भारत : समाज आणि राजकारण

यशवंतराव चव्हाण यांचे प्रगट चिंतन


[taxonomy_list name=”product_author” include=”379″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”1076″]


आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.

स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.


750.00 Add to cart

शौर्यगाथा

युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम गाजवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा


रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
अनुवाद : भगवान दातार 


या कथा आहेत वीर जवानांच्या…या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन’ कोणत्या मुशीतून घडतं, याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत… त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत… प्रत्येक लढाईत, प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे. त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची, त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा !



250.00 Add to cart

सत्य नडेला

मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा


जगमोहन एस. भानवर
अनुवाद : रमा हर्डीकर-सखदेव


जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जेव्हा सत्य नडेला याची नियुक्ती झाली तेव्हा एकीकडे भारतीयांच्या माना ताठ झाल्या, तर दुसरीकडे तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अभ्यासकांच्या मनात हा मुरब्बी तंत्रज्ञ मायक्रोसॉफ्टला कोणती नवी दिशा देणार याबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं होतं. कारण तेव्हा गुगल आणि अ‍ॅपल प्रतिस्पर्धी कंपन्यांनी आपला मोर्चा मोबाइल फोन वा टॅब यांकडे वळवला होता.
तर, मायक्रोसॉफ्टने या क्षेत्रात अग्रणी होण्याच्या संधी गमावल्या होत्या. नडेलाने मात्र सूत्रं स्वीकारल्यावर लगेच नव्या बदलांच्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली.
या पुस्तकात नडेलाची वैयक्तिक जडणघडण, त्याची नियुक्ती कशी करण्यात आली, मायक्रोसॉफ्टची आधीची स्थिती, नडेलाने ठामपणे केलेले बदल, त्याचे परिणाम आणि नडेलापुढची आव्हानं इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक म्हणजे सत्य नडेला या व्यक्तिमत्त्वाचं चरित्र आहे, तसंच दुसरीकडे, ते तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होणारे बदल, त्यामुळे होत असलेली स्पर्धा यांची मर्मदृष्टी देणारा माहितीपटही आहे.
सर्वसामान्य वापरकर्त्यांना या क्षेत्राची रंजक माहिती देणारं, आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना भान, प्रेरणा देणारं आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना अंतर्दृष्टी देणारं पुस्तक…
सत्य नडेला : मायक्रोसॉफ्टचा बदलता चेहरा!


175.00 Add to cart

सहकारधुरीण

भारतातील साखर उद्योगात सहकाराची ध्वजा रोवण्याचं पायाभूत कार्य करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांचं समग्र चरित्र


[taxonomy_list name=”product_author” include=”348″]


भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.
कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात.
विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.


340.00 Add to cart

सुंदर पिचई

गुगलचं भविष्य


जगमोहन एस. भानवर
अनुवाद :रमा हर्डीकर-सखदेव


जागतिक स्तरावरची महाकाय टेक कंपनी ‘गूगल’ आणि तिचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या एका भारतीय तरुण नेतृत्त्वाची ही आहे झंझावाती कहाणी…
तरुण वयाचा सुंदर पिचई तंत्रज्ञानावरचं आपलं निरपवाद प्रभुत्त्व सिद्ध करत ‘गूगल’मध्ये यशाची शिडी झपाट्याने चढत होता. साहजिकच ‘गूगल’च्या ‘सीईओ’पदी पिचईची झालेली निवड स्पर्धक कंपन्यांनाही अनपेक्षित नव्हती. उलटपक्षी त्याच्या नेतृत्त्वाखाली ‘गूगल’ नव्या आव्हानांना कसं तोंड देतं, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. तंत्रज्ञानाच्या प्रभुत्त्वाबरोबरच पिचईकडे भविष्याचा वेध घेणारी ‘व्हिजन’ होती. सोबतीला व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांची जोड होती. माणसांना एकत्र घेऊन काम करण्याची हातोटी होती. त्याच बळावर त्याने क्रोम, क्रोम ओएस, अँड्रॉइड वगैरे उत्पादनं विकसित केली. ही उत्पादनं आता जगावर अधिराज्य गाजवत आहेत. पिचईचा ‘मिडास टच’ लाभलेल्या ‘गूगल’ने आता नवी भरारी घेतली आहे.
या पुस्तकात पिचईच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, ‘गूगल’मधल्या प्रवेशापासून ते सीईओ पदापर्यंतचा त्याचा विलक्षण प्रवास, त्याने ठामपणे घेतलेले निर्णय, पेललेली आव्हानं, ‘गूगल’ला प्राप्त करुन दिलेलं अत्युच्च स्थान याचा उहापोह रंजकपणे आणि प्रभावीपणे केला आहे. सुंदर पिचई आणि दैनंदिन जगण्याचा भाग बनलेलं ‘गूगल’ यांच्या यशाचं मर्म सांगणारं आणि २१व्या शतकातलं बहुपेडी नेतृत्त्व कसं असावं आणि ते कसं घडतं हे उलगडून दाखवणारं पुस्तक
सुंदर पिचई – गूगलचं भविष्य…


195.00 Add to cart

The Pioneer

Life & Times of Vitthalrao Vikhe Patil Founder of the Co-op. movement in Indian Sugar Industry


Arun Sadhu


Famines, natural calamities, brutal exploitation by traders, moneylenders, and private factories had all conspired to nearly destroy the peasntry in the Deccan area of Maharashtra in early decades of the 20th Century. The co-operative sugar factory of small farmers that Vitthalrao Vikhe Patil (1897-1984) built against all odds at a remote village of Loni set a trend and rescued the small farmers from this calamity. Vitthalrao was the authentic and creative proponent of peasants power. A quintessential farmer with native wisdom, Vitthalrao employed innovative systems to use a small share of the accumulated wealth created by co-operative factory for public activities including education. The book narrates the exciting story of this extraordinary Indian peasant’s long fight with rural elite and vested interests to build the co-operative, of his frustrations, perseverance and his never-say-die spirit.


875.00 Add to cart
1 2 3