वाचा जाणा करा संच
प्रतिभावान कवी, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बहुप्रसवा लेखिका कविता महाजन यांनी सर्जनशील लेखनाबरोबर अनुवाद तसंच संपादन क्षेत्रात भरीव काम केलं आहे. त्यांनी मुलांसाठीही गोष्टीची पुस्तकं लिहिली आहेत.
त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेडला झालं आणि त्यानंतर त्यांनी औरंगाबाद इथे कलाविषयक शिक्षण केलं. त्यांनी मराठी साहित्यात एम.ए.देखील केलं. कवितेपासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्या कादंबरीलेखनाकडे वळल्या. 'ब्र', 'भिन्न' या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या तसंच त्यांनी केलेल्या इस्मत चुगताई यांच्या 'रजई' या लघुकथासंग्रहाच्या अनुवादाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार, तसेच इतर अनेक मान-सन्मान त्यांना मिळाले.
सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली
आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं.
तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!”
आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.”
मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का?
नाक नसलेला माणूस कसा दिसेल?
मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी?
जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे
नाकाने कांदे सोलता आले नसते.
आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात?
बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?
Reviews
There are no reviews yet.