978-93-5085-172-2 | veer Savarkar | वीर सावकर | ब्रिटिश राजसत्तेला हादरवून सोडणारे जे महान क्रांतिकारक भारतभूमीत जन्मले, त्यांमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शीयं सहनशीलता, त्याग आणि अपार बुध्दिमत्ता व प्रतिभा या गुणांचे अभूतपूर्व दर्शन त्यांच्या जीवनात घडले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना काळया पाण्याची शिक्षा भोगण्यास ब्रिटिश सत्तेने भाग पाडले. अत्यंत भयावह अशा या शिक्षेला सावरकर कसे सामोरे गेले, त्याची अत्यंत प्रेरणादायक अशी ही चित्रकथा. | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 31 | 90 |
अभ्यास कौशल्य
डॉ. नन्दिनी दिवाण
अभ्यास आणि परीक्षा या विद्यार्थिजीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी. आजच्या वाढत्या स्पर्धेच्या युगात तर परिक्षेतल्या यशाला मोठे महत्त्व आले आहे, त्या दृष्टीने अभ्यासाची योग्य पध्दती समजावून घेणे आवश्यक ठरते. अभ्यास-कौशल्य म्हणजे काय? श्रवण, वाचन, स्मरणशक्ती, लेखन इत्यादी घटकांचा योग्य वापर कसा करावा? परीक्षातंत्र कसे विकसित करावे? त्यात पालकांची भूमिका काय असावी? या सर्व गोष्टींचे मानसशास्त्राच्या साक्षेपी प्राध्यापिका डॉ.नन्दिनी दिवाण यांनी या पुस्तकात सुलभ मार्गदर्शन केले आहे. तसेच या संदर्भात सर्वांगीण व्यक्तिमत्त्व-विकासाबद्दलही काही सूचना दिल्या आहेत. शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिकण्याची वा शिकवण्याची आवड असणार्या सर्वांनाच हे पुस्तक मोलाचे ठरावे.
Reviews
There are no reviews yet.