्रिया उलगडून दर्शवणारं आणि त्यामागच्या प्रेरणास्रोतांचा कल्पकतेने वेध घेणारं हे एकमेवच पुस्तक ठरावं.एस.डी.बर्मन यांच्या संगीताचा व त्यांच्या बालपणापासूनच्या व्यक्तिजीवनातील प्रेरणास्रोतांचा अन्वय लावणारं, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं सांगणारं मराठी संगीत-रसिकांसाठी एक संग्राह्य असं पुस्तक `सुन मेरे बंधु रे…’



425.00 Add to cart

युद्धखोर अमेरिका


अतुल कहाते


देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटं…
एका खासगी कंपनीमार्पâत गिळंकृत केलेला हाँडुरस देश…
मुजाहिदींना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान…
व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार…
विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि इराकचं केलेलं ध्वस्तीकरण…
जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी
अमेरिकेने अनेक देशांमध्ये ढवळाढवळ केल्याची
अशी कितीतरी उदाहरणं देता येतील
— कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली,
कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला,
तर कधी थेट आक्रमणंच केली…
सुप्रसिद्ध लेखक अतुल कहाते यांनी अशा
‘अमेरिकापीडित’ १६ देशांच्या ‘केस स्टडीज’
अभ्यासपूर्णरीत्या या पुस्तकात मांडल्या आहेत.
त्याआधारे त्यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाचं विवेचन करून
परखड चिकित्सा केली आहे.
‘लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश’,
‘नशीब कमावण्याची स्वप्नभूमी’
अशी ओळख असलेल्या अमेरिकेची
आक्रमक बाजू समोर आणणारा पुस्तकरूपी दस्तऐवज…
‘युद्धखोर अमेरिका’!



425.00 Add to cart

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा

किल्लारी भूकंप..
तीस वर्षानंतरचा किल्लारी परिसर
पुनर्वसनाचा ताळेबंद

आपत्तीचक्राचा विळखा


अतुल देऊळगावकर


३० सप्टेंबर १९९३ची रात्र किल्लारी आणि परिसरातल्या रहिवाश्यांसाठी काळरात्रच ठरली! भूकंपांच्या हादऱ्यांनी काही क्षणांत होत्याचं नव्हतं झालं… जगाचं लक्ष वेधलं गेलं… काही तासांत तत्कालीन मुख्यमंत्र्यासह सगळं प्रशासन कामाला लागलं, मदतीचा ओघ सुरू झाला आणि नंतर ‘भव्य’ पुनर्वसनही झालं….

लेखक, पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी या भूकंपानंतर झालेलं बचतकार्य, मदतकार्य, पीडितांची अवस्था, त्यांची मानसिकता आणि पुनर्वसनाची प्रक्रिया अशा अनेक गोष्टी या पुस्तकात सविस्तर चित्रित केल्या आहेत. तसंच किल्लारी भूकंपाला आता काही वर्षं झाल्यानंतर तिथल्या पुनर्वसनाच्या स्थितीचाही चिकित्सक लेखाजोखा मांडला आहे.

या निमित्ताने देऊळगावकर यांनी आपत्ती ही दैनंदिन घटना झालेल्या आजच्या काळात जोखीम निवारण व उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यासाठी सूत्ररूप सुचवण्या केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक केवळ किल्लारीपुरते मर्यादित राहत नाही, तर आपल्याला आपत्ती व्यवस्थापनाकडे एका व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून पाहायला लावते.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची निकड अधोरेखित करणारं, डोळ्यांत अंजन घालणारं पुस्तक….

आपत्तीचक्र… बोध किल्लारी भूकंपाचा!



 

430.00 Add to cart

थोरा-मोठ्यांचं बालपण संच

३ पुस्तकांचा संच


डॉ.गणेश राउत /उल्का राउत


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा…

३ पुस्तकांचा संच

कलामांचं बालपण

अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि आध्यात्मिक प्रवृत्ती…

एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक…

थोरांचं बालपण

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

आमचं बालपण

या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.



440.00 Add to cart

फिटनेस सेट

(आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं)



आजकालच्या जीवनात ‘फिटनेस’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन ‘फिट’ ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं…
1. चाला…’फिट’ राहा
लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस
चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन
2. वयावर मात – नैसर्गिक उपायांनी
लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ
मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय
3. हृदय-स्वास्थ्य – आहार व आरोग्य
लेखक : जी.पद्मा विजय
हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.
4. पाठदुखी विसरा…
लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग
तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन


Original price was: ₹600.00.Current price is: ₹450.00. Read more

सरदार वल्लभभाई पटेल

भारताचा पोलादी पुरूष


बलराज कृष्णा
अनुवाद : भगवान दातार


“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
-वल्लभभाई पटेल

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
सुप्रसिद्ध व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.



450.00 Add to cart

प्रज्ञावंत संच

मानवी जीवन समृद्ध करणारे


अरविंद वैद्य


गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले
ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन
मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं.
अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी,
त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’


450.00 Add to cart

वाचा जाणा करा

९ पुस्तकांचा संच


कविता महाजन


सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी

नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट

यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी

आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती

इ. गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.

मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून

प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.

मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या

आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!



450.00 Add to cart

साऊथ ब्लॉक दिल्ली

शिष्टाईचे अंतरंग- परराष्ट्र व्यवहार आणि मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा वेध


विजय नाईक


देशा-देशांतील संबंध जोपासण्यासाठी, वाद मिटवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी, व्यापार-वृध्दीसाठी, जटिल प्रश्नांची उकल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘डिप्लोमसी’ला अर्थात शिष्टाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याला अनुसरून अनेक भारतीय राजदूत, अधिकारी, नेते आणि मंत्री आपलं कसब पणाला लावत असतात. मात्र, याबाबतचे तपशील गोपनीयतेच्या आवरणामुळे सामान्यजनांपर्यंत पोहोचत नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं राजधानी दिल्लीत गेली पंचेचाळीस वर्षं वास्तव्य आहे. अनेक अधिकृत परदेशी दौर्‍यामध्ये पत्रकार म्हणून केलेलं प्रतिनिधित्व व या वर्तुळातील वावर यांतून आलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अभ्यास या सर्वांतून त्यांनी साकार केलेल्या या पुस्तकाद्वारे ही कसर भरून निघत आहे.
नाईक यांनी या पुस्तकात दिल्लीतील ‘चाणक्यपुरी’, ‘शांतिपथ’ येथील विविध देशांच्या वकिलाती, दूतावास यांबद्दल ‘क्लोज-अप’ साधणारी माहिती दिली असून पं. नेहरूंनी घातलेल्या परराष्ट्र धोरणाचा पाया, यशवंतराव चव्हाण यांचं योगदान, गुजराल सिध्दान्त यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेतला आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरीच्या नाना तऱ्हांची सविस्तर माहिती दिली असून या क्षेत्रात मराठी व्यक्तींनी केलेल्या भरीव कामगिरीचाही आढावा घेतला आहे.
राजदूत, सचिव, राजकीय नेते व मंत्री आदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, भारत-अमेरिका, भारत-रशिया व इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधांवर अनुभवी नेते व राजदूत यांनी केलेलं भाष्य या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. तसंच या क्षेत्रातले काही गंभीर, तर काही हलके-फुलके मजेशीर प्रसंगही सांगितले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, स्वातंत्र्योत्तर काळातील मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा विविधांगी मागोवा घेणारं मराठीतील किंबहुना हे पहिलंच पुस्तक – साउथ ब्लॉक, दिल्ली – वाचकांना एका वेगळया विश्वाचं अंतरंग उलगडून दाखवेल, हे निश्चित!


450.00 Add to cart

Travails of 1857

A Translation of Vishnubhatji Godse’s Majha Pravas


Vishnubhatji Godse
अनुवाद: Sukhmani Roy


Travails of 1857 is a unique literary masterpiece of great socio-historic significance that portrays the eyewitness saga of the trials and tribulations of 1857 from an observant, informed Indian perspective. The extent of Vishnubhatji’s direct involvement in it remains under wraps but the strange combination of compelling candidness and vague disjointedness off the narrative invites the readers to read between the lines and explore the unspelt-out aspects of the saga.

Praise for the book:

Sukhmani Roy’s translation of this landmark Marathi text is informed by her familiarity with the many conceptual issues raised by translation theorists in recent times.
Travails of 1857 is extensively footnoted to bring out the nuances of Brahmin modes of living in 19th century Western India. The detailed history of Varsai and the Godse family gives us a social context in which to place the travelogue. Sukhmani claims that she has sacrificed stylistic smoothness for precision, alluding to the enormous difficulty of translating cultural references.
Clearly her translation is all the more rigorous because of the layering she has done, which gives newcomers to the famous ‘Majha Pravas’ additional social and cultural texture to enhance the reading experience.

– Tejaswini Niranjana


450.00 Read more
SaleFeatured

राज कपूर- दि मास्टर अॅट वर्क


मूळ लेखक: Rahul Raival

अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


राहुल रैवल हे माझ्या वडलांचे घनिष्ट मित्र, माझे आवडते दिग्दर्शक आणि माझे आजोबा राज कपूर यांचे साहाय्यक-दिग्दर्शक. माझ्या आजोबांनी त्यांच्या अल्पशा पण दर्जात्मकदृष्ट्या श्रेष्ठ अशा जीवनकालात कोणता अनमोल कलात्मक वारसा मागे ठेवला आहे, याची जाणीव या पुस्तकाने मला करून दिली.

-रणबीर कपूर

राज कपूर यांच्या अवघ्या प्रतिभेची उकल करून दाखवणारं हे पुस्तक आहे. त्यांच्या चित्रपटांतील गीतं गाण्याचा बहुमान मला लाभला होता. त्यांची संगीताची सखोल समज आणि त्यांचं त्याबाबतचं आकलन असं सर्व मला नेहमीच अचंबित करत असे. गाणं कसं चित्रित केलं जाणार आहे आणि त्यांच्या गाण्याबाबत काय अपेक्षा आहेत, हे सर्व ते एक दिग्दर्शक या नात्याने अत्यंत खोलात जाऊन आम्हाला समजावून सांगत असत.

-लता मंगेशकर

राज कपूर यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, त्यांचे चित्रपट आणि त्यांचं स्वतःचं एक विश्व याबाबत विस्मयकारक अंतर्दृष्टी देणारं असं हे पुस्तक… आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तीनेच ते लिहिलेलं असल्याने ते वाचताना खिळवून ठेवतं.

-राजकुमार हिरानी

मला राहुल रवैल यांचा हेवा वाटतो… हे पुस्तक वाचल्यावर मला असं वाटून गेलं की, ‘मूव्ही मसीहा’ राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मला आयुष्यात एकदा तरी मिळायला हवी होती. त्यांच्या आजूबाजूला राहिल्यानेच समृद्ध करणारे त्यांचे गुण, त्यांची उत्कटता राहुलजी आत्मसात करू शकले. राहुलजींच्या या प्रवासात जरूर सहभागी व्हा. मला खात्री आहे की, तुम्हीही माझ्यासारखाच आनंद अनुभवाल.

-रमेश सिप्पी

केवळ चित्रपट निर्माते किंवा चित्रपट माध्यमाचे विद्यार्थी यांच्यासाठीच नव्हे, तर ज्या कुणाला सर्जनशीलतेच्या क्षेत्रात खोलवर बुडून बारकावे समजून घ्यायचे असतील, त्या सर्वांसाठी हे एक ‘मास्टर क्लास’ पुस्तक ठरतं. मला या पुस्तकाने खिळवून ठेवलं.

-इम्तियाज़ अली



 

Original price was: ₹595.00.Current price is: ₹450.00. Add to cart

द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट

क्रिकेट या सुसंस्कृत खेळाबरोबर असलेलं माझं आजन्म प्रेमप्रकरण
_______________________________________________________________________

रामचंद्र गुहा
अनुवाद  : अजेय हर्डीकर


भारतात गल्ली-बोळांत, छोट्या-मोठ्या मैदानांत उपलब्ध साधनांद्वारे क्रिकेट खेळलं जातं आणि हा खेळ पाहणारेही जागच्या जागी थबकून, जीव ओतून तो पाहत असतात; इतका क्रिकेट हा खेळ भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे!

क्रिकेटचा चाहता आणि काही वर्ष स्थानिक क्रिकेट खेळलेला एक खेळाडू या नात्याने ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास आत्मकथनपर शैलीत या पुस्तकात सांगितला आहे.

क्रिकेट हे त्यांचं प्रेमप्रकरण आहे, असं सुरुवातीलाच सांगून ओघवत्या व सहज-सुंदर शैलीत त्यांच्या बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी, तेव्हाचे स्थानिक, राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे ‘हिरो’ खेळाडू, त्यांची बलस्थानं आणि मर्यादा यांबद्दल ते कथन करतात. तसंच शालेय, कॉलेज, क्लब, राज्य आणि देश अशा सर्व पातळ्यांवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचं महत्त्वही ते पुस्तकात आवर्जून विशद करतात.

पुस्तकातील शेवटच्या भागात भारतीय क्रिकेट बोर्डाच्या नियामक मंडळामध्ये नियुक्त प्रशासक म्हणून काम करताना आलेले अनुभव परखडपणे मांडून ते आजच्या बदललेल्या क्रिकेट-संस्कृतीची चिकित्साही करतात.

क्रिकेट खेळावर निस्सीम प्रेम करणाऱ्या विचारवंत इतिहासकाराचं क्रिकेटच्या आठवणींना उजाळा देणारं आणि वाचकालाही त्या काळाची सफर घडवून आणणारं प्रांजळ कथन… द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेट!

450.00 Add to cart
1 34 35 36 39