गॅजेट्सच्या दुनियेत!
सध्या आपलं आयुष्य तंत्रज्ञानान वेढलेलं आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो.
एआय, व्हीआर, रोबोटिक्स यांचा वापर वाढला तर त्याचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल हा अंदाज गेल्या काही वर्षात अनेक तंत्रज्ञांनी वर्तवला होता.
याच तंत्रज्ञांनावर आधारित काही कल्पनेच्या पलिकडची हटके गॅजेटस आपण जाणून घेणार आहोत, ‘गॅजेट्सच्या दुनियेत’ या मालिकेच्या माध्यमातून…
आपल्या झोपेची अचूक माहिती देणारी उशी असेल, खिडकीमध्ये पाणी प्यायला आलेल्या पक्ष्याला अचूक टिपणारे बर्ड फिडर असेल किंवा आपोआप आपले घर साफ करणारा रोबो असेल… दैनंदिन आयुष्य सुकर करणारी एकापेक्षा एक अशी सरस गॅजेट्स या लेखमालिकेतून तुमच्या भेटीला येणार आहेत.
- आदित्य संजय बिवलकर
(लेखक तंत्रज्ञानाविषयी मुक्तलेखक आणि अभ्यासक आहेत. बदलते तंत्रज्ञान सामान्यांना सोप्या भाषेत समजविण्यासाठी विविध माध्यमांमधून ते लेखन करतात. त्याचबरोबर सोशल मिडिया आणि माध्यमांसंबंधित विविध सेवा ते ‘मिडिया हब’ या एजन्सीच्या माध्यमातून देत आहेत)