978-93-9131-995-3 | Mahatma Gandhi | महात्मा गांधी | मोहनदास करमचंद गांधी… यांचा आदर्शवाद आणि सत्याप्रतीची ठाम निष्ठा याची थट्टा करण्यात आली. त्यांचा साधेपणा आणि विनयशील वृत्ती याकडेही नेहमी उपहासाने पाहिलं गेलं. महात्मा गांधींनी अशा गोष्टींना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही. त्यांच्यासमोर दांडगी ब्रिटिशसत्ता पार झुकली. या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या जीवनकर्तृत्त्वाचा आढावा घेतला आहे. बालवयात एका विचारी आणि शांतस्वभाव असलेल्या मुलाचं व्यक्तिमत्त्व बघता बघ पार बदललं. अत्यंत समर्थ, सक्षमवृत्ती आणि निर्धाराचं ते चालतं बोलतं प्रतीक बनले. लक्षावधी लोकांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत चेतवून त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा बळकट केला. | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 62 | 199 |
फिटनेस मंत्र टीनएजर्ससाठी
नमिता जैन
अनुवाद : डॉ. अरुण मांडे
फिट रहायला आणि आकर्षक दिसायला कुणाला आवडत नाही? कॉलेजमध्ये मित्र-मैत्रीणींसोबत लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायला तर तुम्हाला विशेष आवडत असेल. पण जर शरीराने तुम्ही फिट नसाल तर…?
निराश होऊ नका! नमिता जैन या विख्यात फिटनेस गुरू खास तुम्हा तरुणांसाठी या पुस्तकाद्वारे एक अनोखा ‘फिटनेस मंत्र’ देत आहेत. या मंत्रामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होईल, तुम्हाला चांगल्या आहाराची सवय लागेल, व्यायामाची गोडी लागेल व मानसिक संतुलनही लाभेल. लठ्ठपणाशी फाईट कशी द्यावी? स्टॅमिना कसा वाढवावा? टीनएज समस्यांना तोंड कसं द्यावं? अशा समस्यांचं उत्कृष्ट मार्गदर्शनही त्यांनी या पुस्तकात केलं आहे.
उत्तम आरोग्य, नितळ त्वचा आणि आकर्षक फिगरसाठी प्रभावी ‘फिटनेस मंत्र’ टीनएजर्ससाठी!
‘हे पुस्तक म्हणजे तरुणांसाठी एक खजिनाच आहे. जितकं तुम्ही वाचाल, तितकी त्याची उपयुक्तता तुम्हाला पटेल. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती याचा प्रत्यय देणारं पुस्तक…’
-सायना नेहवाल
‘या पुस्तकातला फिटनेस मंत्र अमलात आणा, त्यामुळे तुम्हाला हवा तसा मस्त आकार शरीराला देता येईल. माझ्यावर विश्वास ठेवा हा मंत्र खरोखरच जादुई आहे.’
-दीपिका पदुकोण
Reviews
There are no reviews yet.