ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स
₹230.00
लेखक : ज्युनिअर ब्रह्मे
लग्न जमवण्याची प्रक्रिया ते लग्नसमारंभातील धांदल, धावपळ… त्या दरम्यान लुडबुड करणारे वऱ्हाडी… त्यांचा आगाऊपणा आणि त्यातून घडणारे घोटाळे इ.इ.इ.
ज्युनियर ब्रह्मे यांना या मंडळींच्या स्वभावविशेषात, घडणाऱ्या प्रसंगांत विनोद दिसतात… ते विनोद ते इथे शब्दांत उतरवतात… विनोदाच्या साचेबंद पठडीला छेद देत !
हे विनोद, या कोट्या जरा विक्षिप्तच, पण निष्पाप म्हणाव्यात अशा. ब्रह्मे अधूनमधून जरा अतीच करतात, ‘आचरटपणा’च तो, असंही वाटून जातं !
यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा स्वतःच्या विश्वात रमणारी… ‘वुडहाऊस ‘प्रमाणे ! आणि मग त्यातून निर्माण होणारे विनोद स्वनिंदात्मकही होतात.
जाता-जाता ‘सटल ‘रित्या केलेली मिस्कीली आपल्याला बेसावध अवस्थेत गाठते आणि मग बुद्धीला खाद्य मिळून आपली ‘ट्यूब पेटते’ आणि आपण एकतर गालातल्या गालात तरी हसतो, ओठ पसरवून स्मित तरी करतो, किंवा अगदी खदाखदा हसतो.
विनोद, हास्य याशिवाय आयुष्य बेचव, निरर्थक ! ती निरर्थकता हद्दपार करणारा, विनोदाच्या वेगळ्या वाटेवर नेणारा ‘ब्रह्मेघोटाळा’ पहिल्या भागानंतर अधिक विक्षिप्त होऊन आता परत आला आहे… अर्थात ‘ब्रह्मेघोटाळा रिटर्न्स’
Reviews
There are no reviews yet.