दाक्षिणात्य पाककृती


स्नेहलता दातार


पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.



40.00 Read more

लाजवाब भाज्या


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब भाज्या.
चविष्ट रसदार व सुके प्रकार


40.00 Add to cart

लाजवाब पुलाव-बिर्याणी


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब पुलाव-बिर्याणी.
भाताचे स्वादिष्ट व्हेज-नॉनव्हेज प्रकार.


40.00 Add to cart

लाजवाब चिकन


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब चिकन.
चमचमीत रसदार व सुके प्रकार


40.00 Add to cart

लाजवाब मटण


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील मांसाहारी रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मटण.
चमचमीत रसदार व सुके प्रकार.


40.00 Add to cart

सूप्स


सुजाता चंपानेरकर


‘आइस्क्रीम्स व डेझर्टस्’ या पुस्तकाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर सुजाता चंपानेरकर यांचे हे नवे पुस्तक. नाविन्यपूर्ण तसेच प्रचलित चवींची शाकाहारी व मांसाहारी अशी विविध सूप्स त्यांनी या पुस्तकात दिली आहेत. काटेकोरपणे परंतु सोप्या भाषेत त्यांनी केलेले मार्गदर्शन गृहिणींना निश्‍चितच उपयुक्त ठरेल.


40.00 Read more

निवडक पदार्थ सणावारांचे


मंगला बर्वे


या पुस्तकात मंगला बर्वे यांनी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, चैत्रगौरीचे हळदीकुंकू, नारळी पौर्णिमा, दत्तजयंती, माघी चतुर्थी, देवदिवाळी, गणेश चतुर्थी अशा अनेक सणावारांना करायचे गोड-तिखट पदार्थ एकत्रितपणे उपलब्ध होत आहेत.


40.00 Add to cart

रुचकर शाकाहारी पदार्थ


लता दळवी


या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे यातील वैविध्य! भाज्या, उसळी, आमटया, कोशिंबिरी, भात, पराठे आणि स्नॅक्स अशा पदार्थांच्या प्रकारांचे वैविध्य तर यात आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या चवीतही वैविध्य आहे. काही नेहमीचे लोकप्रिय पदार्थ, तर अनेक नावीन्यपूर्ण, वेगळ्या चवींचे पदार्थ यात मिळतील. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे लेखिका लता दळवी यांच्यातील पाककला-कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती आत्मसात केलेल्या या गुणांबरोबरच लता दळवी या कर्जतच्या दिवाडकर परिवारातल्या असल्याने त्यांच्यात अर्थातच पाककलेची आवड उपजत भिनली आहे.


40.00 Read more

तृणधान्ये खासियत

अल्पोपाहारापासून दशमीपर्यंत तृणधान्यांचे वैविध्यपूर्ण पौष्टिक पदार्थ


मंगला बर्वे


तृणधान्य हा आहारातील एक अतिशय पौष्टिक घटक आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, ओटस्, तांदूळ, बार्ली, गहू इ. तृणधान्यांपासून होऊ शकणारे विविध पदार्थ यात दिले आहेत.
अल्पोपहार, गोड पदार्थ, फराळाचे पदार्थ, उसळी, भाकरी-दशमी, साठवणीचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ असे वैविध्य राखत सुरुवातीला तृणधान्यांविषयी उपवुक्त अशी माहितीही पाककलानिपुण अग्रगण्य लेखिका मंगला बर्वे यांनी तपशिलवार दिली आहे.


40.00 Add to cart

लाजवाब मिष्टान्न


सुधा मायदेव


पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील स्वादिष्ट रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब मिष्टान्न.
बहारदार देशी गोड पदार्थ


40.00 Add to cart

रव्याचे पदार्थ (काही तिखट, काही गोड)

काही तिखट, काही गोड


मंगला बर्वे


रवा म्हटलं की सामान्यत: आपल्याला रव्याचे लाडू, गोड-तिखट सांजा, उपमा इ. ठरावीक पदार्थ डोळ्यासमोर येतात. मात्र पाककलानिपुण लेखिका मंगला बर्वे यांनी ‘रवा’ हा एकच जिन्नस वापरून करण्याजोगे विविध पदार्थ कोणते हे कल्पकतेने या पुस्तकात एकत्रित केले आहेत.
पुस्तकात ० लाडू ० वडया, बर्फी ० करंज्या ० शिरा, गुलाबजाम इ. ० पुरी, साटोरी, पोळी ० घारगे ० पानगी ० केक ० नानकटाई तसेच वेगवेगळे तिखट पदार्थ – उदा. ह इडली ह डोसा ह कटलेट यांचा समावेश केला आहे.


40.00 Add to cart

असे करा साठवणीचे पदार्थ


वैजयंती केळकर


नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!


45.00 Read more

चिमणचारा पाककृती

बाळ-गोपाळांसाठी पचण्यास हलके व पौष्टिक पदार्थ


स्नेहलता दातार


आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक.
० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ
० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ
० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी
० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर
० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्‍या बालकांसाठी उपयोगी
० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार
० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं


45.00 Add to cart

सोया खासियत

पौष्टिक सोयाबीनच्या विविध लज्जतदार पाककृती


उषा पुरोहित


चीन व जपानसारख्या पूर्वेकडील देशांमध्ये सोयाबीनचा वापर फार पुरातन काळापासून होत आला आहे. त्यातील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे आपल्याकडेही हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. अशा या पौष्टिक व गुणकारी सोयाच्या चविष्ट अशा तिखट व गोड पाककृतींचा खजिना अर्थात…

सोया खासियत!


45.00 Add to cart

चाट खासियत

चाटच्या विविध चटपटीत पाककृती


उषा पुरोहित


कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे ‘चाट’! या पुस्तकात भेळ आणि पाणीपुरीसारखे नेहमीचे प्रकार तर आहेतच पण त्याचबरोबर चाटच्या काही परप्रांतीय तर काही नावीन्यपूर्ण पाककृती उषा पुरोहित यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर हा आहे चाट रेसिपीजचा खजिना…अर्थात चाट खासियत!


45.00 Add to cart

पनीर खासियत

पनीरच्या विविध रुचकर पाककृती


उषा पुरोहित


हॉटेलमध्ये मिळत असलेल्या पनीरच्या वेगवेगळया रुचकर डिशेसमुळे आजकाल आपल्याकडे पनीर खूपच लोकप्रिय झालं आहे. पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे.
विविध स्नॅक्सपासून भाज्या, बिर्याणी व करीजपर्यंतचा रुचकर खजिना…

अर्थात पनीर खासियत!


45.00 Add to cart
1 2 3 5