रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे

 

अनुवाद :विलास गीते


रवीन्द्रनाथ यांच्यासारखं कविमन, चौकस निरीक्षणक्षमता, लेखनाची चित्रमय शैली, आता बांगला देशात असलेल्या प्रदेशात पद्मा नदीकाठी वसलेल्या निसर्गरम्य गावाची पार्श्वभूमी आणि पत्रलेखनासारखं प्रवाही माध्यम…..

वयाच्या पंचविशी-तिशीत म्हणजे १८८५ ते १८९५ या दरम्यान रवीन्द्रनाथांनी आपली पुतणी, सत्येन्द्रनाथ टागोरांची कन्या इंदिरादेवी हिच्याशी पत्र – संवाद साधला होता….

पुढील काळात रवीन्द्रनाथांनी लिहिलेल्या कथा-कवितांत या पत्र-संवादाचे अनेक कवडसे दिसून येतात. उदाहरण द्यायचं तर ‘तीन कन्या’ या सत्यजित राय दिग्दर्शित चित्रपटत्रयीची कथा….

बंगाली भाषेवर प्रभुत्व मिळवलेल्या विलास गिते यांनी थेट बंगाली भाषेतून मराठीत अनुवादित केलेली अभिजात साहित्यकृती….

रवीन्द्रनाथ टागोरांची पत्रे



295.00 Add to cart

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस


समीर गायकवाड


रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा !

अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे.

खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !


300.00 Add to cart

विक्रम साराभाई

 


अमर चित्र कथा


डॉ. विक्रम साराभाई हे त्या दुर्मिळ लोकांपैकी एक होते ज्यांच्याकडे सर्व काही होते. अत्यंत हुशार आणि उद्योगपतींच्या श्रीमंत कुटुंबात जन्मलेले, आराम आणि विलासी जीवन जगण्यात समाधान मानू शकले असते. त्याऐवजी त्यांनी आपल्या या गोष्टींचा उपयोग स्वातंत्र्यानंतर भारताच्या उदयास मदत करण्यासाठी केला. प्रख्यात शास्त्रज्ञ, उद्योगपती, संस्था निर्माते, मुत्सद्दी, समाजसुधारक आणि दूरदर्शी डॉ. साराभाई चांचा विचार होता की, विज्ञान आणि शिक्षण भारताला भविष्यात झेप घेण्यास मदत करू शकतात. आपल्या सहकारी भारतीयांच्या क्षमतेबद्दल कधीही शंका घेऊ नये, डॉ. साराभाई यांनी अशा वेळी एक अंतराळ कार्यक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला जेव्हा भारत अजूनही एक नवीन राष्ट्र होता. कृषी, मत्स्यपालन, हवामानशास्त्र, शिक्षण आणि दळणवळण विकसित करण्यासाठी त्यांनी अणुऊर्जा आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर केला. दरम्यान त्यांनी आयआयएम ए. पीआरएल आणि भारताच्या लखलखत्या आकाशावर प्रकाशाचा दीपस्तंभ उभारला इस्रो.

उबदार, सर्वसमावेशक, उदार, मोहक, चिरंतन आशावादी आणि नेहमी विनम्र असलेल्या डॉ साराभाईंनी स्वतः पूर्णपणे जमिनीवर राहून भारताला अंतराळ युगात पुढे नेले…


 

199.00 Add to cart

वीर सावकर

 


अमर चित्र कथा


ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व दर्शन त्यांच्या जीवनात घडले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगण्यास ब्रिटिश सत्तेने भाग पाडले. अत्यंत भयावह अशा या शिक्षेला सावरकर कसे सामोरे गेले, त्याची अत्यंत प्रेरणादायक अशी ही चित्रकथा.


 

90.00 Add to cart

वैज्ञानिक व उद्योजक गाथा संच २

 


अमर चित्र कथा


रोहन प्रकाशन घेऊन येत आहे अमर चित्र कथा आता मराठीत


१. अल्बर्ट आईन्स्टाईन

२. विक्रम साराभाई

३. ए. पी. जे अब्दुल कलाम

४. जे. आर. डी टाटा

478.00 Add to cart

साहित्य: अभिजात आणि लोकप्रिय

डॉ. विनायक गंधे


डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ग्रंथ म्हणजे समीक्षास्वरांची रंगलेली एक सुंदर बैठक होय. या बैठकीमुळे समीक्षेमध्ये स्वारस्य असणारा वाचक ज्ञानसंपन्न होईलच. त्याचबरोबर ह्या आगळ्यावेगळ्या वाटेच्या समीक्षेमुळे तो प्रमुदितही होईल. याचे कारण स्वतः डॉ. गंधे यांची समीक्षालेखनाची बैठक काहीशी अपारंपरिक आहे. डॉ. गंधे यांना समीक्षाविषय सुचतात आणि त्या विषयाची मांडणी मात्र ते खूप विचार करून स्वतःची संशोधितात. याच्या परिणामी डॉ. गंधे यांचा प्रस्तुत ‘साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय’ हा ग्रंथ आगळावेगळा झालेला आहे. म्हणूनच समीक्षेच्या नव्या अभ्यासकांनी तो मन:पूर्वक वाचून जाणून घ्यावा अशी माझी शिफारस आहे.
डॉ. द. दि. पुंडे



 

240.00 Add to cart

सुभाषचंद्र बोस

 


अमर चित्र कथा


“जय हिंद! “या सुभाषचंद्र बोस यांच्या युद्धाच्या आरोळीने भारतीयांच्या मनात आशा निर्माण केली. जपानी युद्धकैद्यांच्या छावण्यांमधील भारतीय सैनिक तसेच देशातील स्वातंत्र्यप्रेमी तरुण त्यांच्या आवाहनामुळे प्रेरित झाले होते. संपत्ती आणि सुखसोयींसह जन्माला आलेला हा तेजस्वी विद्वान जन्मजात नेलाही होता. त्यांच्या कल्पना आणि प्रयत्नांनी भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून दिले.


 

90.00 Add to cart

सॉक्रेटिस कधी मरत नसतो

 


माधव कौशिक

भावानुवाद :रवींद्र शोभणे


हिंदी साहित्यविश्वातील आणि विशेषतः काव्यप्रांतातील एक महत्त्वाचे नाव म्हणून माधव कौशिक यांच्याकडे पाहिलं जातं. गझल, भावकविता, खंडकाव्य इत्यादी काव्यप्रकारांत त्यांनी केलेले लेखन महत्त्वाचे मानले जाते. जवळ जवळ पंचवीस कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. पौराणिक कथानकांतून समकालीन वास्तवाचे आणि भावभावनांचे चित्रण करण्याचे त्यांचे कसब निश्चितच अव्वल असे आहे. कविता या वाङ्मयप्रकारासोबतच त्यांच्या गद्यलेखनाचा आणि बालसाहित्याचाही विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल.

कथाकार म्हणून त्यांनी मोजके लेखन केले असले तरी त्यांच्या कथा या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या आहेत. त्या लघुकथा या प्रकारात मोडणाऱ्या कथा आहेत. जगण्यातील सामान्य घटना, सामान्य माणसांच्या जीवनातील अनवट प्रसंगातून, घटनांतून उभे राहणारे पेचप्रसंग आणि त्यातून जीवन समजून घेण्याचा माधव कौशिकांचा प्रयत्न अधिक आश्वासक आणि अर्थपूर्ण वाटतो.

मराठीतील प्रथितयश कथाकार, कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांनी या कथांचा केलेला मराठी भावानुवाद भाषिक अडसरांना बाजूला सारत मानवी जीवनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी झालेला आहे.

मराठी वाचकांना वेगळी अनुभूती देणारा कथासंग्रह….



 

240.00 Add to cart

सोनेरी मुंगूस

 


अमर चित्र कथा


महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारत या महाकाव्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट साहित्यात होते. महाभारतात कौरव आणि पांडव यांच्यातील युध्दाचेच केवळ वर्णन नाही, तर अनेक लहान-मोठया नीतिकथा, बोधकथा यांचाही त्यात समावेश आहे. सोनेरी मुगुस, कबुतराचे बलिदान आणि ब्राम्हणाचा गुरू खाटिक या अशाच काही बोधकथा. या कथा वाचून तुमच्या ज्ञानात भर पडेल, आणि मनोरजंनही होईल.


 

90.00 Add to cart

हत्तींच्या गोष्टी


प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांच्या आचरणातून बरंच काही शिकण्यासारखं असतं. हत्तीच्या या गोष्टी प्राणीविश्वाची सफर घडवून आणतात आणि काही बोधही देतात. क्षुल्लक लोभाच्या मोहाला बळी पडणाऱ्या माणसांना लाजवणारी हत्तींची दयाळू वृत्ती या पुस्तकातील काही कथांमधून दिसते. पण हाच हत्ती जेव्हा लहान प्राण्यांना त्रास देतो तेव्हा हत्तीच्या शक्तीपुढे न झुकता चिमुकल्या मुंग्याही युक्तीने त्याला धडा शिकवतात. या जातक कथा बाचून हत्तींच्या विश्वात रममाण व्हा, पण योग्य बोध घ्यायला विसरू नका.


 

90.00 Add to cart

हवा हवाई

 


विजय नाईक


हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं….

मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते.

ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात.

या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात.

हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!



 

250.00 Add to cart

हिट्स ऑफ नाईन्टी टू

 


पंकज भोसले


ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.

– सचिन कुंडलकर


 



340.00 Add to cart

हिराबाई बडोदेकर


गायनकलेतील तारषड्ज


डॉ. शुभदा कुलकर्णी


ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची.

सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर.

डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल !

– डॉ. चैतन्य कुंटे



 

325.00 Add to cart

हुशार बिरबल


मुघल राजा अकबराच्या दरबारी असणाऱ्या नवरत्नांपैकी एक म्हणजे बिरबल, बिरबल अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होता. अकबर अनेक अवघड प्रश्न विचारून बिरबलाच्या चातुर्याची आणि हुशारीची परीक्षा घ्यायचा आणि बिरबल अचूक उत्तर देऊन अकबराला निरुत्तर करायचा. बिरबलाने अनेक लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले, तसेच राज्यकर्त्यांशी मुत्सद्दीपणे व्यवहारही केला. तो योग्य न्यायनिवाडा करत असे. हुशार बिरबलाच्या या कथा फक्त मनोरंजन करत नाहीत, तर मनात आदर्श मूल्यांची पेरणीही करतात. त्याच या अकबर-बिरबलाच्या कथा !


 

90.00 Add to cart

द एलओसी

नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची कहाणी


हॅपीमॉन जेकब
अनुवाद:मिलिंद चंपानेरकर 


हॅपीमॉन जेकब यांनी २०१८मध्ये भारत पाकिस्तान या दोन देशांमधील ‘ताबा नियंत्रण रेषे’च्या अर्थात ‘एलओसी’च्या दोन्ही बाजूंनी प्रवास केला. भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यदलासोबत त्यांनी केलेला सहप्रवास, दोन्हीकडील अनेक निवृत्त व सेवेतील लष्करी अधिकाऱ्यांसोबत केलेल्या चर्चा, आणि सीमाभागातील ‘शस्त्रसंधी उल्लंघन’-ग्रस्त लोकांशी साधलेला संवाद यांबद्दलचे तपशील हॅपीमॉन यांनी या पुस्तकातून दिले आहेत.

दोन देशांमध्ये लोकसहभागाने शांतता प्रस्थापित व्हावी हा हॅपीमॉन यांचा मूळ उद्देश आहे. पूर्वग्रहांचे अडथळे पार करून दोन्ही देशांच्या लष्करासह सर्व प्रकारच्या लोकांशी संवाद साधण्याचं अवघड असं काम गेली कित्येक वर्षं ते करत आहेत, त्याचप्रमाणे अनेक ‘ट्रॅक टू’ संवादांतील सहभागाद्वारे शांतता प्रयत्नाच्या प्रक्रियेत सातत्याने सहभागी राहिले आहेत. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकिर्त अभ्यासक आहेत.

दीर्घ अनुभव आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन यांतून नवी अंतर्दृष्टी देणारं पुस्तक द एलओसी.



325.00 Add to cart

विस्तारवादी चीन व भारत

चढती कमान व वाढते तणाव


[taxonomy_list name=”product_author” include=”487″]


कॅन ड्रॅगन अँड एलिफन्ट डान्स टुगेदर?
भारत व चीन यांच्या दरम्यानचे संबंध गेली वीसेक वर्षं तसे सलोख्याचे होते. कारण याच काळात देवाण-घेवाण वाढली, व्यापारवृद्धी झाली, सीमावादाबाबत वाटाघाटी चालू राहिल्या. शी जिनपिंग व नरेंद्र मोदी यांच्या परस्परांच्या देशाला भेटी झाल्या. या पार्श्वभूमीवर चीनचे स्टेट कौन्सेलर व परराष्ट्र मंत्री वांग एका पत्रकारपरिषदेत म्हणाले होते की, चिनी ड्रॅगन व भारतीय गजराज यांनी एकमेकांबरोबर भांडायला नको, तर नृत्य करायला हवं…
आज मात्र परिस्थिती बदललेली दिसते आहे.

डिसेंबर १९७८मध्ये डेंग झाव पिंग यांनी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्या पारंपरिक वर्ग संघर्षाच्या वैचारिक बैठकीपासून अलग करून आर्थिक विकासाच्या विचारांकडे वळवलं… जगासाठी अधिक खुलं धोरण अवलंबत चीनने कृषी, उद्योग, लष्कर, विज्ञान व तंत्रज्ञान या चार क्षेत्रांच्या आधुनिकीकरणास प्राधान्य दिलं. विजय नाईक यांच्या पुस्तकात चीनच्या या आर्थिक सुधारणांच्या योजनांची माहिती असून,… चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्यवस्था कसा बनला, याची कारणमीमांसा व ऊहापोह केला आहे….
चीनचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांचा उदय कसा झाला, कम्युनिस्ट पक्षाच्या अगदी तळागाळापासून अखेर ते पक्षाचे महासरचिटणीस, नंतर चीनचे अध्यक्ष (२०१३) कसे झाले, याचा सुरेख विश्लेषणात्मक आलेख लेखकाने दिला आहे. ते आता चीनचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेने चालले आहेत… चीन आता जागतिक सत्ताही बनला आहे…. अमेरिकेला आव्हान देण्याची चीनची अंतःस्थ महत्वाकांक्षा असून, आंतरराष्ट्रीय राजकारणात श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे… या परिस्थितीचे भारत व चीनच्या संबंधांवर काय परिणाम होतील? चीनने निर्माण केलेल्या आव्हानाचा भारत कशाप्रकारे सामना करणार?… आशियातील चीनचं वर्चस्व भारत घटवू शकेल काय?
अशा अनेक प्रश्नांच्या चर्चेसह डोकलम, गलवान ते लडाख संबंधीचे वाढते तणाव अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्ष विजय नाईक यांनी त्यांच्या या पुस्तकात घेतला आहे… भारत व चीन दरम्यानच्या घटना व आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची स्पंदन जाणून घेणाऱ्यांसाठी या पुस्तकाची मी नेहमीच शिफारस करेन.
गौतम बंबावाले
माजी सनदी अधिकारी
भारतीय राजदूत म्हणून चीनमध्ये नियुक्त (२०१७-१८



325.00 Add to cart
1 7 8 9 39