439 | 978-93-89458-17-6 | Corona Sobat Jagtana | करोना सोबत जगताना | अनुभवी डॉक्टरांचं सर्वसामान्यांना मार्गदर्शन | Dr. Dhananjay Kelkar | Dr. Sameer Jog | डॉ. धनंजय केळकर | डॉ. समीर जोग | शास्त्रीय माहितीच्या आधारे लोक प्रबोधन न झाल्याने, आज समाजात दोन प्रकारचे गट आढळून येतात : एक करोनामुळे `पॅनिक’ झालेले लोक आणि दुसरे आपल्याला काही होत नाही, असं म्हणत निष्काळजीपणा करणारे लोक. म्हणूनच या पुस्तकात पुढील बाबींविषयी नेमकं शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं आहे…
संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी, मास्कचं महत्त्व, हातांची स्वच्छता, फिजिकल डिस्टनसिंगचं महत्त्व, रोगनिदान व तपासण्या, प्रमुख लक्षणं, होमआयसोलेशनची नियमावली, हॉस्पिटलमध्ये केव्हा भरती व्हावं?, उपचार, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?, प्लंबर, कॅब / रिक्षाड्रायव्हर, सलून कामगार इत्यादींनी कोणती काळजी घ्यावी?, रोजचे व्यवहार करताना मनात येणाऱ्या शंकांचं निरसन… `न्यू-नॉर्मल’ जीवन जगण्यासाठी आवश्यक तेवढा आत्मविश्वास देणारं… थोडक्यात करोनाविषयीची आवश्यकती सगळी माहिती देणारं पुस्तक… ‘करोना’सोबत जगताना… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 70 | 18.5 | 10.8 | 0.6 | 60 | Health | आरोग्य | 70 | CoronasobatJagtanacover | Corona sobat jagtanaBC.jpg |
बहुगुणी वनौषधी
हरी कृष्ण बाखरू
अनुवाद :डॉ. अरुण मांडे
अनेक वनस्पतींमध्ये (Herbs) विविध औषधी गुणधर्म असतात, शरीराची झीज भरून काढण्याची क्षमता असते. तसेच बर्याचशा आधुनिक औषधांचा मूलस्रोत वनस्पतींमध्ये असतो, हे सर्वचजण जाणतात. परंतु त्याची शास्त्रशुध्द मांडणी करणे व जनसामान्यांना
नेमकी माहिती देणे, हे कार्य निष्णात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू सातत्याने करीत आहेत. अनेक व्याधींवर वनौषधी गुणकारी कशा ठरू शकतात याबद्दलची माहिती बाखरू यांनी या पुस्तकात दिली आहे. या वनौषधी सहजपणे उपलब्ध होतात आणि काही तर आपल्या स्वयंपाकघरातच असतात. एकूण शंभरच्यावर उपयुक्त वनौषधींची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. विविध वनस्पतींचे गुणधर्म, त्यांची शास्त्रीय माहिती, झीज भरून काढण्याची त्यांची क्षमता, या वनस्पतींची मात्रा कोणकोणत्या व्याधींवर चालू शकते; याविषयीचे विस्तृत विवेचन या पुस्तकात उपलब्ध होते. उत्तम आरोग्य राखण्यासाठी वनौषधींद्वारे नैसर्गिक उपाय सुचवणारे हे पुस्तक घराघरात पोहोचावे ही अपेक्षा.
Reviews
There are no reviews yet.