ज्युनियर ब्रम्हे

ज्युनियर ब्रह्मे या नावाविषयी : स्वतःची ओळख टाळून ज्युनियर ब्रह्मे या नावाने लिखाण. (हल्ली फेसबुकवरचा कुणी वाट्टेल तो, स्वतःला लेखक समजत असल्याने हे आपली ओळख लपवत असावेत.) आधी फेसबुकवर आणि नंतर काही नियतकालिकांमधून लिखाण. ज्युनियर ब्रह्मे हेच नाव का? तर नाव योजताना ते सुटसुटीत, अर्थवाही आणि बालवाडीच्या (मोठा गट) मुलांनाही सहज लिहीता येणारं असावं हा निकष लावला असावा. आजवरचे लेखन : 'ब्रह्मेघोटाळा' (२०१८) या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट विनोदी लेखनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार प्राप्त. याशिवाय 'आवाज', 'मिळून साऱ्याजणी', 'जत्रा', 'ऐसी अक्षरे', 'दिव्य मराठी', 'मार्मिक' या दिवाळी अंकातून विनोदी कथा प्रसिद्ध. शिवाय काही नियतकालिकांतूनही नियमित लिखाण. (वाचकांनी 'काही' हा शब्द शून्य असा वाचावा.) इतर : नोकरीनिमित्त मुंबईला असतात, पण राहतात पुण्याला. इमेल : junior.brahme@gamil.com (लेखक दुपारच्या वेळेत ऑफीसात असतात. त्यामुळे कृपया दुपारी मेल पाठवून झोपमोड करू नये.