390.00

मुंबई अव्हेंजर्स


एस. हुसैन झैदी हे शोधपत्रकारिता, तसंच गुन्हेगारी पत्रकारितेतलं मुंबईच्या प्रसारमाध्यमांच्या विश्वातलं विख्यात नाव आहे. एशियन एज वृत्तपत्राचे ते निवासी संपादक होते, तसंच मुंबई मिरर, मिड-डे आणि इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केलं आहे. ‘ब्लॅक फ्रायडे’, ‘डोंगरी टू दुबई’ ही त्यांची काही बेस्टसेलर्स पुस्तकं. त्यांच्या पुस्तकांवर आधारित असलेले चित्रपटही विशेष गाजले. एचबीओ वाहिनीकरता ‘टेरर इन मुंबई’ या चित्रपटासाठी झैदी यांनी साहायक निर्माता म्हणून काम केलं आहे. हा चित्रपट २६/११च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर आधारित होता.

अनुवाद:
अनुवाद, चित्रकला आणि लेखन-वाचन यांमध्ये विशेष रस असलेल्या रमा यांनी माधुरी पुरंदरे यांनी पुस्तकं मराठीतून इंग्रजीत भाषांतरित केली आहेत. त्यांना फ्रेंच , इंग्रजी आणि मराठी भाषांमधली ललित साहित्याची पुस्तकं अनुवादित करायला आवडतात. लहान मुलांसाठीही त्या लेखन करतात. आजवर त्यांनी वीसपेक्षा जास्त कलाकृतींची भाषांतरं केली असून त्यांना 'डेली हंट'ने आयोजित केलेल्या कथास्पर्धेत पारितोषिकही मिळालं आहे.


ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!
मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.
या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…

पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स


Reading Time: 1 Minutes (135 words)

978-3-92374-72-2 Mumbai Avengers मुंबई अव्हेंजर्स S. Hussain Zaidi Grabel khan एस. हुसैन झैदी ग्राबिएल खान Rama Hardikar- sakhadev रमा हर्डीकर- सखदेव ही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!

मुंबईवर २६/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं,

अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.

या ऑपरेशननुसार २६/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…

पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार… मुंबई अॅव्हेंजर्स

paper back book Rohan Prakashan Marathi 311 Mohor fiction कादंबरी 390

 

Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.