₹300.00
अनलॉक संच
जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती
पुण्यातील ख्यातनाम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक म्हणून डॉ. धनंजय केळकर प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.एस. (जनरल सर्जरी) पूर्ण केलं. नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई इथे कर्करोग शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं. त्यांना जपानमधल्या कुरुमे विद्यापीठातर्फे थोरॅसिक कर्करोगात संशोधनाकरता अभ्यासवृत्ती मिळाली होती. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातून त्यांनी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण घेतलं असून ते लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. सध्या ते वरिष्ठ ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे.
याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.
डॉ. विजया फडणीस यांचा जन्म १३ ऑगस्ट १९५३, रोजी नागपूर येथे झाला असून त्यांनी नागपूर विद्यापीठ, नागपूर येथून १९७५ साली एम. ए. (मानसशास्त्र) तसंच १९८३ साली प्रथम श्रेणी प्रथम क्रमाकांत पीएच.डी. केली आहे. त्यांनी नागपूर महाविद्यालय, नागपूर, व आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथे काही काळ मानसशास्त्राचे अध्यापन केलं. त्यांचा यशवंत मनोविकास केंद्राच्या माध्यमातून समुपदेशक, मानसतज्ज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय आहे.
त्यांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून तसेच नियतकालिकं, दिवाळी अंकांमधून विपुल ललित तसंच मानसशास्त्रीय लेखन केलं आहे. त्यांचे गुजराथी साहित्य व संस्कृतीविषयक अनेक लेख व अनुवाद प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी बुद्धिमापन, अभिक्षमता तसंच व्यक्तिमत्त्व चाचण्यांद्वारा मनोमापन, मुलांच्या अभ्यास, वर्तन आणि व्यक्तिमत्त्व समस्यांवर समुपदेशन व करिअर मार्गदर्शन, अभ्यास कौशल्यं, विवाहपूर्व आणि विवाहोत्तर समुपदेशन, स्वभावदोषांवर पुष्पौषधी उपचार, प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन केलं आहे. तसंच त्या विविध मंचांवरून आणि आकाशवाणीवरून व्याख्यानं आणि मुलाखती देत असतात. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
मुलांचा विकास, शिक्षण, पालकत्त्व या क्षेत्रांत कार्यरत रेणू दांडेकर कार्यरत असून या विषयांबद्दल त्यांनी दैनिकांमधून विपुल लेखन केलं आहे. शहरातून चिखलगावसारख्या खेड्यात जाऊन त्यांनी शिक्षणाचा वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे त्यांनी शिक्षणातली सहजता, नैसर्गिकता जपण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या शाळेची स्थापना केली आहे.
डॉ. समीर जोग हे दीनानाथ हॉस्पिटल, पुणे येथे अतिदक्षता विभागाचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ' इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केयर मेडिसिन' या जर्नलचे ते सहसंपादक आहेत. 'युरोपियन सोसायटी ऑफ इंटेन्सिव्ह केयर' या संस्थेचं आजीव सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं आहे.
‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…
दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…
१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ.धनंजय केळकर, डॉ.समीर जोग
२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ.लिली जोशी
३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ.विजया फडणीस
४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर
पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…
मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…
Reviews
There are no reviews yet.