गेम चेंजर संच

तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून मानवी जीवन बदलून टाकणारे… गेम चेंजर


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


सत्य नडेला
मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.

सुंदर पिचई
गुगलचं भविष्य
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक.


370.00 Add to cart

कलामांचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”510″]

अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”421″]


जैनुलब्दीन आणि आशियाम्मा या दांपत्याने १५ ऑक्टोबर १९३१ रोजी भारताला एक ‘रत्न’ दिलं. भारताचं नाव रोशन करणारं हे रत्न म्हणजेच
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे राष्ट्रपती !
अतिशय लाडक्या अशा या व्यक्तिमत्त्वाचं बालपण या पुस्तकात रंगवलं आहे, त्यांचे निकटचे सहकारी सृजनपाल सिंग यांनी.
अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,
आई-वडिलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासावृत्ती, कष्टाळू वृत्ती,
स्वप्न पूर्ण करण्याचा असलेला ध्यास आणि आध्यत्मिक प्रवृत्ती…
बालपणीच्या किश्यांमधून डोकावणारे त्यांच्या स्वभावातील
हे सर्व पैलू आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरू शकतात.
त्यामुळे सर्व ‘छोट्यांनी’ अगदी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.
एका तपस्वी संशोधकाच्या बालपणीच्या अनुभवांचं विश्व उलगडून दाखवणारं…
कलामांचं बालपण !



150.00 Add to cart

प्रज्ञावंत संच

मानवी जीवन समृद्ध करणारे


[taxonomy_list name=”product_author” include=”581″]


गेल्या काही शतकांत असे अनेक `प्रज्ञावंत’ होऊन गेले
ज्यांच्या मूलभूत स्वरूपाच्या कार्यामुळे विविध क्षेत्रांचा विविधांगी विकास होऊन
मानवी जीवन अनेक अंगाने समृद्ध होत गेलं.
अशा काही भारतीय आणि परदेशी महान व्यक्तिमत्त्वांचं योगदान सांगणारी,
त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारी ही व्यक्तिचित्रणं…अर्थात `प्रज्ञावंत १ व २!’


450.00 Add to cart

सरदार वल्लभभाई पटेल

भारताचा पोलादी पुरूष


[taxonomy_list name=”product_author” include=”428″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]


“सततची भीती तुम्हाला सौम्य बनवते.
सौम्यपणा हा गुण आहे; पण त्याच्या अतिरेकाने
तुम्ही एवढे नेभळट बनता की, अन्यायाशी
लढण्याची उर्मीच तुमच्याजवळ उरत नाही.
व्यापक अर्थाने यालाच भित्रेपणा म्हणतात.”
-वल्लभभाई पटेल

सरदार पटेल म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि स्वतंत्र भारताच्या उभारणीतील एक कणखर व्यक्तिमत्त्व! देशातील ५६५ संस्थानं विलीन करून घेऊन सामर्थ्यशाली एकसंध भारत उभा करणं हे पटेलांचं महत्त्वाचं योगदान म्हणता येईल.
सुप्रसिद्ध व जेष्ठ पत्रकार बलराज कृष्णा यांनी या पोलादी पुरुषाचा संपूर्ण जीवनपटच अत्यंत ताकदीने या पुस्तकाद्वारे उभा केला आहे. पटेलांचं बालपण, त्यांचा राजकारणातला प्रवेश, गांधीजींबद्दलची त्यांची आस्था, नेहरूंसोबतचं त्यांचं मित्रत्वाचं नातं तसंच त्यांच्यासोबतचे मतभेद, संस्थानिकांबरोबरच्या वाटाघाटी व संस्थानांचं यशस्वी विलीनीकरण, पटेलांचे राजकीय विचार व त्यांनी वेळोवेळी घेतलेले ठाम व कठोर निर्णय, त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले विविध पैलू असा या पुस्तकाचा मोठा आवाका आहे.
एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटेलांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व व कार्य-कर्तृत्व उलगडून दाखवणारं हे चरित्र वाचकांना निश्चितच रोमहर्षक व प्रेरणादायी वाटेल.



450.00 Add to cart

कस्तुरबा : शलाका तेजाची


[taxonomy_list name=”product_author” include=”346″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]


महात्मा गांधी व कस्तुरबा या दोघांनी मिळून अहिंसात्मक चळवळीचा पाया घातला आणि दोघांनी तिला वाहून घेतले. या अलौकिक स्त्रीला कोणताही अडथळा थोपवू शकत नसे. हे पुस्तक म्हणजे महात्मा आणि कस्तुरबा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांच्या आयुष्यभराच्या संशोधनाचे फळ आहे. एका देशाच्या जन्मामागील ऐतिहासिक घटना यात आहेत. तशीच ही एक मुग्ध प्रेमकहाणीही आहे. आजपर्यंत गांधींच्या चरित्रकारांनी त्यांच्या सर्वश्रुत आख्यायिकेवर आधारून लेखन केले आहे. हे चरित्र ही या दोन मानवी जीवांची अस्सल कहाणी आहे. प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करून राहिलेले दोन महान जीव !



195.00 Add to cart

त्या दहा वर्षांतील गुरु दत्त

अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या जीवनातील सर्जनशील क्षणांचा आणि दु:खद घटनांचा घेतलेला सूक्ष्म वेध


सत्या सरन
अनुवाद : मिलिंद चंपानेरकर


९-१० ऑक्टोबर, १९६४
मी ते दृश्य लिहून पूर्ण करेस्तोवर जवळपास मध्यरात्रीची वेळ झालेली होती. गुरू दत्त यांनी माझ्यासोबत जेवायला बसायचं कबूल केलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यांनी काही देखील खाल्लेलं नव्हतं. मला भूक लागलेली असल्याने मी मात्र यथेच्छ जेवलो. ज्या अर्थी गुरू दत्त मद्याचा प्याला लीलया हाती धरून होते, त्या अर्थी ते पिऊन खूप बेहोश झाले होते, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्यांची मनोऽवस्था मात्र निश्चितच भयानक होती. मला त्यांना संहिता वाचून दाखवायची होती, पण ते जराही ऐकून घेण्याच्या मनोऽवस्थेत नव्हते. खरंतर त्यातून मला संकेत मिळायला हवा होता. (अबरार अल्वी)

__

गुरू दत्तने अबरारना संहिता रतनकडे ठेवून जाण्यास सांगितलं. ”इफ यू डोन्ट माईंड आय वुड लाइक टू रिटायर,” असं म्हणून गुरू दत्त उठून उभे राहिले आणि आपल्या खोलीत गेले… ते गुरू दत्तचे अखेरचे शब्द ठरणार होते.

त्या दहा वर्षांतील गुरू दत्त
– गुरू दत्तचे निकटतम सहकारी व जिवलग मित्र अबरार अल्वी यांच्या कथनातून गुरू दत्तच्या व्यक्तिमत्त्वावर व त्याच्या अकाली मृत्यूसह त्याच्या जीवनातील विविध घटनांवर नव्याने प्रकाश
– अबरार-गुरू दत्त यांच्या १९५४-६४ दरम्यानच्या सहप्रवासातून साकार झालेल्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’ व ‘साहिब बीबी और गुलाम’सह सर्व चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा सूक्ष्म वेध


295.00 Add to cart

थोरांचं बालपण


[taxonomy_list name=”product_author” include=”378″]


आपण भविष्यात कोण होऊ, काय करू याची बीजं बरेचदा आपल्या बालपणात पडलेली असतात असं म्हटलं जातं. आणि थोर व्यक्तिमत्त्वांचं बालपण पाहिलं तर त्याची सत्यता पटते. कारण बालपणी आपलं मन अत्यंत संवेदनशील असतं. त्यामुळे या काळात आपल्या मनावर जे अनुभवांचे ठसे उमटतात, जे संस्कार होतात, त्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा पाया रचला जातो.

या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य, समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील; वल्लभभाई पटेल, होमी भाभा, सालिम अली, झाकीर हुसेन, अगाथा खिस्ती, स्वामी रामतीर्थ, आशा भोसले, सानिया मिर्झा; अशा ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

मोठ्या व्यक्तीRच्या बालपणाची रंजक पद्धतीने ओळख करून देऊन,

प्रेरणा देणारं पुस्तक…थोरांचं बालपण !



125.00 Add to cart

परमवीर-गाथा

सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार 


परमवीर चक्र या सर्वोच्च लष्करी सन्मानाने गौरवण्यात आलेल्या २१ शूरवीरांच्या पराक्रमाची ही आहे परमवीर-गाथा !
कधी २०००० फूट उंचीवर दुर्गम भागात लढलेलं प्रत्यक्ष युद्ध असो, तर कधी शून्यापेक्षा कमी तापमानात शत्रुच्या कारवाईला दिलेलं सडेतोड उत्तर असो, कधी कुशल डावपेच आखून प्राण पणाला लावून जिंकलेली बाजी असो…या २१ वीरांनी भारताची सुरक्षा हेच जीवनाचं ध्येय मानलं.आई-वडील, पत्नी, मुलं, भावंडं या नात्यांपेक्षाही देशनिष्ठा त्यांनी महत्त्वाची मानली. ज्या युद्धांत अथवा चकमकीत दाखवलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित केलं गेलं त्या लढतींचं पुस्तकात केलेलं जिवंत चित्रण वाचून प्रत्यक्ष लढाईच आपल्या डोळ्यांसमोर उभी राहील.
या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधून परमवीरचक्र मानकर्‍यांचं नेमकं योगदान काय आहे, हे सांगणार्‍या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीचीसुद्धा ओळख करून देतात.
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ही आहे…परमवीर-गाथा!



250.00 Add to cart

मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास


वामन देशपांडे


संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्‍या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.



60.00 Add to cart

मुलांसाठी संत ज्ञानेश्वर


वामन देशपांडे


संत ज्ञानेश्‍वर हा प्रत्येक मराठी माणसाचा अभिमानबिंदू आहे. घरात जे आईला स्थान असते तेच स्थान संत ज्ञानेश्‍वर माऊलीला आहे. हे सारं समजून घेणं, अगदी लहान वयात, विद्यार्थीदशेत समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या आयुष्यात संत ज्ञानेश्‍वर अगदी लहान वयात यावा, ज्ञानेश्‍वरी नेमकी काय आहे हे त्यांना लहान वयातच कळावे म्हणून ह्या पुस्तकात थोडक्यात ज्ञानेश्‍वरी उलगडून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.



60.00 Add to cart

मुलांसाठी संत तुकाराम


वामन देशपांडे


‘संस्कारमाला’ ह्या तीन पुस्तकांच्या संचातले ‘मुलांसाठी संत तुकाराम’ हे पुस्तक मधलं आहे. मुलांची भाषा आणि विचार यावर तुकारामाची छाया पडली तर मोठेपणी एक अनुभवविश्‍व आपोआप उलगडून येईल. आयुष्यभर साथ करतील असे अभंग तुकारामाने लिहिले.


60.00 Add to cart

शहीद

भयमुक्त होऊन मरणाला कवेत घेणार्‍या भगत सिंग यांचा अखेरपर्यंतचा जीवनप्रवास…


[taxonomy_list name=”product_author” include=”571″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”430″]


केवळ तेवीस वर्ष वय असलेल्या भगत सिंग यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली खरी, पण ‘माणूस गेला तरी, त्याचा विचार मरत नाही’ ही उक्ती भगत सिंगांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. एवढेच नव्हे, तर त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र-चळवळीची ज्वाला अधिकच पेटून उठली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून, आणि प्रकाशात न आल्या कागदपत्रांचा शोध घेऊन, संशोधनकार ज्येष्ठ व विख्यात पत्रकार, लेखक कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. यात भगत सिंग यांच्यावर मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा असलेला प्रभाव, त्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी, धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टीच नय्यर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केलं आहे. भगत सिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या उटल्याचा तपशीलवार वर्णन असून हंस राज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आले आहेत तसंच यात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगत सिंग याच विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले, हेही नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे.
देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका स्वातंत्र्यसैनिकाची धगधगती क्रांतिगाथा शहीद!


350.00 Add to cart

प्रज्ञावंत १ : भारतीय

मानवी जीवन समृद्ध करणारे


[taxonomy_list name=”product_author” include=”581″]


गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* जगन्नाथ तथा नाना शंकरशेट * दादाभाई नौरोजी
* बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय
* बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा
* रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके
* इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
* कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा
* डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा
* डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण
* डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल
* एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी
* खान अब्दुलगफ्फार खान


240.00 Add to cart

प्रज्ञावंत २ : परदेशी

मानवी जीवन समृद्ध करणारे


[taxonomy_list name=”product_author” include=”581″]


गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट…

* खिस्तोफर कोलंबस * वास्को-द-गामा
* फर्डिनंड मॅगेलेन आणि कॅप्टन जेम्स कुक
* गॅलिलिओ गॅलिली * आयझॅक न्यूटन * अल्बर्ट आईनस्टाईन
* बेंजामिन फ्रँक्लिन * जॉर्ज वॉशिंग्टन * थॉमस जेफर्सन
* अब्राहम लिंकन * सुकार्नो * नेल्सन मंडेला * कार्ल माक्र्स
* व्लादिमीर लेनिन * माओ-त्से-तुंग * हो-चि-मिन्ह
* चे गव्हेरा * फिडेलकॅस्ट्रो


225.00 Add to cart

सुहाना सफर और…

कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवन-प्रवास


विजय पाडळकर


हिंदी चित्रपटसृष्टीतला संगीताचा सुवर्णकाळ जेवढा संगीतकारांच्या अविस्मरणीय रचनांनी गाजला, तेवढाच तो प्रतिभावान गीतकारांच्या आशयसंपन्न काव्याने बहरला.
सामाजिक आणि वैचारिक पाश्र्वभूमीतून आलेल्या या गीतकारांनी प्रेमगीतं, युगुलगीतं आणि मानवी जीवनातल्या सर्वच भावभावना उत्कटतेने व्यक्त करणारी गीतं सर्जनशीलतेने लिहिली आणि त्याचबरोबर सामाजिक जाणिवांचा वेध घेणारी गीतंही संवेदनशीलतेने रचली.
अशा चतुरस्र गीतकारांमध्ये शैलेंद्र हे महत्त्वाचं नाव! ‘ओ सजना बरखा बहार आयी’, ‘दम भर जो उधर मूँह फेरे’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘जीना इसी का नाम है’, ‘आज फिर जिने की तमन्ना है’, ‘सुहाना सफर और…’ अशी वैविध्यपूर्ण आशयाची गीतं रचून त्यांनी रसिकांना सहजसोप्या शब्दांत विचारप्रवृत्त केलं, गीतांना तत्त्वज्ञानात्मक डूब देऊन प्रगल्भ केलं आणि तरल गीतांनी रिझवलंही…!
या पुस्तकात गीतकार शैलेंद्र यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलूंची ओळख करून दिली आहे. तसंच त्यांच्या गीतांच्या चित्रणाची वैशिष्ट्यंही उलगडून सांगितली आहेत. ‘तीसरी कसम’ हा शैलेंद्र यांनी निर्मिलेला चित्रपट म्हणजे त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय… त्या चित्रपटाची पडद्यावरील आणि पडद्यामागील कहाणीही यात वाचायला मिळेल.
प्रसिद्ध चित्रपट-आस्वादक विजय पाडळकर यांनी घेतलेला शैलेंद्र यांच्या गीतमय जीवनप्रवासाचा हा विविधांगी वेध… ‘सुहाना सफर और…!’


Life and work of veteran lyricist in Bollywood – Shailendra! A reader can revisit the golden era of Bollywood music. Shailendra wrote all kinds of songs for successful films. It also tells about many behind the scene memories of various Hindi film songs. While reading about Shailendra, his life, struggles, how he carved his own niche in the industry, his passion of film making etc. This book is a kaleidoscope for film researchers and critics too.


340.00 Add to cart

योगाचार्य

बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

रश्मी पालखीवाला
अनुवाद : नीता कुलकर्णी


कर्नाटकातल्या एका लहानशा खेड्यातून बी.के.एस. अय्यंगार यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाला सुरुवात झाली. कुमारवयापासूनच त्यांना सुप्रसिद्ध योगतज्ज्ञ कृष्णमाचार्य यांचा सहवास लाभला व त्यांच्यात गुरु-शिष्य नातं निर्माण झालं. मात्र हे गुरु-शिष्य संबंध कायमच तणावपूर्ण राहिले, तरी अय्यंगारांनी मोठ्या जिद्दीने कृष्णमाचार्यांकडून योगविद्या शिकून घेतली.

भविष्य घडवण्यासाठी पुणे शहरात आल्यावर अय्यंगारांच्या जीवनाला वेगळं वळण लाभलं. या अनोळखी शहरात जम बसवायला अय्यंगारांना बराच संघर्ष करावा लागला… जणू काही ती त्यांची आणि योगविद्येची कसोटीच होती. आणि त्या संघर्षात ते यशस्वी झाले! त्यांची कीर्ती देशविदेशात पसरली. एवढी की, आंतरराष्ट्रीय पातळीवर योग आणि अय्यंगार हे अतूट समीकरण तयार होऊन ‘अय्यंगार योग’ अशी जणू एक वेगळी शाखाच निर्माण झाली. अय्यंगारांनी निरामय आयुष्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे सर्वसामान्यांच्या मनावर ठसवलं, विविध साधनांचा वापर सुचवून योग लोकप्रिय केला.

रश्मी पालखीवाला या अय्यंगारांच्या निकटवर्तीयांपैकी एक होत. या पुस्तकात त्यांनी अय्यंगार यांच्या जीवनातले चढ-उतार, त्यांचे स्वभावविशेष उत्कटतेने चितारले आहेत, तसंच योगसाधनेकडे पाहायचा गुरुजींचा दृष्टिकोन आणि त्यामागचं त्यांचं तत्त्वज्ञानही विशद केलं आहे.

जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत योगसाधना हा ध्यास असलेल्या हाडाच्या योगशिक्षकाचं चरित्र…योगाचार्य !


A saga of a Maestro, who made study and practice of yoga his life mission. A profound biography of Yogacharya B. K. S. Iyyangar, an Internationally renowned yoga teacher, practitioner and a thinker. This book speaks about his childhood, hardships- he faced, his stern and over-strict guru, his struggle to popularize yoga among common people, his popularity and the respect he earned through out the world. Written by the member of one of his close family friends, Rashmi Palkhiwala, this book is a must-read for everyone who wants to know how Shri. Iyyangar made Yoga the matter of pride in the world.


300.00 Add to cart