‘फ्लर्टिंग विथ स्टॉक्स’ पुस्तकातील निवडक भाग

भाजी मंडई, कपड्यांचे मार्केट, मासळी बाजार यांसारखे कित्येक बाजार आपल्याला माहीत आहेत. हे बाजार आणि शेअरबाजार यांमध्ये फरक काय आहे याचा आपण कधी विचार केला आहे का?
अगदी पहिला फरक म्हणजे व्यवहारातील सोपेपणा! उदाहरणार्थ, मासळी बाजार आणि शेअरबाजार यांपैकी कोणत्या बाजारातील व्यवहार समजायला सोपे आहेत? उत्तर सोपं आहे – मासळी बाजार! कारण तेथील व्यवहार तुलनेने सोपे असतात.
मी फार जुन्या काळातील गोष्टी सांगत नाहीये, पण अगदी अलीकडील काळात (काही ठिकाणी आजही) आपण शेअरबाजारात गेलात तर तिथे ज्या प्रकारे आक्रमक होऊन अनेकदा एकमेकांच्या अंगावर धावून शेअरची खरेदी-विक्री केली जाते ती पाहून कदाचित बॉक्सिंगचा खेळसुद्धा कमी धोकादायक वाटेल.
म्हणूनच जेव्हा एखादा नवखा माणूस शेअरबाजाराचं ट्रेडिंग सुरू असताना तिथे जातो त्या वेळी जणू काही त्या ट्रेडर्समध्ये आपापसात मारामारी चालली आहे असं त्याला वाटतं. तिथला गोंधळ, गलका, एकमेकांच्या अंगावर जवळजवळ धावून जाऊन ओरडणं आणि बरेचदा सांकेतिक भाषेत बोलणं पाहून नवीन माणूस गोंधळून जाऊ शकतो. तसंच अशा ठिकाणी अब्जावधी रुपयांचे व्यवहार कसे चटकन होतात हे पाहून ‘हे लोक वेडे तर नाहीत ना’ असंसुद्धा त्याला वाटू शकतं. पण मित्रांनो, खरं सांगतो, त्या वेडेपणातसुद्धा एक मजा असते. ‘इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग’ सुरू झाल्यापासून ही मजा आणि ते वातावरण याला शेअरबाजारातील लोक नक्कीच मुकत असणार!

मित्रांनो, शेअरबाजारात दोन प्रकारचे लोक आपल्याला आढळतील – एक म्हणजे गुंतवणूकदार आणि दुसरे म्हणजे सट्टेबाज. ज्यांच्याकडे शेअर घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत आणि ज्यांना शेअरची डिलिव्हरी घेऊन वाट पाहण्याची ताकद आहे असे लोक म्हणजे गुंतवणूकदार! योग्य संधी मिळेपर्यंत ते त्या शेअरची विक्री करत नाहीत.

इतर बाजार आणि शेअरबाजार यांतील महत्त्वाचा दुसरा फरक म्हणजे इतर बाजारात खरेदी-विक्री करणारे लोक व्यवहार करण्यासाठी एकमेकांसमोर येतात; शेअरबाजारात मात्र ब्रोकरच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असल्यामुळे खरेदीदार आणि विक्रेता व्यवहारांसाठी एकमेकांसमोर येत नाहीत.
तिसरा आणि कदाचित सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे इतर बाजारात खरेदीदार स्वत: बाजारात जाऊन, वस्तूची रक्कम देऊन त्या वस्तूचा प्रत्यक्ष ताबा लगेच घेतो. शेअरबाजारात मात्र असं होत नाही. व्यवहार झाल्यानंतर शेअरचं हस्तांतरण आणि पैसे देण्याचा व्यवहार थोड्या कालावधीनंतर होतो.
शेअरबाजारातील गोंधळ, गलका, एकमेकांच्या अंगावर जवळजवळ धावून जाऊन ओरडणारे गुंतवणूकदार आणि त्यांचे सांकेतिक भाषेत बोलणं पाहून नवीन मनुष्य गोंधळून जातो. या लोकांमध्ये मारामारी तर सुरू नाही ना अशी शंका त्याला येऊ शकते.
गुंतवणूकदार विरुद्ध सट्टेबाज
मित्रांनो, वरील उदाहरणातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल ती म्हणजे शेअरबाजारात दोन प्रकारचे लोक आपल्याला आढळतील – एक म्हणजे गुंतवणूकदार आणि दुसरे म्हणजे सट्टेबाज.
ज्यांच्याकडे शेअर घेण्यासाठी पुरेसे पैसे आहेत आणि ज्यांना शेअरची डिलिव्हरी घेऊन वाट पाहण्याची ताकद आहे असे लोक म्हणजे गुंतवणूकदार! योग्य संधी मिळेपर्यंत ते त्या शेअरची विक्री करत नाहीत.
दुसऱ्या बाजूला सट्टेबाज. म्हणजे असे लोक ज्यांच्याकडे शेअर खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे असतीलच असं नाही आणि ज्यांना शेअरची डिलिव्हरी घेऊन वाट पाहण्यात फारसं स्वारस्य नसतं. तेजीच्या दिवसांत खरेदी आणि विक्री यांतील फरकाने मिळणारा फायदा चटकन खिशात टाकायचा आणि काही वेळेस अंदाज चुकला तर तोट्याची रक्कम खिशातून पटकन देऊन टाकायची असा त्यांचा दृष्टिकोन असतो.
या पुस्तकाच्या माध्यमातून मी शेअरबाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व वाचकांना आवाहन करतो की, त्यांनी गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला जर सट्टेबाज व्हायचं असेल तर त्यातील धोके आणि जोखीम पूर्णपणे समजावून घ्या आणि नंतरच निर्णय घ्या.
आपण घेत असलेल्या शेअरचा मूलभूत अभ्यास करायचा आणि तो सध्या योग्य किमतीला उपलब्ध आहे का याचा अंदाज घ्यायचा यावर गुंतवणूकदार लोकांचा भर असतो, तर सट्टेबाज लोकांना जुगार खेळायला आवडतं. बहुतेक वेळा शेअरचा मूलभूत अभ्यास करण्यापेक्षा बाजाराचा कल आणि मूड बघून निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो.

येणाऱ्या काही दिवसांत एखाद्या शेअरचा बाजारभाव वाढणार आहे असं वाटल्यास सट्टेबाज लोक त्या शेअरमध्ये जो व्यवहार करतात त्याला तांत्रिक भाषेत ‘फॉरवर्ड ट्रेडिंग’ किंवा ‘लाँग पोझिशन’ म्हणतात. याउलट सट्टेबाजांना एखादा शेअर नजीकच्या दिवसांत पडणार असं वाटतं तेव्हा त्या शेअरमध्ये ते जो व्यवहार करतात त्याला ‘शॉर्ट सलिंग’ किंवा ‘शॉर्ट पोझिशन’ म्हणतात.

मार्जिन ट्रेडिंगविषयी बोलू काही!
मार्जिन ट्रेडिंग म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊयात. साधारणत: एखादा शेअर खरेदी करण्यासाठी तेवढी रक्कम आपल्या बँक खात्यात असायला हवी आणि याउलट एखादा शेअर विकायचा तर तो शेअर आधी आपल्या डिमॅट खात्यात असायला हवा हा अगदी सोपा तर्क आहे.
परंतु आपल्याकडे पुरेसे पैसे नसताना किंवा आपल्याकडे शेअर नसताना खरेदी-विक्रीचा व्यवहार केला तर अगदी त्याच्याउलट आणखी एक व्यवहार करून व्यवहाराचं चक्र (सेटलमेंट सायकल) पूर्ण करावं लागतं. ही सेटलमेंट सायकल पूर्ण करताना, शेअरची किंमत आपल्या मनाप्रमाणे वर किंवा खाली गेली तर त्याचा आपल्याला फायदा होतो, अन्यथा तोटा सहन करावा लागतो.
असे व्यवहार करताना व्यवहाराच्या एकूण रकमेच्या काही टक्के रक्कम ‘मार्जिन’ म्हणून ब्रोकरकडे ठेवावी लागते. तिला ‘मार्जिन मनी’ म्हणतात. मार्जिन ट्रेडिंग हे दोन प्रकारचं असतं – ‘बायिंग ऑन मार्जिन’ आणि ‘सेलिंग ऑन मार्जिन’.

बायिंग ऑन मार्जिन
असं समजा की, एखाद्या गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात ५,००,००० रुपये आहेत आणि त्याला १०० रुपये बाजारभाव असलेल्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहेत. नेहमीच्या व्यवहाराच्या नियमांप्रमाणे हा गुंतवणूकदार १०० रुपयांचे ५००० शेअर्स खरेदी करू शकतो. ज्या दिवशी त्याच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील त्या दिवशी त्याच्या बँक खात्यातून ५ लाख रुपये जातील.
आता हा व्यवहार मार्जिन ट्रेडिंगनुसार कसा होतो ते पाहूयात. असे समजूयात की, या व्यवहाराचं मार्जिन २० टक्के आहे. अशा वेळी, ५००००० च्या मदतीने ती व्यक्ती १०० रुपये बाजारभाव असलेले २५००० शेअर्स खरेदी करू शकते. (हा व्यवहार २५ लाख रुपयांचा होईल आणि त्याच्या २० टक्के रक्कम म्हणजेच ५ लाख रुपये तो मार्जिन मनी म्हणून देईल.) या व्यवहारात शेअरचा बाजारभाव सेटलमेंट कालावधी संपण्यापूर्वी ११० रुपये झाल्यास त्या गुंतवणूकदाराला २५०००० रुपयांचा फायदा होईल.
आपल्या लक्षात येईल की, मार्जिन ट्रेडिंगच्या मदतीने कमी रक्कम गुंतवून अधिक फायदा मिळवता येतो. अर्थात आपला अंदाज चुकला आणि विरुद्ध दिशेने शेअरचा बाजारभाव गेला तर मात्र मोठा तोटा होऊ शकतो, कारण कोणत्याही परिस्थितीत सेटलमेंट कालावधी पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला तो व्यवहार संपवावा लागतोच.

  • फ्लर्टिंग विथ स्टॉक्स
  • लेखक : अनिल लांबा

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल २०२१ जानेवारी


शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी…

फ्लर्टिंग विथ स्टॉक्स

चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे. या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?… १. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची? २. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय? ३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा? ४. ट्रेिंडग करताना काय काळजी घ्यायची? ५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा? ६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय? याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही… शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… .

Flirting With Stocks

395.00Add to cart


अर्थविषयक मार्गदर्शनासाठी आणखी काही पुस्तकं…

बॅलन्स शीट व फायनान्स समजून घेताना

व्यवसायाशी संबंधित प्रत्येकासाठी!


[taxonomy_list name=”product_author” include=”527″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”590″]


सुप्रसिध्द चार्टर्ड अकौंटंट आणि प्रशिक्षक डॉ. अनिल लांबा यांनी या पुस्तकात आर्थिक व्यवहाराचे निर्णय सजगपणे घेऊन आर्थिक अडचणीत न येता व्यवसायात यशस्वी कसं व्हावं हे व्यवहारातल्या साध्या-सोप्या उदाहरणांमधून समजावून सांगितलं आहे.
हे सांगताना डॉ. लांबा यांनी योग्य वित्तव्यवस्थापन कसं करावं, नफा-तोटा-पत्रक, बॅलन्स शीट कशी समजून घ्यावी, मार्जिनल कॉस्टिंग, टॉप लाइन व बॉटम लाइन, लीव्हरेज आदींसारखे किचकट वाटणारे विषयही सहजसोप्या शब्दांत रंजक पध्दतीने विशद केले आहेत.
त्यामुळे स्वत:चा व्यवसाय असलेले व्यावसायिक, छोटे-मोठे व्यापारी व उद्योजक, बँक अधिकारी, विद्यार्थी तसेच या विषयात रस असलेले जिज्ञासू अशा सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल, हे निश्चित!

”आज ना उद्या प्रत्येकाला हे नक्की पटेल की कोणताही
व्यवसाय यशस्वी होण्यासाठी बॅलन्स शीट आणि
वित्तव्यवस्थापन समजून घेणं महत्त्वाचं असतं.”
-अनिल लांबा



395.00 Add to cart

माझं कुटुंब, माझी गुंतवणूक

स्वप्न साकार करण्यासाठी पैशाचं ‘स्मार्ट’ नियोजन


[taxonomy_list name=”product_author” include=”590″]


आयुष्यात प्रत्येकाची काही ना काहीतरी स्वप्नं असतात, इच्छा-आकांक्षा असतात. कोणाला घर विकत घ्यायचं असतं, कोणाला चारचाकी हवी असते; तर कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असतं. आणि ही स्वप्नं-आकांक्षा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन!

गुंतवणूक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रा. वीरेंद्र ताटके यांनी या पुस्तकाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजनाचा मूलभूत मंत्र दिला आहे…

एकूण उत्पन्न – गुंतवणूक = खर्च

अशा प्रकारे ताटके माहिती देता देता आपल्याला आर्थिकदृष्ट्या ‘साक्षर’ करतात, आर्थिक नियोजनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात.

बँकामधली विविध प्रकारांतली गुंतवणूक, पोस्टातली गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर बाजार, रिअल इस्टेट, सोनं इ. गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांचे फायदे-तोटे उदाहरणांसह ताटके सांगतात. तसंच आयुष्यातले टप्पे कोणते आणि कुठली गुंतवणूक कधी करावी याविषयी मार्गदर्शन करतात.

मुलांचं शिक्षण, आजारपण, घराची खरेदी, स्वत:ची हौस-मौज यांसारख्या कुंटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन कष्टाने कमावलेला आपला पैसा गुंतवण्याचे फायदेशीर मार्ग हे पुस्तक दाखवतं. म्हणूनच हे आहे… माझं कुटुंब, माझी गुंतवणूक !



175.00 Add to cart

तुम्हीही व्हा धडाडीचे उद्योजक

प्रोफेशनल’ वृत्ती जोपासून विकास साधण्यासाठी अनुभवाचे बोल


[taxonomy_list name=”product_author” include=”506″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”775″]


उद्योजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उद्योजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत. काहीतरी उद्योग करणं वेगळं आणि तो धडाडीने व कार्यकुशलतेने करणं वेगळं. यासाठी तुमच्यातील प्रेरणा महत्त्वाच्या ठरतात. हे पुस्तक तुम्हाला प्रेरणांचा स्रोत दाखवतं, तुमच्यातील प्रेरणांना जागं करतं आणि त्यांना दिशा दर्शवतं. उद्योगात किंवा व्यवसायात उच्च कार्यक्षमता कशी आणावी, त्यासाठी लागणारी कौशल्यं कोणती, धडाडीच्या वृत्तीचं महत्त्व किती हे सर्व या पुस्तकात अतिशय समर्पकपणे सांगितलं आहे. पुस्तकाचे लेखक सुब्रोतो बागची यांनी MindTree ही त्यांची कंपनी वयाच्या ४२व्या वर्षी सुरू केली. शून्यापासून सुरू केलेली ही कंपनी सहा वर्षांत त्यांनी उच्च स्थानावर पोचवली, ती धडाडी व कार्यक्षमता यांच्या बळावर! त्या अनुभवांतून साकार झालेलं बागची यांचं हे पुस्तक लहान व्यावसायिकांपासून मोठया उद्योजकांपर्यंत सर्वांनाच मार्गदर्शक ठरतं!


250.00 Add to cart

उद्योग करावा ऐसा

२१ उद्योजकांशी साधलेल्या संवादातून उलगडलेली बिझनेस सिक्रेट्स


[taxonomy_list name=”product_author” include=”507″]


‘उद्योग तुमचा, पैसा दुसर्‍याचा’ या पुस्तकाच्या लक्षणीय यशानंतर सुरेश हावरे आजच्या तरुण उद्योजकांसाठी यशस्वितेचा आणखी एक ‘पुस्तक-मंत्र’ घेऊन येत आहेत.
हे पुस्तक म्हणजे 2015 साली झी 24 तास या वाहिनीवर सादर झालेल्या ‘दि सुरेश हावरे बिझनेस शो’चं संपादित स्वरूप. हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय ठरला होता. या ‘शो’मध्ये शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या धडाडीच्या उद्योजकांच्या मुलाखती हावरे यांनी घेतल्या. तब्बल 72 लाख लोकांनी हा ‘शो’ बघितला आणि त्यातून प्रेरणा घेऊन सहा हजारांहून अधिक तरुणांनी नव्याने उद्योगही सुरू केले.
हावरे हे स्वत: अनुभवी उद्योजक असल्यामुळे या मुलाखती वेगळी उंची गाठू शकल्या. या मुलाखतींमधून उद्योजकांनी प्रकट केलेले विचार, सांगितलेले अनुभव, तसेच त्यांच्याशी झालेल्या संवादातून व्यक्त झालेले ‘मॅनेजमेंट थॉटस्’ हे सर्व व्यावसायिकांना एक नवी दृष्टी देऊन जातात.
ही नवी दृष्टी देण्यासाठी आणि या ‘बिझनेस बाजीगरांची’ जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे अनेक गुण आजच्या तरुणांपुढे आणावेत या उद्देशाने हावरे यांनी हे पुस्तक तयार केलं आहे.
नवउद्योजकांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी उद्युक्त करणारं आणि उद्योग भरभराटीचा हमखास फॉर्म्युला सांगणारं पुस्तक… उद्योग करावा ऐसा !


300.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *