अंड खासियत

अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती


उषा पुरोहित


सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात.
चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्‍या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत! 



45.00 Add to cart

आजीच्या विशेष चवीच्या पाककृती

…व्हेज-नॉनव्हेज


मीना चंपानेरकर


रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या ‘आजीच्या विशेष चवीच्या पाककृती’…!


45.00 Add to cart

डाळी-कडधान्यं खासियत

उसळी, भाज्या, आमटी, वरण, सांबर, पराठे, भाकरी, खिचडी, पुलाव आणि तऱ्ह्तऱ्हेचा अल्पोपाहार!


मंगला बर्वे


डाळी, कडधान्यं यांना आपल्या रोजच्या आहारात महत्त्वपूर्ण स्थान असते. यांचा वापर अनेक प्रकारे होत असतो म्हणूनच ’रोहन प्रकाशन’ सादर करीत आहे, पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांचे डाळी-कडधान्यं यांच्या पाककृतींसाठी एक परिपूर्ण पुस्तक!
हे पुस्तक परिपूर्ण का?
कारण यात आहे भरपूर विविधता —
o उसळी o भाज्या o वरण o आमटी o सूप्स o पराठे-भाकरी o गोड पदार्थ o चटण्या-कोशिंबिरी o साठवणीचे पदार्थ आणि o अल्पोपहार – भजी-वडे o भाजणी-चकल्या o ढोकळा o कटलेट o सामोसे o डोसा-धिरडी o मिसळ-छोले o तळलेली डाळ o शेव
अशा सर्व प्रकारच्या पदार्थांची!


50.00 Add to cart

दिवाळीचे आणि सणासुदीचे पदार्थ

मंगला बर्वे


हल्लीच्या धावपळीच्या जीवनात नोकरी करणार्‍या मुली बहुतांशी विकतचे पदार्थ आणून चार दिवस निभावून नेतात. पण विकतचे पदार्थ सर्वच दृष्टीने हितावह ठरत नाहीत.
यासाठी मुद्दाम दिवाळी व सणासुदीच्या वेळी तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ करता यावेत या दृष्टीने कितीतरी पदार्थांच्या पाककृती दिल्या आहेत. त्यामध्ये जुन्या पारंपरिक पदार्थांचा समावेश आहेच पण नाविन्याची आवड असणार्‍या गृहिणींसाठी नव्या-नव्या पदार्थांचाही समावेश आहे.
करंज्या, बर्फी-वडया, लाडू, कडबोळी, शेवया, शंकरपाळे, शेव, चिवडा या नेहमीच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांसमवेत इतर सणांना आवडीने खाल्ले जाणारे पदार्थ उदा. रसमलाई, श्रीखंड, गुलाबजाम, हलवा, बासुंदी यांच्याही रुचकर रेसिपीज दिल्या आहेत.


50.00 Add to cart

पंजाबी खासियत

भाज्या व डाळी

उषा पुरोहित


आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!


50.00 Add to cart

पुडिंग्ज व कस्टर्डस्

मंगला बर्वे


पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्‍या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत. या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील.


50.00 Add to cart

बटाट्याचे पदार्थ


मंगला बर्वे


बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो.
विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे.
या पुस्तकात पारंपरिक ‘भजी’पासून ‘बर्डस् नेस्ट’ अशा आधुनिक पदार्थापर्यंत स्नॅक्सचे अनेक पदार्थ आहेत, बटाटयाच्या साध्या भाजीपासून ‘पुदिनेवाले आलू’पर्यंत भाजी-रश्यातही विविधता आहे. बटाटयाच्या पराठयाचे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे गोड पदार्थही आहेत.
या पुस्तकामुळे सर्वांच्या आवडीचा बटाटा वेगवेगळ्या रूपात व विविध चवीत रसिकांना एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे.


50.00 Add to cart

नारळाचे पदार्थ


मंगला बर्वे


समुद्रकिनार्‍यालगतच्या भागात जरी नारळ मोठया प्रमाणात पिकत असला, तरी नारळ स्वयंपाकासाठी सर्वत्रच विविध प्रकारे वापरला जातो. हा वापर केवळ चवीसाठी किंवा पदार्थातील एक पुरक जिन्नस म्हणून मर्यादित राहिलेला नाही. नारळाचा स्वतंत्रपणे वापर असलेल्या अनेक पाककृतींची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे.
पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे यांनी अशा विविध पदार्थांचा शोध घेऊन, अनेक प्रयोग करून केवळ नारळाच्या पदार्थांचे हे पुस्तक सिद्ध केले आहे. या पुस्तकात नारळाचा वापर असलेले अनेक अल्पोपाहाराचे पदार्थ, भात-पुलावाचे विविध प्रकार, तसेच सार-करी यांचा समावेश आहे व त्यासोबत लागणार्‍या चटण्या, कोशिंबिरी-रायतीही आहेत. नारळाचे विविध गोड पदार्थही पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकामुळे रसिकांना नारळाचे वैशिष्टयपूर्ण पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.


50.00 Add to cart

लाजवाब फिश


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब फिश.
चमचमीत रसदार व सुके प्रकार.


50.00 Add to cart

एक सायंकाळ एक पदार्थ

रात्रीच्या जेवणाचे ‘शॉर्टकट’ पर्याय


मंगला बर्वे


काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख…इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.


50.00 Add to cart

चिंगलान

चायनीज कुकरी


वसुमती धुरू


पाककृती व आहारशास्त्र यांचा संगम साधणार्‍या लेखिका सौ. वसुमती धुरू यांनी हे चायनीज कुकरीवर खास लिहिलेले पुस्तक. चायनीज कुकरीचे वर्गही त्या चालवीत त्यामुळे व्यासंगाला अनुभवाची जोड मिळाली. चायनीज जेवणाला ‘भारतीय टच’ देऊन लेखिकेने केलेल्या वेगवेगळ्या रेसिपीज् विशेषत: अजिनोमोटोसारखा आरोग्याला घातक पदार्थ वगळून बनवलेले सूप्स, सॉस, सॅलड, रोल्स, राइस, नूडल्स यांची मेजवानी!


Chinese Recipes


60.00 Add to cart

शाकाहारी २०२ भात व भाज्या

मंगला बर्वे


जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत.


60.00 Read more

पंचप्रांतीय पाककृती

स्नेहलता दातार


आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.


60.00 Add to cart

फ्रीज-ओव्हन-मिक्सर (त्रिविध पाककृती)

मंगला बर्वे


पाककृती या विषयावर लिहिणार्‍या लेखिकांमध्ये आज अग्रगण्य ठरल्या गेलेल्या मंगला बर्वे यांनी आधुनिक युगाची गरज समजून लिहिलेले हे नावीन्यपूर्ण असे एकमेव पुस्तक !
फ्रिज, ओव्हन, मिक्सर या साधनांच्या मदतीने अनेक विविध पदार्थ चविष्ट व सुबकरीत्या करता येण्यासाठी हे पुस्तक गृहिणींना अत्यंत उपयोगी ठरावे हीच इच्छा.


60.00 Add to cart

सॅलड्स व कोशिंबिरी

वसुमती धुरू


कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्‍या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.


60.00 Add to cart

चॉकलेट खासियत

मोहात पाडणारे चॉकलेट व कोकोचे अनेकानेक पदार्थ


उषा पुरोहित


चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात. आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं.
चॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना…अर्थात चॉकलेट खासियत!


60.00 Add to cart
1 2 3 4 5