डॉ. लिली जोशी

डॉ. लिली जोशी या एम.डी. मेडिसिन आहेत. ज्या काळात ‘लेडी फिजिशियन’ म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हतं तेव्हापासून म्हणजे १९७६पासून त्यांनी स्वतंत्र वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा स्वभाव शांत आणि व्यक्तिमत्त्व हसतमुख असून दुसऱ्याचं ऐकून घेण्याची त्यांची वृत्ती आहे. रुग्णांना बरं वाटावं अशी त्यांची आंतरिक तळमळ असल्याने आणि औषधोपचारांपेक्षा जीवनशैली सुधारण्यावर त्यांचा भर असल्याने यातूनच त्यांनी आरोग्यविषयक लेखनाची सुरुवात केली. त्यांनी रुग्णांसाठी मधुमेह, रक्तदाब, अॅगनिमिया, थायरॉइड विकार अशा अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसंच व्यायामाचं महत्त्व कृतीतून सांगणारा ‘वॉक विथ डॉक’ हा टेकडीवरचा उपक्रम आणि अशा अनेक अभिनव गोष्टींचं आयोजन केलं आहे.
याचबरोबर संस्कृत हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी अलीकडे त्यांनी संस्कृत साहित्यात बी.ए., एम.ए. आणि पी.एच.डी. या पदव्या विशेष गुणवत्तेसह प्राप्त केल्या आहेत. ट्रेकिंग, जिमिंग, शास्त्रीय संगीत, वाचन, लेखन या गोष्टींची त्यांना मनापासून आवड आहे.

लेखकाची पुस्तकं

डॉ. लिली जोशी लिखित ५ पुस्तकांचा संच


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


१) पर्यटन एक संजीवनी  = रु २००

२)  प्रतिकार शक्ती कशी वाढवाल = रु ७०

३) तुमच्या आमच्या लेकी  = रु १८०

४) आनंदी शरीर आनंदी मन = रु २५०

५) इन द लॉन्ग रन  = रु २५०


रु. ९४० ची पुस्तकं सवलतीत रु.६४०  (टपाल खर्चासह) घरपोच मिळवा!


 

 

640.00 Add to cart

इन द लॉंग रन

पाळण्याच्या नियोजनबद्ध व्यायामासाठी शास्त्रीय मार्गदर्शन


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]

 


दिवाळीत फराळाचं खाऊन वाढलेलं वजन उतरवण्यासाठी,
की प्रेग्नंसीनंतर पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी
की आपला बेस्ट फ्रेन्ड सांगतोय म्हणून केवळ….नक्की कशासाठी रनिंग सुरु करता आहात तुम्ही? याचं  उत्तर जर, “मला आता पुढच्या आयुष्यात कायमच फिट राहायचं  आहे आणि रनिंग माझ्या जीवनशैलीचा भाग बनवायचा आहे” असं असेल तर…  मिलाओ हाथ!
मग हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उत्तम दिशा दाखवेल. काय आहे पुस्तकात?१. आजच्या काळातला रनिंग फिव्हर
२. रनिंगसाठी लागणारी साधन-सामग्री, आहार आणि गॅजेट्स
३. रनिंग दरम्यान शरीर रचनेत घडणारे बदल
४. रनिंगला सुरुवात कशी करावी? वॉर्म-अप, स्ट्रेचिंगचे व्यायाम कोणते?
५. रेस किंवा मॅरेथॉनसाठी लागणारी मानसिक आणि शारीरिक तयारी
६. दुखापती टाळण्यासाठी तज्ज्ञांचं  मार्गदर्शन
७. अनुभवी रनर्सचे जिवंत अनुभव आणि इतर बरच काही..रनिंगच्या विश्वात A  पासून Z पर्यंत तुमची बाराखडी लखलखित करणारं आणि दस्तूरखुद्द एका नामांकित डॉक्टरने लिहिलेलं इन द लॉन्ग रन उपयोगी पडणारं  पुस्तक…. इन द लॉन्ग रन!


250.00 Add to cart

अनलॉक संच

जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती


[taxonomy_list name=”product_author” include=”374,531,390,392,520″]


‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…

दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…

 

१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ.धनंजय केळकर, डॉ.समीर जोग

२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ.लिली जोशी

३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ.विजया फडणीस

४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर

पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…

मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…


300.00 Add to cart

आनंदी शरीर आनंदी मन

बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’



300.00 Add to cart

कोवळ्या आई बाबांसाठी

नवख्या पालकांसाठी आधुनिक पध्दतीचं परिपक्व बालसंगोपन


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


झटपट शिक्षण…झटपट नोकरी…झटपट लग्न…आणि झटपट पोरं-बाळं! थांबा… सर्वच झटपटच्या या जमान्यात मूल होऊ देण्याचा निर्णय मात्र असा झटपट नाही हं घेतला जात. आजची तरुण पिढी विचारपूर्वक आणि सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेताना दिसते. मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात माहितीचं ज्ञान कितीही पालथं घातलं तरी अनुभव तर पहिलाच असतो ना? म्हणूनच आजच्या कोवळया आणि नवख्या आई-बाबांसाठी डॉ. लिली जोशी यांचं हे पुस्तक म्हणजे हसत खेळत मार्गदर्शन करणारा आणि पालकत्वाच्या जबाबदारीची ओढ निर्माण करणारा एक आनंददायी अनुभवच आहे.
आजकालच्या प्रेग्नन्सीचे वेगवेगळे फंडे, प्रसूतीचे विविध प्रकार, आईच्या दुधाचं महत्त्व, बाळाची झोप-अंघोळ, त्याचे कपडे, त्याचा आहार, त्याचे ताई-दादा, बाळाच्या संगोपनामधला बाबांचा सहभाग, बाळाचं पाळणाघर, दत्तक घेतलेल्या मुलाचं संगोपन…अशा बाळाशी निगडित सर्व कळीच्या मुद्दयांवर लेखिकेने सहज सुंदर मार्गदर्शन केलं आहे. या पुस्तकात पारंपरिक चाली-रीती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची सुंदर सांगड घातलेली आपल्याला दिसेल.
… नवरा-बायकोच्या नात्यातून आई-बाबांच्या भूमिकेत पदार्पण करणार्‍या सर्व कोवळया आई-बाबांसाठी!


125.00 Add to cart

तुमच्या आमच्या लेकी

त्यांचं आरोग्य…त्यांच्या समस्या मनमोकळ्या संवादातून सहज-सोपं समुपदेशन


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


आरोग्य-समस्या घेऊन येणारा पेशंट अनेक वेळा मानसिक दडपणाखाली असतो.
त्याच्या आरोग्य-तक्रारींचं मूळ कारण ही दडपणं तर नसावीत?
अशी शक्यता लक्षात घेऊन डॉ. लिली जोशी आपल्या पेशंटशी संवाद साधता साधता त्याचा विश्वास संपादन करतात आणि पेशंट त्यांच्यापाशी मन मोकळं करतो.
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक समस्या सांगतो…आणि `डॉक्टर’ लिली जोशी यांच्याकडे येणार्‍या तरुणींसाठी किंवा रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रियांसाठीही त्या `लिलीताई’ होऊन जातात ! आरोग्य समस्यांचं मूळ कोठे आहे, याचा या डॉक्टरताना नेमका ठावठिकाणा लागतो.
वैद्यकीय उपचारांबरोबर केलेलं नेमकं समुपदेशन
लागू पडतं आणि या स्त्रिया शरीराने व मनाने तंदुरुस्त होऊन आयुष्याला भिडायला, आनंदी जीवन जगायला मोकळ्या होतात…!
डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या खास शैलीत असे विविध अनुभव बोलक्या कहाण्यांच्या स्वरुपात या पुस्तकात शब्दबद्ध केले आहेत. हे अनुभव वाचकांना एक प्रकारचं सामाजिक भान तर देतीलच पण त्याचबरोबर स्वत:च्या समस्यांची उत्तरंही देऊन जातील !
आजच्या जीवनात अनेक आघाड्यांवर सामना करणार्‍या, धडपडणार्‍या, अडखळणार्‍या तरुणींना, स्त्रियांना मार्गदर्शन करणार्‍या या…तुमच्या-आमच्या लेकी!


180.00 Add to cart

पर्यटन एक संजीवनी

अनुभव देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा…


[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


वैद्यकीय व्यवसाय करत असतानाच डॉ. लिली जोशी यांनी विलक्षण आंतरिक ओढीने प्रवासाचा छंद अनेक वर्षं जपला आहे. मात्र हा प्रवास म्हणजे ठरावीक पध्दतीने, ठरावीक ठिकाणीच केलेला प्रवास नव्हे. थोडी ‘हटके’ ठिकाणं पाहण्याकडे त्यांचा कल असतो. उदाहरणच द्यायचं झाल्यास गाडीने केलेली स्कॉटलंडमधली भटकंती, रेडवूडच्या जंगलातली सफारी, महाकाय व्हिक्टोरिया फॉल्सला दिलेली भेट… आणि ग्रीस व इजिप्तसारख्या लोकप्रिय तरीही वैशिष्टयपूर्ण ठिकाणी केलेलं पर्यटन… पुस्तकात असलेली अशी विविधता वाचकाला वेगळी अनुभूती देत खिळवून ठेवते.
मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ प्रवासवर्णन नक्कीच नाही. पुस्तकातील ‘गुगल’ किंवा ‘हार्वर्ड स्कूल’सारख्या व्यावसायिक स्थळांच्या भेटीतील अनुभव, चीन किंवा दक्षिण आफ्रिकेच्या सहलीमधल्या अनुभवांची वर्णनं त्या त्या देशातील आर्थिक व सामाजिक पैलूंवरही प्रकाश टाकतात. याचबरोबर काला पत्थर, अन्नपूर्णा बेसकँप, योसेमिटी इ. ट्रेकमधले थरारक अनुभव अंगावर अक्षरश: काटा उभा करतात. या अनुभवांबरोबरच लेखिकेने एक डॉक्टर म्हणून पर्यटनासाठी लागणाऱ्या फिटनेसबाबतही पुस्तकात चर्चा केली आहे.
पर्यटनातील अनुभव आपलं आयुष्य अनेक प्रकारे समृध्द करतात. नवनवीन भटकंती रोजच्या आयुष्यातला तोचतोचपणा नाहीसा करून नवा जोम, नवा उत्साह निर्माण करते. थोडक्यात काय तर, पर्यटन म्हणजे आयुष्यातला तेजस्वी सूर्यप्रकाश, चेतना देणारी संजीवनी… अर्थात् पर्यटन एक संजीवनी!




200.00 Add to cart

प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?

[taxonomy_list name=”product_author” include=”390″]


‘पुढील काही काळ तरी करोना या विषाणूसह आपल्याला जगावं लागणार आहे…’ अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणंयाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण यशस्वीरित्या या विषाणूला लांब ठेऊ शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढीचे अनेक मार्ग यात सांगितले आहेत, अगदी नेमकेपणाने आणि सहजसोप्या शब्दांत… करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयोगी पुस्तक…प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?


70.00 Add to cart