अनुभवी डॉक्टरांचं सर्वसामान्यांना मार्गदर्शन
पुण्यातील ख्यातनाम दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक म्हणून डॉ. धनंजय केळकर प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुण्यातील बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एम.एस. (जनरल सर्जरी) पूर्ण केलं. नंतर टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई इथे कर्करोग शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं. त्यांना जपानमधल्या कुरुमे विद्यापीठातर्फे थोरॅसिक कर्करोगात संशोधनाकरता अभ्यासवृत्ती मिळाली होती. इस्रायलच्या तेल अवीव विद्यापीठातून त्यांनी लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचं विशेष प्रशिक्षण घेतलं असून ते लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जनच्या हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे व्हिजिटिंग प्रोफेसर आहेत. सध्या ते वरिष्ठ ऑन्कोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. समीर जोग हे दीनानाथ हॉस्पिटल, पुणे येथे अतिदक्षता विभागाचे प्रमुख सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ' इंडियन जर्नल ऑफ क्रिटिकल केयर मेडिसिन' या जर्नलचे ते सहसंपादक आहेत. 'युरोपियन सोसायटी ऑफ इंटेन्सिव्ह केयर' या संस्थेचं आजीव सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं आहे.
शास्त्रीय माहितीच्या आधारे लोक प्रबोधन न झाल्याने, आज समाजात दोन प्रकारचे गट आढळून येतात : एक करोनामुळे `पॅनिक’ झालेले लोक आणि दुसरे आपल्याला काही होत नाही, असं म्हणत निष्काळजीपणा करणारे लोक. म्हणूनच या पुस्तकात पुढील बाबींविषयी नेमकं शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं आहे…
+ संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी
+ मास्कचं महत्त्व + हातांची स्वच्छता + फिजिकल डिस्टन्सिंगचं महत्त्व + रोगनिदान व तपासण्या
+ प्रमुख लक्षणं + होम आयसोलेशनची नियमावली + हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं?
+ उपचार + लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? + प्लंबर, कॅब / रिक्षाड्रायव्हर, सलून कामगार इत्यादींनी कोणती काळजी घ्यावी?
+ रोजचे व्यवहार करताना मनात येणाऱ्या शंकांचं निरसन…
`न्यू-नॉर्मल’ जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास देणारं… थोडक्यात करोनाविषयीची आवश्यकती सगळी माहिती देणारं पुस्तक… ‘करोना’सोबत जगताना…